मुंबई - येथील कुलाब्यातील ताज हॉटेल, व्हीटी स्टेशन सेंट्रल हॉल, सीएसटी, नरीमन पॉंईंट या चार ठिकाणी दहशतवाद्यांनी मशीनगने नागरिकांवर अंधाधुंद केलेल्या गोळीबारात २० जण जखमी झाले आहेत.
गोळीबार झालेल्या सर्व ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. शहरातील अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक तसेच रस्ते बंद झाले आहेत.
दरम्यान, व्हिटीमध्ये स्फोट होऊन १२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
मुंबई - बुधवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्याने मुंबई हादरून गेली.
- ताजमहाल हॉटेल, कॅपिटॉल सिनेमाजवळ गोळीबार
- नागरिकांमध्ये घबराट
- रात्री १०.२२ च्या सुमारास कुलाब्यात "लिओपोर्ड कॅफे'मध्ये प्रथम गोळीबार.
- त्यानंतर सुमारे पाच ठिकाणी अंदाधुंद गोळीबार; सांताक्रूझ व विलेपार्ले येथे टॅक्सींमध्ये स्फोट
- दहशतवाद्यांनी एके-४७ मधून हल्ला केला असल्याचा संशय
- रस्त्यावर अनेक ठिकाणी रक्ताचा सडा
- जखमी पोलिसांना नागरिकांनी स्कूटरवरून रुग्णालयात नेले
- दहशतवाद्यांच्या खांद्यावर सॅक व हातात रायफली असल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती
- रस्त्यावर अनेक ठिकाणी पुंगळ्या
- कुलाबा, फोर्ट परिसरात हल्ल्यानंतर दहशतीचे वातावरण, रस्त्यावर बूट-चपलांचा खच
- मध्य रेल्वेच्या हार्बर व मुख्य मार्गावरील वाहतूक रोखली. प्रचंड गोंधळाचे वातावरण
- ताज हॉटेलमध्ये दहा अतिरेकी, हॉटेल ताब्यात घेण्याचा प्रयत्न
- अतिरेक्यांचा टेरेसवरून हल्ला
- "लष्कर-ए-तोयबा'कडून आत्मघाती हल्ल्याचा संशय
- रात्री साडेअकरा वाजता सशस्त्र पोलिस व निमलष्करी दलाचा हॉटेलला वेढा
- हॉटेलमधून दोन हॅंडग्रेनेड फेकण्यात आले.
- हॉटेलच्या सुरक्षा दलांकडून गोळीबाराने प्रत्युत्तर
- "ताज'मध्ये एक हजार लोक अडकले, विदेशी महिलेचा मृत्यू, जखमींमध्ये १० परदेशी नागरिक असल्याचा संशय
- मेट्रो ते कामा रुग्णालयादरम्यानच्या रस्त्यावरही चकमक
- "ओबेरॉय' व "सेंटॉर'वरही अतिरेकी हल्ला
Airavatesvara Temple - UNESCO World Heritage Site
11 years ago
No comments:
Post a Comment