31 December 2008
काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.
काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात मला
दुखवता मात्र येत नाही.
काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.
काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.
काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.
काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगते
पण कोणी ऐकतच नाही.
काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करते.....
पण शब्द ही मला पुरत नाहीत...
स्पर्श..
तुझ्या मनाचा मला तो स्पर्श खास झाला..
अजाण होते विसाव्याचे ठिकाण माझे
विरून गेल्या दिशा तो गोड भास झाला..
इलाज आहे कुठे ? गहिवरण्यास येथे..
निरोप माझा आता त्या आसवांस झाला..
तु घेऊन आलीस स्पर्श चांदण्यांचे..
अन् चांदराती आठवणींचा प्रवास झाला..
निशब्द झालो अता मी प्रियेच्या समोरी..
हवाहवासा असा तो आज त्रास झाला..
16 December 2008
KATRINA KAIF:ASIAN SEXIEST WOMEN ALIVE 2008
In the annual round conducted by 'Eastern Eye', a leading British Asian newspaper, Kaif emerged on the top in a shortlist of 10 sexiest ladies of year 2008.
Kaif, who was brought up in London, was ranked one place above 2007's winner Bipasha Basu and two ahead of 2006 winner Priyanka Chopra . Kareena Kapoor came fourth in the list. Aishwarya Rai was at the seventh place.
In the annual round conducted by 'Eastern Eye', a leading British Asian newspaper, Kaif emerged on the top in a shortlist of 10.
The judges included Brianna Ragel, editor of ‘Asian Woman Magazine’ and the former editor of ‘FHM India’, Farhad Dadyburjor.
Hamant Verma, editor of ‘Eastern Eye’, said: "Katrina Kaif's natural beauty and easy charm has enabled her stock to rise in Bollywood. This has resulted in a number of lucrative offers, and appearances in films that proved to be box-office hits."
Kaif, who was brought up in London, was ranked one place above 2007's winner Bipasha Basu and two ahead of 2006 winner Priyanka Chopra. Kareena Kapoor came third in the list.
New entrants to the 'sexiest list' included Pakistani actress Mehwish Hayat (nine), Miss India Universe Simran Kaur Mundi (10), former Miss Sri Lanka Jacqueline Fernandez (12) and South Indian actress Asin (22).
Former Miss World Aishwarya Rai was at the seventh place.
The recent poll has made for the Asian Sexiest women.This time Katrina Kaif beat the Aishwarya Rai and Bipasha Basu to become the top in Asian sexiest women,the next place goes to Beauty Bipasha basu followed by Priyanka chopra, Miss world Aiswarya Rai got the seventh place in the poll.
The list of top sexiest asian women stills are followed
1. Katrina Kaif
2. Bipasha Basu
3. Prinyanka Chopra
4. Kareena kapoor
5.Laila Rouass
6. Mallika Sherawat
7. Aishwarya Rai
8. Malaika Arora Khan
9. Mehwish Hayat (pakistani actress)
10. Simran Kaur Mundi
02 December 2008
Best Sites for Windows Tips, Tricks and Tweaking
Windows Tips Galore
Active Windows offers a first rate combination of tips and tutorials along with some useful reviews. The PCStats site features an excellent collection of Windows tips taken from the PCStats forums. I particularly liked the registry patch for removing those annoying entries in the "Add/Remove programs" menu that hang around long after the program has been uninstalled.
http://www.activewin.com
http://www.pcstats.com/articleview.cfm?articleid=1190&page=3
Tweaks for XP Freaks
We've mentioned this excellent collection of free Windows XP registry tweaks before but on a recent visit I noticed that it's now bigger and better than ever. Each tweak can be downloaded as a .reg file to save you the task of editing your registry.
http://www.kellys-korner-xp.com/xp_tweaks.htm
Windows XP Tips from Microsoft
Dozens of XP Pro tips including a sneaky way to bulk rename files. I didn't know you could do that in Windows. Guess you learn something every day.
http://www.microsoft.com/windowsxp/expertzone/tips/default.asp
How Fast do you Really Surf?
The high data rate you get when downloading a big file is not a
reliable measure of how quickly you can surf. This site offers a
free test that measures your connection speed to 40 different
sites worldwide. Be prepared to have your ego deflated ;>)
http://www.numion.com/
Mysterious Startup Programs Explained
If you've ever looked at your Windows startup folder you're bound to find a number of odd-named executables. Check out exactly what each program does at this valuable resource site:
http://www.pacs-portal.co.uk/startup_pages/startup_full.htm
Find Email Addresses
If you are looking for someone's email address, the bad news is there's no central directory. However this site offers a meta search engine that will search many possible sources. Quite to my surprise, I found my own personal email address.
http://mesa.rrzn.uni-hannover.de/
Commercial Software for Free
Many commercial software products started life as freeware. You can still locate many of these original free versions at the Internet Archive, which has captured snapshots of the web at different points of time for research purposes. Just enter the software vendor's web site address and with a bit of luck, you may be able to locate and download a free version.
http://www.archive.org/
BIOS Optimization Guide
Want to tweak your BIOS for maximum speed or stability? Like to understand the meaning of some of the obscure settings in your BIOS setup? If so, head straight to this site.
http://www.rojakpot.com/default.aspx?location=1
Organize Your Partitions Correctly
What's the best way to organize the partitions on your hard disk? Now that's a question that would take a long dinner and two bottles of red wine to sort out. For those who don't like wine or simply want a quick introduction to the issues, check out the following article.
http://aumha.org/win4/a/parts.htm
Optimizing the Windows XP Paging File
This is one of the best articles I've yet seen on this subject. It dispels many myths including setting the max and min sizes the same and setting the maximum size at 2.5 times the memory size.
http://aumha.org/a/xpvm.htm
Free Windows Networking Help
Got a networking problem? Want a networking tutorial? Need some background on Windows networking technology? Then head straight for this excellent resource site. The content quality is a bit variable but hey, it's free.
http://www.wown.com/
XP Questions Answered
This site offers an excellent collection of Windows XP tips including answers to some of the most common only encountered problems.
http://www.windows-help.net/WindowsXP/all-tips.html
How to Make Windows XP Run Faster
This site lists a step-by-step procedure for optimizing the performance of Windows XP. Most of it is good advice but comes at a cost in the form of slightly downgraded appearance and the loss of little-used features and services.
http://www.techreviewer.com/viewpage.cfm/pi/9
Impressive Windows Tips and Tricks Site
More performance enhancing and behavior modification tweaks than you ever imagined.
http://www.mdgx.com
More Networking Help
A couple of issues back I mentioned the excellent wireless networking resources offered by the Practically Networked site. This prompted subscriber Richard Cowper to write in about the Home Net Help site. Nice find Richard. The coverage is wider than just wireless networking too. Well worth visiting.
http://www.homenethelp.com/
Windows XP Tips Galore
The first link is to a site offering a nice list of 101 tips covering ways you can improve performance, increase privacy and more. The second link is another site which, rather cleverly, lists its tips in popularity order. Backing up/restoring/disabling XP activation topped the popularity list.
http://www.pcstats.com/articleview.cfm?articleID=1494
http://is-it-true.org/nt/xp/index.shtml
Windows XP Myths Exposed
This is a well researched list that debunks dozens of commonly held Windows beliefs such as "Periodically cleaning the pre- fetch folder speeds up boot time." While visiting, check out other sections of the site; they are first class.
http://mywebpages.comcast.net/SupportCD/XPMyths.html
Windows XP Fix Zone
Another useful tech support site with a large collection of how-to articles, troubleshooting guides and customization tips. The site organization is a bit strange but that doesn't detract from the value of the content.
http://www.winxpfix.com/
28 November 2008
एक रात्र अशीही ....टार्गेट मुंबई
शिवाजी छ्त्रपती टर्मिनस
नरीमन हॉउस
शिवाजी छ्त्रपती टर्मिनस
ताज होटल
शिवाजी छ्त्रपती टर्मिनस
ताज होटल
अतिरेकी
ताज सकाळी
27 November 2008
तार्कर्ल्लीचा समुद्राकिनारा
माझी समुद्रकिनारे पाहण्याची सवय तशी जुनिचा आहे तस्सा मी गोवातील पुष्कल किनारे पाहिले असतील पन जरा वेगलेपनासाठी महाराष्ट्रातील दुल्कक्षित किनारे पहायचा ठरवून घरातून मित्राना घेउन निघालो.
नेहमीप्रमाने रात्रीच्या कोकंणकन्या एक्सप्रेसने घिविम ला पोहचलो नेहमीप्रमाने कलंगुट बागा अंजुना बिचला भेट देवून थोड रुचिपलत म्हणुन मोर्जी बिच, आश्विन बिच पाहून केरी गोवाची महाराष्ट्राकडील किनारपट्टी पहयाचा ठरवून केरीला पोहचलो,
मोर्जी बिच मी अन अमित
केरि तो शांत समुद्रकिनारा पहिला आणि खरच कहितर वेगळ पाहिल्याचा आनंद झाला.
केरी समुद्रकिनारा
तरीने तेरेखोल नदी पारकरून तेरेखोल किल्ला पहिला, तेरेखोल किल्ला आता एक हेरिटेज होटल झाला आहे
तेरेखोल किल्ला - तेरेखोल हेरिटेज होटल
आता खरी भटकांतिची मजा येत होती तेरेखोल किल्ला पाहून आम्ही शिरोडाकडे निघालो,
शिरोडा सावंतावाडी कुडाल मार्गे सायंकाली मालवणला पोहोचलो, रात्रि नाथपै वसतिगृहात राहून पहाटे तर्काल्ली कड़े निघालो,
नाथपै वसतिगृह
वाटेत रॉक गार्डन जय गणेश मन्दिर करत तर्काल्लीला पोहचलो आणि तो किनारा पाहून मंत्रमुग्ध झालो, अथंग समुद्रकिनारा मधेचा डोकेवर करुन पहनारी खडकाची टोक मधोमध उभा सिंधुदुग्र किल्ला, नित्तल स्वाच्छ पानी पाहून मन खुश झाला.....
तार्कर्ल्ली बीच - मुस्तफा
पुढली सफर सिंधुदुग्रची ......
शेअर उत्तम संपत्ती निर्माण करू शकतात
मैत्री कोणाशी व्हावी, याला काहीही नियम नसावेत. वय, श्रीमंती, विद्वत्ता, समाजातील स्थान यांसारख्या गोष्टींचा मैत्रीमध्ये अडसर येत नसतो. त्यामुळेच कोणाला कितीही विचित्र वाटले, तरी वॉरेन बफे या अतिश्रीमंत आणि अत्यंत बुद्धिवान माणसाशी मी मैत्री केलेली आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये वॉरेन बफे यांचा समावेश होतो. अमेरिकेसारख्या देशातील आर्थिक क्षेत्रात गेली कित्येक दशके हा माणूस स्वतःचे स्थान टिकवून आहे. परंतु, एवढे सारे काही असूनही त्यांचे शेअर बाजाराविषयीचे तत्त्वज्ञान अत्यंत साधे आणि सुलभ आहे आणि त्यामुळेच शेअर बाजाराविषयी मनात काही शंका किंवा संशय निर्माण झाला, की लगेच मी वॉरेन बफेंच्या तत्त्वज्ञानाची मदत घेतो आणि पुढे मार्गस्थ होतो. प्रत्यक्षात एकदाही गाठ न पडतादेखील अनेक गुंतवणूकदार, अभ्यासक आणि विश्लेषक यांनी वॉरेन बफेंशी मैत्री केली असणार, यात शंका नाही.
एक अद्भुत दुनिया
मुळात शेअर बाजार ही एक अद्भुत दुनिया आहे. अनेकांनी इथे कित्येक पैसे मिळवले, तर कित्येकांनी आपली संपत्ती यापायी गमावलीदेखील. एवढे असूनही या अद्भुत दुनियेविषयीचे आकर्षण वाढतच आहे. कित्येक जण यात प्रवेश करू इच्छितात. परंतु, वॉरेन बफे स्पष्ट सांगतात, की आधी या बाजाराचा अभ्यास करा, त्याची पूर्ण माहिती करून घ्या आणि मगच त्यामध्ये प्रवेश करा. पुढे जाऊन ते म्हणतात, ""मला ज्या गोष्टीतील कळत नाही, त्यामध्ये मी पैसे गुंतवत नाही.'' डेरिव्हेटिव्ह मार्केट, डे ट्रेडिंग, शॉर्ट सेलमध्ये अनेकांचे पैसे बुडतात, त्या वेळी बफेंचा हा मित्रत्वाचा सल्ला फार उपयोगी ठरू शकतो.
शेअर खरेदी करताना देखील ते म्हणतात, ""ज्या कंपनीच्या उत्पादनातील ज्ञान मला नाही, त्या कंपनीच्या शेअरकडे मी वळत नाही.'' २००० मध्ये जगभर संगणक व्यवसायातील कंपन्याचे शेअर तेजीत होते, त्या वेळी बफे यांनी ठामपणे ते शेअर खरेदी न करण्याचे सूत्र अवलंबले होते. बहुतेकांना वाटले, की त्या वेळी बफे चुकले. परंतु, काही वर्षांतच त्या शेअरचा बुडबुडा फुटला आणि पुन्हा एकदा बफेंचे साधे, सोपे वाटणारे तत्त्वज्ञान लोकांना पटू लागले. या कारणासाठीच अमेरिकेतील शेअर बाजारात ते मायक्रोसॉफ्टच्या (संगणक क्षेत्र) शेअरपेक्षा जिलेटला (घरगुती वापराच्या वस्तू तयार करणारी कंपनी) प्राधान्य देण्याचे धैर्य दाखवतात. त्यांच्या मते, ""भविष्यात लोक संगणक वापरतील की नाही माहीत नाही; परंतु प्रत्येक पुरुष रोज दाढी मात्र नक्कीच करेल !''
संकट नव्हे, संधी!
जागतिक बाजारात सध्या भीतीचे वातावरण दिसत आहे. २००८ या वर्षात जगातील बहुतेक शेअर बाजार प्रचंड कोसळले. भारतीय शेअर बाजारसुद्धा त्याला अपवाद नाही. असे म्हटले जाते, की २००७ या वर्षात बाजारात एवढी तेजी होती, की बाजार बंद असताना लोक अस्वस्थ होत होते. याउलट २००८ या वर्षात बाजारात एवढी भीती आहे, की बाजार चालू असताना लोक अस्वस्थ होत आहेत. कोणीही गुंतवणूक करण्यास पुढे येत नाही. या वेळी वॉरेन बफेंचे प्रसिद्ध वाक्य आठवते- ""ज्या वेळी इतर लोक घाबरलेले असतील, त्या वेळी तुम्ही बाजारात प्रवेश करा आणि याउलट ज्या वेळी इतर लोक खरेदीसाठी अधीर असतील त्या वेळी तुम्ही शांत बसा!'' आज पडलेल्या बाजारात कित्येक उत्तम कंपन्यांचे शेअर अत्यंत कमी भावात उपलब्ध आहेत. गरज आहे, ती शांत डोक्याने टप्प्याटप्प्याने बाजारात प्रवेश करण्याची. यापुढे जाऊन गुंतवणूकदार विचारतात, की आता प्रवेश करावा हा सल्ला ठीक आहे, परंतु कोणते शेअर घ्यावेत? यावर देखील बफे उत्तर देतात- "आधी कंपनीचा व्यवसाय वाढतो, त्यानंतर त्या कंपनीचा शेअर, बाजारात त्याच पावलावर चालतो.' थोडक्यात, ज्या कंपन्यांचे उत्पादन उत्तम आहे, ज्यांच्या उत्पादनावर मंदीचा फारसा परिणाम होणार नाही, ज्या कंपन्यांकडे भविष्यातील खूप ऑर्डर आहेत, अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये मंदीच्या काळात अवश्य प्रवेश करावा. अर्थात अर्थव्यवस्थेतील तात्पुरत्या हेलकाव्यामुळे असे उत्तम शेअरदेखील पडतात. परंतु, बाजारातील अशा तात्पुरत्या हेलकाव्यांकडे "संकट' म्हणून न पाहता "संधी' म्हणून पाहावे, असे बफे म्हणतात. ज्या माणसाला आपल्या खात्यातील उत्तम शेअरचा बाजारभाव ५० टक्के खाली गेल्याचे बघण्याचे धैर्य नाही, अशा माणसांनी शेअर बाजारात येऊच नये, असा सडेतोड सल्ला ते देतात. कंपनी जर मूलभूतरीत्या भक्कम असेल, तर अशा तत्कालीन वादळांवर मात करून दीर्घ काळात त
े शेअर उत्तम संपत्ती निर्माण करू शकतात.
कायमस्वरूपी गुंतवणूक
वॉरेन बफेंच्या मते शेअर बाजार ही "गुंतवणूक' आहे, "सट्टा' नाही. बाजारात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी म्हणजे धोका कमी होतो आणि फायदा वाढतो, असे बहुतेक जण सांगतात. परंतु दीर्घकाळ म्हणजे किती यावर बफे म्हणतात- "दीर्घकाळ म्हणजे कायमस्वरूपी!' ज्याप्रमाणे आपण घर, जागा, सोने यामध्ये कायमस्वरूपी गुंतवणूक करतो, त्याप्रमाणेच उत्तम कंपन्यांचे शेअर कायमस्वरूपी ठेवावेत. कारण दीर्घ काळामध्ये आपण "शेअर' खरेदी करत असतो. त्यामुळे दीर्घकाळात ज्या वेळी व्यवसाय वाढतो तेव्हा गुंतवणूकदार हा केवळ "भागधारक' न राहता एका अर्थाने त्या कंपनीच्या "व्यवसायाचा भागीदार' होत असतो.
शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी वॉरेन बफे दोन महत्त्वाचे नियम सांगतात, ""नियम पहिला म्हणजे शेअर बाजारात कधीही आपले पूर्ण पैसे गमावू नका आणि नियम दुसरा म्हणजे पहिला नियम कधीही विसरू नका!''
अमेरिकेचे नवे अध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील अमेरिकेची ढासळती अर्थव्यवस्था सावरण्यासाठी वॉरेन बफेंचा सल्ला घेण्याचे जाहीरपणे सांगितले आहे. सध्याच्या स्थितीत बफेंची महानता सांगण्यासाठी या गोष्टीपेक्षा आणखी कशाची गरज आहे?
मुंबईत ४ ठिकाणी गोळीबार - २० जखमी
गोळीबार झालेल्या सर्व ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच रस्ते बंद झाले आहेत.
दरम्यान, व्हिटीमध्ये स्फोट होऊन १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मुंबई - बुधवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मुंबई हादरून गेली.
- ताजमहाल हॉटेल, कॅपिटॉल सिनेमाजवळ गोळीबार
- नागरिकांमध्ये घबराट
- रात्री १०.२२ च्या सुमारास कुलाब्यात "लिओपोर्ड कॅफे'मध्ये प्रथम गोळीबार.
- त्यानंतर सुमारे पाच ठिकाणी अंदाधुंद गोळीबार; सांताक्रूझ व विलेपार्ले येथे टॅक्सींमध्ये स्फोट
- दहशतवाद्यांनी एके-४७ मधून हल्ला केला असल्याचा संशय
- रस्त्यावर अनेक ठिकाणी रक्ताचा सडा
- जखमी पोलिसांना नागरिकांनी स्कूटरवरून रुग्णालयात नेले
- दहशतवाद्यांच्या खांद्यावर सॅक व हातात रायफली असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती
- रस्त्यावर अनेक ठिकाणी पुंगळ्या
- कुलाबा, फोर्ट परिसरात हल्ल्यानंतर दहशतीचे वातावरण, रस्त्यावर बूट-चपलांचा खच
- मध्य रेल्वेच्या हार्बर व मुख्य मार्गावरील वाहतूक रोखली. प्रचंड गोंधळाचे वातावरण
- ताज हॉटेलमध्ये दहा अतिरेकी, हॉटेल ताब्यात घेण्याचा प्रयत्न
- अतिरेक्यांचा टेरेसवरून हल्ला
- "लष्कर-ए-तोयबा'कडून आत्मघाती हल्ल्याचा संशय
- रात्री साडेअकरा वाजता सशस्त्र पोलिस व निमलष्करी दलाचा हॉटेलला वेढा
- हॉटेलमधून दोन हॅंडग्रेनेड फेकण्यात आले.
- हॉटेलच्या सुरक्षा दलांकडून गोळीबाराने प्रत्युत्तर
- "ताज'मध्ये एक हजार लोक अडकले, विदेशी महिलेचा मृत्यू, जखमींमध्ये १० परदेशी नागरिक असल्याचा संशय
- मेट्रो ते कामा रुग्णालयादरम्यानच्या रस्त्यावरही चकमक
- "ओबेरॉय' व "सेंटॉर'वरही अतिरेकी हल्ला
तू थांबू नको रे..पावसा तू बरसतच रहा
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरासू नकोस
तू बरासलस तर
ती अडकून बसेल
तू थांबावा म्हणून माझे
पत्र ती हातात घट्ट पकडून बसेल
काही क्षण तुझ्या थांबण्याची ..
मग ती…ती वाट पाहील
निघेल मग पावसात ती
सावरत सावरत ती माझ्या कडे येईल
ती आल्यावर मग शांतच राहील कदाचित
ओढणिने चेहरा पुसत, थंडीने कूडकुडत
म्हणेल “माफ कर.मला उशीर झाला
मी निघालेच होते पण पाऊस आला”
मी माझा जॅकेट तिला देईल,
ती म्हणेल नको रे मी ठीक आहे.
हळूच मी तिचा हात हातात घेईल,
मी म्हणेल या बरसनाया पावसाप्रमाणे
तू माझ जिवनात सुख होऊन बरसशील ?
तिला खूप आनंद होईल.ती लाजेल ही थोडीशी
पण हळूच डोळ्यात तिच्या आसवे येतील कदाचित,
घरचे काय म्हणतील हा विचार तिला पडेल.
माझे जॅकेट मला परत करून.
निशब्द होऊन निघून जाईल ती
निशब्द मला करून तोडून जाईल ती
तू थांबू नको रे
पावसा तू बरसतच रहा
ती नाही आली तरी चालेल मला
तिच्या नकारा पेक्षा …
ती तुझ्या मूळे नाही आली
असे खोट खोट..
मनाला समजावन आवडेल मला….”"
तू थांबू नको रे
तू बरसतच रहा
निशब्द (देव)
30 October 2008
"युलिप'चे काय कराल?
आयुर्विमा ही गुंतवणूक समजणाऱ्या सर्वसामान्य भारतीयांना विमा क्षेत्राच्या खासगीकरणानंतर "युलिप' ही म्युच्युअल फंडाप्रमाणेच शेअर अथवा रोखे बाजारातील गुंतवणुकीशी निगडित विमा पॉलिसी उपलब्ध झाली आणि मरगळलेल्या विमा क्षेत्राला जणू नवसंजीवनीच प्राप्त झाली. या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या खासगी कंपन्या, त्यांचे विक्री अधिकारी, विमा प्रतिनिधी, वाढत गेलेला शेअर बाजाराचा निर्देशांक, लॅपटॉपवर तयार केलेले कागदी घोडे आणि विमा घेणाऱ्यांचा त्यावर बसलेला विश्वास, या सर्वांमुळे या प्रकारची पॉलिसी अल्पावधीत लोकप्रिय झाली नसती तर ते एक आश्चर्यच ठरले असते; पण आज जेव्हा शेअर बाजाराचा निर्देशांक झपाट्याने नऊ हजारांखाली घसरला आहे, तेव्हा मात्र या पॉलिसीसंबंधी नव्याने विचार करणे आवश्यक ठरते. फक्त तीन वर्षे पैसे भरले की झाले, या समजुतीने जर कोणी ही पॉलिसी घेतली असेल व तसेच करण्याचा त्यांचा विचार असेल तर ते चुकीचे ठरू शकेल.
सध्या शेअर बाजाराचा निर्देशांक खाली आल्यामुळे बहुतेक "युलिप' योजनांच्या किमतीसुद्धा उतरल्या आहेत. ज्यांनी या प्रकारची पॉलिसी कोणत्याही खासगी अथवा सरकारी कंपनीकडून घेतली असेल, त्यांनी पुढे दिलेल्या सूचना पाळल्यास त्यांना चांगला फायदा होऊ शकेल.
१) तीन वर्षे पूर्ण झाली असली किंवा नसली, तरी पुढचे हप्ते भरणे थांबवू नका. जेवढ्या मुदतीची पॉलिसी असेल, तितकी वर्षे हप्ते भरणे शहाणपणाचे ठरेल. तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे जर कोणी हप्ते भरणे थांबवले असेल, तर त्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करणे उत्तम. काही वेळा नवीन पॉलिसी घेण्यास सांगितले जाते; पण तसे न करता असलेल्या आधीची पॉलिसीच पुन्हा सुरू करा. कारण नवीन पॉलिसी घेतल्यास पुन्हा पहिल्या वर्षी भरमसाट शुल्क भरावे लागेल.
२) जर आपला एकूण वार्षिक हप्ता पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर जितके जास्त पैसे "टॉपअप' पद्धतीने भरणे शक्य असेल व कंपनीच्या नियमात बसत असेल तेवढे भरावेत. कारण या पॉलिसीमध्ये आस्थापना शुल्क दर महिन्याला युनिट्सच्या रूपात कापून घेतले जाते, ते टक्केवारी पद्धतीने नसून त्याची रक्कम निश्चित असते. त्यामुळे आपल्याला भराव्या लागणाऱ्या शुल्काची टक्केवारी कमी होईल व भविष्यात होणारा फायदा चांगला असू शकेल. उदा. समजा आपल्या युलिपची फंड व्हॅल्यू रु. १२००० आहे. आपला हप्ता रु. १०००० प्रतिवर्ष असेल आणि पॉलिसीची एनएव्ही रु. १२ प्रति युनिट आहे आणि आस्थापना शुल्क रु. ५० प्रतिमाह असेल तर पुढे दिल्याप्रमाणे शुल्क आकारले जाईल.
आस्थापना शुल्क (युनिट्सच्या रूपात) = आस्थापना शुल्क एनएव्ही
तक्ता क्रमांक १ (टॉपअप न करता)
तारीख-एनएव्ही-युनिट्सची संख्या-फंड व्हॅल्यू-आस्थापना शुल्क युनिट्सच्या रूपात
१ ऑगस्ट ८-१२-१०००-१२०००-४.१७
१ सप्टेंबर ८-११-९९५.८३-१०९५४.१३-४.५४
१ ऑक्टोबर ८-१०-९९१.२९-९९१२.९-५
तक्ता क्रमांक २ - टॉपअप केल्यास
तारीख-एनएव्ही-युनिट्सची संख्या-फंड व्हॅल्यू-आस्थापना शुल्क युनिट्सच्या रूपात- टॉअप रक्कम
१ ऑगस्ट ८-१२-१०००-१२०००-४.१७-
१५ ऑगस्ट ८-११.५-४३४.७८- - -५०००
१ सप्टेंबर ८-११-१४३०.६१-१५७३६.७१-४.५४-
१ ऑक्टोबर ८-१०-१४२६.०९-१४२६०.९-५-
---------------
दोन्ही तक्त्यांचा अभ्यास केल्यास हे दिसून येईल, की आस्थापना शुल्काच्या रूपाने दोन्ही परिस्थितीमध्ये ४.५४ व ५ युनिट्सच कापले गेले आहेत. जर पंधरा अथवा वीस वर्षांच्या मुदतीच्या पॉलिसीमध्ये या पद्धतीने टॉपअप करत राहिल्यास जास्त फायदा होऊ शकतो.
३) जर कोणत्याही कारणाने पॉलिसीची मुदत संपेपर्यंत हप्ते भरणे शक्य नसेल, तर कंपनीच्या नियमाप्रमाणे आपली असलेली फंड व्हॅल्यू काढून घ्या. पुढील हप्ते न भरता फंड व्हॅल्यू तशीच राहू दिल्यास एखादेवेळी तुमच्या पॉलिसीची व्हॅल्यू शून्यसुद्धा होऊ शकेल. कारण विमा कंपनी आकारत असलेले आस्थापना शुल्क, विमा शुल्क, फंड व्यवस्थापन शुल्क तुम्ही पुढचे हप्ते भरले नाहीत, तरी तुमच्या फंड व्हॅल्यूमधून वसूल केले जातच राहणार; पण फंड व्हॅल्यू काढून घेतल्याने तुमचे विमासंरक्षण संपणार आहे हे लक्षात ठेवा व त्याची भरपाई नवीन विमा पॉलिसी (टर्म/ एंडोमेंट) घेऊन करण्याचा प्रयत्न करा.
४) नवीन युलिप घेताना कंपनी आकारणार असलेल्या सर्व शुल्काची व आकारण्याच्या पद्धतीची आणि मिळणाऱ्या विमा संरक्षणाची माहिती करून घ्या.
५) करनियोजनासाठी "युलिप'पेक्षा "सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन'द्वारे (एसआयपी) म्युच्युअल फंड गुंतवणूक सयुक्तिक ठरते, कारण एकदा युलिप घेतली, की ती उत्तम परतावा देवो अथवा न देवो कमीत कमी तीन वर्षे हप्ते भरणे आवश्यक असते; पण जर एखाद्या म्युच्युअल फंडाने चांगला परतावा दिला नाही, तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या फंडात गुंतवणूक करता येते.
शेअर बाजारात तेजी-मंदीच्या लाटा येतच असतात. आज खाली गेलेला शेअर बाजाराचा निर्देशांक भविष्यात परत वर जाणार आहेच. त्यामुळे वरील विवेचनाचा उपयोग करून आपापले "युलिप नियोजन' करता येऊ शकेल.
विक्रम देशमुख
26 October 2008
नेहमीचाच पाऊस तसा……
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
कोरड्या झालेल्या मातीत….नाच नाच नाचला….
तेच थेंब,तेच पाणी…
पावसावरचीही तीच गाणी….
गाण्यातला सुर जरा तेवढा….
एकटा एकटा वाटला….
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
पाण्यातुन वाहणारी कागदाची होडी….
वाफाळलेला कपातील चहाची गोडी…
कप जुना तसाच… मात्र….
चहातलाच गोडवा आटला……
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
रस्त्यावरचा नकोसा चिखल सारा…..
घरा-घरात घुसणारा सोसाटयाचा वारा…
घरं अगदी तशीच उभी….
वाराच कसा दिशा भरकटला…..
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
पावसामुळेच काय ते.. प्रेम-बिम जमलं होत……
एका हाताने…. दुस-या हाताला हळुच हातात घेतलं होत……
प्रेम कधीचच संपल….
कारण हातच कायमचा सुटला…..
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
अश्रुंना तुझ्या या आवर रे आता….
दु:खातुन तु जरा सावर रे आता….
अश्रु कधीचेच आटले हो….
एक थेंब फक्त्त डोळ्यात साचला…..
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
पावसावरती कविता लिहीन म्हणालो….
ओलं चिंब अंग करीन म्हणालो…..
ओलं चिंब होण्याआधीच….
पाऊसच संपला…..
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
—-ललित
17 October 2008
दिवसा स्वप्ने बघतो मी...
रात्री जागत बसतो मी...
उगाच कविता करतो मी
जगात वेडा ठरतो मी...
मनात इमले रचतो मी
आशेवरती जगतो मी...
असतो तेथे नसतो मी
मलाच शोधत बसतो मी...
वरवर नुसते हसतो मी
'अजब' मनाशी कुढतो मी...
06 May 2008
मन वळवण्याची कला
दुसऱ्या व्यक्तीकडून काम करून घेण्याचे किंवा समोरच्यावर इम्प्रेशन करण्याचे दोन सरधोपट मार्ग सगळ्यांना परिचत आहेत. एक म्हणजे दादागरी करणे व दुसरा म्हणजे "मस्का' मारणे. पण आपल्या सभोवती असणाऱ्या नानावध स्वभावाच्या व्यक्ती केवळ वरील दोन धोरणांचा वापर करून वागवता येत नाहीत. त्या व्यक्तींना आपलंसं करण्यासाठी, आत्मीयता नर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या धोरणांचा व विविध कौशल्यांचा परस्पर मेळ घालून प्रभावी वापर आपल्याला करता यायला हवा.
आपला प्रभाव पाडण्यासाठी सकारात्मक देहबोली, आपला आत्मवश्वास, योग्य शब्दांची योग्य वेळी पेरणी आपल्याला जमायला हवी. त्यासाठी जयंतचं उदाहरण लक्षात घेऊ. जयंतचा शैक्षणक आलेख तसा ठीकठाक, पण हाती घेतलेलं काम चिकाटीनं पूर्ण करण्याची वृत्ती व ऑफिसच्या कामासाठी फिरण्याची प्रचंड तयारी या त्याच्याकडील दोन महत्त्वाच्या जमेच्या बाजूंमुळे त्याने कामाच्या ठिकाणी फार कमी कालावधीत मोठी मजल मारलेली आहे. "त्याला हे कसं काय जमतं?' असा प्रश्न त्याचा सबऑर्डनेट सुजय- जो नुकताच ऑफसमध्ये जॉईन झालाय- त्याला नेहमी पडतो. सुजयने शेवटी जयंतला वचारलंच, ""कसं काय जमतं बुवा तुला हे?''
जयंतने उत्तर देण्यापूर्वी सुजयच्या नजरेला नजर दली. त्याच्या चेहऱ्यावर छानसं हसू चमकलं. तो थोडा पुढं झुकला आण सुजयच्या खांद्यावर थोपून म्हणाला, ""तुलाही जमेल दोस्ता! त्यात काय अवघड आहे?'' मग पॉज घेतला व पुढं म्हणाला, ""चल, मी तुला शिकवतो. पण फी द्यावी लागेल बरं का! आण डाऊन पेमेंटवर मी पन्नास टक्के डिस्काउंट देतो. बोल, आहेस का तयार?'' सुजय थोडा भांबावला व जयंतच्या बोलण्याचा अर्थ क्षणात लक्षात येऊन त्याच्याबरोबर हसण्यात सामील झाला व नकळत टाळी देण्यासाठी (जयंतला) हात पुढे झाला.
साहजिकच जयंतच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचा सुजयवर धनात्मक परिणाम होऊन त्याला जयंतबद्दल आपलेपणा वाटायला लागला.''खरं म्हणजे भावनिक पातळीला हात घालून, पण तर्कवचारांची कास न सोडता इतरांना पटवायला आपण शकलो तर समोरची व्यक्ती आपल्या भावना समजून घेते आहे, ही सुखद व दिलासा देणारी जाणीव नर्माण होऊन आत्मीयता व जिव्हाळा वाढतो व आपला प्रभाव समोरची व्यक्ती आनंदाने स्वीकारते. समोरच्या व्यक्तीला आपलं मत पटवायचं असेल तर समोरच्याचं संपूर्ण बोलणं लक्षपूर्वक ऐकण्याचं कौशल्य आपल्याला विकसत करणं गरजेचं आहे. तसेच आपल्या दोघांचं कशावर एकमत आहे, याचा शोध घेऊन त्यावर चर्चा करण्यामुळे सहअनुमतीचं वातावरण नर्माण होतं. त्यासाठी युक्तिवाद अत्यंत प्रभावी ठरतो. त्यासाठी आपला स्वर भांडणाचा नसावा, तसेच आपल्या परस्पर नातेसंबंधात विश्वासार्हता, पारदर्शीपणा व जुळवून घेण्याची तयारी असायला हवी व त्यासाठी प्रांजळ व मोकळा संवाद हवा. त्यामुळे धारदार शब्दांच्या शस्त्रानं वार करण्याऐवजी आपल्या आजूबाजूचे व आपण नःशस्त्र होण्यावर भर दिला तर "पटवणे' सहज शक्य होतं.अर्थात हे पटवण्याचं कौशल्य कॉपारेट मीटिंगमध्ये जास्त उपयुक्त ठरतं. कारण तर्कशुद्ध विचारांना त्या ठिकाणी प्राधान्य असतं.
समोरच्याला पटवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे "तुझे मत काय?' हा प्रश्न विचारणं. आपलं स्वतःचं मत लादण्यापेक्षा त्याला त्याचं मत मांडू देणं आवश्यक असतं. त्याच्या मताचा आदर ठेवून त्यानं मांडलेल्या मनातील महत्त्वाचे व आवडलेले विचार त्याला सांगून आपल्याला त्या संदर्भात आलेले विचार व साम्य असलेल्या विचारांची मांडणी करायची. जी काही भन्नता जाणवेल त्याचं मनमोकळेपणाने शंकानरसन करायचं. बघा, आपोआप समोरची व्यक्ती आपला प्रभाव मानू लागते.थोडक्यात काय, तर दुसऱ्यांना पटवण्याच्या वाटेने जाणाऱ्या या मार्गावरून चालून पाहा व आपला करिअर ग्राफ अधिक उंचवा!
27 April 2008
नेतृत्व कसं हवं?
चांगल्या नेतृत्वाचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असतो. पुढे काय होऊ शकेल, याचा आडाखा तो बांधू शकतो. असं नेतृत्व एखाद्या संस्थेत असलं तर त्यामुळे त्या संस्थेपुढे असणाऱ्या आव्हानांचे डोंगर तो लीलया पार करू शकतो.
यशस्वी नेता आपल्या भोवतालच्या लोकांमधलं उपजत ज्ञान आणि गुण ओळखून त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देतो. त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करून काम करण्यासाठी अधिकाधिक लोक कसे प्रवृत्त होतील आणि व्यवसायाला चालना मिळेल याकडे तो लक्ष पुरवतो. नेतृत्वगुण अधिक आदर्श होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या या काही गोष्टी-
स्वओळख
प्रथम आपल्यातलेच बरे-वाईट गुण ओळखायला शिकणं. ते गुण ओळखून त्यातल्या चांगल्या गुणांवर भर देत वाईट गुणांवर मात करावी. आपली कार्यशक्ती जोखून त्याप्रमाणे आपली प्रतिमा तयार करावी. प्रतिमा तयार झाली तरी कायम त्यातच अडकून पडू नये. त्यातही एक नेमकी दिशा पकडून त्या दृष्टीनं वाटचाल करायला हवी. इतरांना दिशादर्शन करण्याआधी स्वत:ची योग्य दिशा ठरवायला हवी.
दूरदृष्टी व ध्येयनिश्चिती
कामाच्या ठिकाणी नेत्याने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते. त्याचा फायदा पुढे कंपनीलाच होतो. नेत्याने आपल्यापुढे काही ध्येयं निश्चित केली, तर त्यातून त्याची दूरदृष्टी दिसून येते. कंपनीला ठोस यश मिळवून द्यायचं असेल तर त्यासाठी ध्येयनिश्चितीतही वेगवेगळे आडाखे बांधावे लागतात. त्यातले काही पल्ले जवळचे तर काही पल्ले लांबचे असतात.
परिणामकारक सुसंवाद
एक नेता म्हणून तुमच्यावर, तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येयधोरणांवर लोकांनी विश्वास ठेवायला हवा. नेत्याचा दृष्टिकोन प्रत्यक्षात यावा हा त्याच्या टीमचाही दृष्टिकोन असायला हवा. त्यासाठी एकमेकांवरचा विश्वास, लोकांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची हातोटी नेत्याजवळ असायला हवी. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांशी सातत्याने संवाद राखायला हवा.
मार्गदर्शक
नेतृत्व करणाऱ्याने स्वत: आपल्या कामाच्या बाबतीत सजग राहायला हवे. तो तसा वागला, की आपोआपच इतर सहकारीही कामाची हयगय करीत नाहीत. प्रत्येकाला त्याच्या आवाक्यातलं आणि क्षमतेचं काम वाटून दिलं तर काही गोंधळ न उडता ते होऊ शकतं. फक्त "आदेश' सोडून काम होतं असं नाही, तर त्या व्यक्तीला त्या कामात गोडी वाटायला हवी. त्याच्याकडून नेत्याने ते काम करवून घेतलं पाहिजे. प्रसंगी सहकाऱ्यांचं मत आणि विचारही ऐकून घेतले पाहिजेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांवर विचार केला पाहिजे.
लोकांना त्यांच्या कामात पारंगत करणं आणि त्या कार्यक्षमतेचा योग्य रीतीनं वापर करून घेणं, ही नेत्याची प्राथमिक जबाबदारी मानण्यात येते. अशा वेळी नेत्यानं मार्गदर्शक होऊन काम करून घेतलं पाहिजे.
बदलाचा स्वीकार
बदलत्या काळानुसार नेतृत्वगुणांत होणारे व होऊ घातलेले बदल स्वीकारायला हवेत. बदल हे अपरिहार्य असतात, हे वास्तव स्वीकारायला हवं. जॅक वेल्स यांच्या मते, बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असताना संस्थेतल्या बदलांचा वेग मंदावला असेल, तर... नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असं समजावं. स्थैर्यापेक्षा अस्थिर असतानाच एखादा उद्योग अधिक प्रगती करतो हे ध्यानी ठेवावं. म्हणूनच बदलाचं दडपण किंवा भीती न बाळगता त्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहणारा आणि सहकाऱ्यांनाही ती सकारात्मकता दाखवणारा नेता होणं गरजेचं आहे.
नेतृत्वगुण
फक्त एमबीएची पदवी घेतली म्हणजे नेतृत्व करता आलं असं नाही, पण त्याचं रीतसर शिक्षण घेतलं तर आपले गुण उंचावायला थोडी मदत होते. शिवाय नेतृत्वगुण नेमके कसे असावेत, व्यवस्थापन कसं करावं, आपलं वागणं-बोलणं कसं असावं आदी गोष्टींचं ज्ञान व्हायला हवं. अशा प्रकारे नेतृत्वगुण अंगी बाणवून कंपनीचं भलं करणाऱ्या नेतृत्वाचीच संस्थांना गरज असते.
- मोनिका दोशी
22 January 2008
सॉफ्ट स्कील्स
""सॉफ्ट स्कील्स म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावी ठरू शकणाऱ्या असंख्य छटा, समूहात वावरतानाचे आत्मभान आणि सकारात्मक दृष्टिकोनासाठी घेतलेले विशिष्ट कष्ट.''
सॉफ्टस्कील्स आत्मसात करण्यामुळे आपला "करिअर ग्राफ' उंचावतोच; शिवाय व्यक्तिगत प्रगती होऊन आर्थिक व मानसिकदृष्ट्या संपन्न जीवन जगणे शक्य होते.
आपल्या प्रत्येकाला करियरमध्ये हार्ड स्कील्स व सॉफ्टस्कील्सची गरज असते. हार्डस्कील्स म्हणजेच आपली शारीरिक क्षमता व उपलब्ध व वापरात असलेले तंत्रज्ञान यांच्याशी निगडित कौशल्य. व्यावसायिक व व्यावहारिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हार्ड स्कील्सबरोबरच सॉफ्ट स्कील्स वापरणे आपल्या फायद्याचे ठरते. ही सॉफ्टस्कील्स प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित विकसित करता येतात, ही महत्त्वाची सॉफ्ट स्कील्स पुढीलप्रमाणे-
सर्जनशीलता - सर्जन म्हणजेच नवनिर्मिती. आपल्या प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात सर्जनशीलता असते. आपल्या रोजच्या कामासंदर्भात नावीन्य व थोडी कल्पकता आणली, तर कामाचा कंटाळा न येता कामातील गोडी टिकून राहते.
प्रेरणा - आपल्या कृतीमागचा हेतू म्हणजेच प्रेरणा ः सकारात्मक प्रेरणा ध्येयापर्यंत पोचविण्यास मदत करते. बाह्य प्रेरणेपेक्षा अंतःप्रेरणेमुळे कामात रस निर्माण होतो, कामाची गुणवत्ता व दर्जा सुधारतो. आपल्या कार्यप्रवणतेला विरोध करणारे अडथळा ठरणारे घटक अंतःप्रेरणेच्या साह्याने दूर करता येतात.
भावनिक बुद्धिमत्ता - आपल्या सर्वांना परिचित असलेली बुद्धिमत्ता ही उपजत असते; पण भावनिक बुद्धिमत्ता मात्र प्रयत्नपूर्वक विकसित करता येते. भावनिक बुद्धिमत्ता ही व्यक्तीला समाजाभिमुख बनविते. भावनांचा वापर व हाताळणी कौशल्यपूर्णरीत्या केल्यास स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेऊन त्या नियंत्रित करणे सहज शक्य होते.
निर्णयप्रक्रिया - योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, ही तशी अवघड गोष्ट आहे. पण आपल्या उद्दिष्टांची नेमकी जाणीव विचारांमधील सकारात्मकता, उपलब्ध पर्याय लक्षात घेऊन तर्कसंगतपणे निर्णय घेता येतो. आपण घेतलेल्या निर्णयानुसार ठाम वागण्याची सवय व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता आपल्याला अधिक चांगल्या रीतीने कार्यप्रवृत्त करते.
प्रभावी देहबोली - कामाच्या ठिकाणी योग्य रीतीने संवाद साधणे आवश्यक असते. त्यामध्ये बोलणं आणि शारीरिक हालचाली यांची एकत्रित सांगड असते. शारीरिक हालचाली म्हणजेच आपली देहबोली. या देहबोलीतून आपल्या प्रत्येकाच्या मनातील गोष्टी नकळतपणे दृश्यरूपात प्रकट होत असतात. आपल्याला इतरांबरोबर सौहार्द्रता व मैत्री वाढविण्यासाठी प्रभावी देहबोली वापरणे व त्याचा अर्थ जाणून घेणे, खूप मदतीचे ठरते. आपल्या देहबोलीचा योग्य वापर करून आपण इतरांशी उत्तम संवाद साधू शकतो.
समस्यापरिहार कौशल्य - बऱ्याच वेळा आपल्याला आपले ध्येय किंवा उद्दिष्ट ज्ञात असूनसुद्धा त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सापडत नाही, तेव्हा समस्या निर्माण होते. बऱ्याचदा आपण चाकोरीबद्ध वागत असतो. त्यामुळे आपल्या कार्यशैलीत व वागण्यात ताठरता येते. त्यामुळे समस्या न सुटता, गुंतागुंतीची बनते. पण विचारातील लवचिकता व विविध पर्यंयाचा वापर केला, तर समस्या सुटणे सहज शक्य होते.
संघभावना जोपासणे - कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांशी समजूनउमजून संवाद साधताना आपल्या सहकाऱ्यांचे काम करण्याचे "स्पिरिट' आपल्यामुळे कमी होऊ नये याची काळजी घेता यायला हवी. जर कामाच्या ठिकाणी आपल्या टीममध्ये काही दोष असतील, तर ते कमी करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कारण जर टीममध्ये आपण काम करत असू, तर यश-अपयश सारं काही टीमच असते. आपल्याला येणाऱ्या गोष्टी आपल्या सहकाऱ्यांना शिकविण्याची तयारी आपल्याकडे हवीच; पण इतरांकडील नवीन गोष्टी आपल्याला शिकून घेता आल्या पाहिजेत. त्यामुळे संघभावना जोपासण्यासाठी आपण सतत नवीन शिकण्याची तयारी ठेवताना आपली कौशल्यं इतरांनाही कशी आत्मसात करता येतील यासाठी आवश्यक असणारी प्रयत्नशील वृत्ती जोपासायला हवी.
करिअरग्राफ उंचावताना ही मूलभूत सॉफ्टस्कील्स आपल्याला माहीत नसणं आणि वापरता येणं आवश्यक आहे. या स्कील्सच्या बरोबरीनं वाटाघाटी करण्याचं (निगोसिएशन) कौशल्य, बिझनेस एटिकेट्स, कामातील प्रामाणिकपणा, नेतृत्वक्षमता, सतत शिकण्याची वृत्ती, कामासंदर्भात पूर्वतयारी व नियोजनतज्ज्ञांची गरज असते. आपण प्रत्येकाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच ही वेगवेगळी सॉफ्टस्कील्स विकसित केली तर करियरचा ग्राफ हा नेहमी उंचावत चाललेला दिसेल, हे नक्की !
Popular Posts
-
कोथळीगड प्रकार: गिरिदुर्ग मध्यम डोगररांग : भीमाशंकर जिल्हा : रायगड. कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ की.मी. अंतरावर आहे. स...
-
किल्ले विसापूर लोणावळा- मालवली पासून हाकेचा अंतरावर असणारा विसापूर किल्ला लोहागडच एक भाग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील ८०% ते ९०%...
-
एखादी संस्था प्रगती करते तेव्हा त्यात तिच्या नेत्याचा सिंहाचा वाटा असतो. खरं तर सर्व कर्मचाऱ्यांचाच वाटा असतो, पण या कर्मचाऱ्यांकडून हवं ते ...
-
"ज्या वेळी इतर लोक घाबरलेले असतील, त्या वेळी तुम्ही बाजारात प्रवेश करा आणि याउलट ज्या वेळी इतर लोक खरेदीसाठी अधीर असतील त्या वेळी तुम्ह...
-
पटवणे ' हे व्यवस्थापन विकास प्रशिक्षणातील एक महत्त्वाचं कौशल्य आहे. मॅनेजमेंटच्या भाषेत "निगोशिएटिंग' किंवा' इन्फ्ल्युएन्सि...
-
Diwali or Dipavali a significant festival in Hinduism, Buddhism, Sikhism, and Jainism, and an official holiday in India. Adherents of thes...
-
1. Freecycle: Everyone has at least a few items that they don't really want but can't bear to throw away. Free cycle it. Free cyc...
-
Rajmachi Fort Trek - किल्ले राजमाची भटकंती राजमाची प्रकार : गिरिदुर्ग, मध्यम डोंगररांग : लोणावळा पुणे. सह्याद्रीच्या लोणावळा खंडाला ...