Showing posts with label प्रतिक्रिया. Show all posts
Showing posts with label प्रतिक्रिया. Show all posts

03 November 2009

ट्रेकर कसा ओळखावा

खरेतर हा आहे फॉरवर्ड ई मेल. कदाचित मुंबईतल्या कुणीतरी हौशी ट्रेकरने बनवलेला. निनावी...पण, खूप छान आहे. श्रावणात ट्रेकिंगची खरी बहार. त्यामुळंच तो इथं देत आहोत...(लक्षणे तुम्हीही वाढवायला हरकत नाही...!!!)
ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा :-

  1. शनिवार रविवार घरी आराम करायचं सोडून जो कष्ट करतो... तो ट्रेकर.
  2. सोमवारी उशीरा कॉलेजला किंवा ऑफिसला येतो तो ट्रेकर.... सोमवारी दुपारनंतर सापडेल त्याला ट्रेकची माहिती आणि चढलेले आणि उतरलेले कडे, मधेच सापडलेला साप, त्याला परत जंगलात कसे सोडले, वाघाच्या पंजाचे ठसे दिसले पण वाघ नाही दिसला हे सांगत आजुबाजूच्या कन्यांचे लक्ष वेधू इच्छिणारा तो ट्रेकर....
    यांना सिनेमाला नेले तरी करिष्मा कपूरकडे न बघता मागचे डोंगर कुठले आहेत.... नानाचा अंगठा कुठला, ढाकच्या बहिरीला जायला कुठे ट्रॅव्हर्स मारायला लागतो हे बघतात आणि दुसर्‍यांहे लक्ष करिष्मावरून विचलित करत बसतो... तो ट्रेकर. LOL .......... गमतीचा भाग सोड्ला तर ..........
  3. चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काही ना काही कीडे केलेले असतात. त्यातही French beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या. काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)
  4. केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)
  5. वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
    सोमवार ते गुरुवार:
    चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टू म्हणतात. त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.

    शुक्रवार रात्र: निघायची तयारी ...ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट , Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट , कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर / मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)

    शनिवार दुपार ते रविवार दुपार:
    वर उघडाबंब , डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट ...काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)

  6. सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
    सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय ...नाईलाजाने.
    शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली ... ही trek साठी भेटण्याची जागा.
    शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, इ. इ. S T stand
    शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह अन्य विशेष लकबी:हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात , पण ९० % वेळा दुसऱया club बरोबर ट्रेकला जातात :)
    ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत .... साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात. कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो. पण किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :) त्यातही त्यांची फारशी चूक नसते. रात्री उशिरा निघणे, वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)
    बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात : आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप इत्यादी इत्यादी

    यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते , एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी, तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी , तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :) यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते : यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते . एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :) सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .

  7. खाण्या पिण्याच्या सवयी:
    कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)
    काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड . बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :) पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते . बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही

  8. गडावर असताना यांची करमणुकीची साधने:
    खणखणित आवाजात पोवाडे गाणे, जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे, बैटिंग ला जाणे :)(बॅटिंग म्हणजे क्रिकेटमधील नाही. सक्काळी सक्काळी खुल्या आभाळी एखाद्या आडोशाच्या पिचवर जी होते ती.)

  9. यांची दैवते:
    off course शिवाजी महाराज, रायगडचा जगदीश्वर, हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर इ . इ .

  10. यांची तिर्थस्थळे:
    राजमाचीचा तलाव, बाण चा ब्लू लगून, नाणे घाटातील केव्ह, कोंकण कडा इ . इ .
    आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे निम् (नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)

  11. ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज यांना मुली आवडत नाहीत

खंजीर का खुपसला? : शिवसेनेवर नाराज मराठी तरुणांची प्रतिक्रिया

मराठी माणसानेच शेवटी पाठीत खंजीर खुपसल्याचा निष्कर्ष ‘सामना’मधून काढण्यात आल्यामुळे लालबाग, परळ येथीलच नव्हे तर जोगेश्वरी पूर्व पासून ते भांडूपपर्यंत अनेक मराठी तरुण सध्या शिवसेनेवर नाराज आहेत. खंजीर पाठीत नाही पोटात खुपसल्याची उघड प्रतिक्रिया अनेक तरुणांनी लोकसत्ताकडे व्यक्त केली. मुळात लालबाग-परळसारख्या कट्टर मराठी विभागांमध्ये टोलेजंग टॉवर उभे राहताना आणि त्यात अमराठी श्रीमंत राहायला येताना शिवसेनेचे आमदार काय करीत होते, असा सवालही अनेक तरुण करू लागले आहेत.
लालबाग-परळ म्हणजे मराठी माणूस असे समीकरण गेली अनेक वर्षे मुंबईकरांच्या मनात पक्के बसले आहे. माटुंगा दाक्षिणात्यांचा, घाटकोपर गुजरात्यांचा तसे लालबाग-परळ मराठी माणसाचे हे ठरून गेलेले होते. ‘लाडू सम्राट’चा वडा, ‘क्षीरसागर’मधील कोंबडी वडे, ‘गुरुकृपा’मधील कपडे, ‘गौरीशंकर छित्तरमल’ची मिठाई हे मुंबईतीलच नाही तर पार अगदी बांद्यापर्यंतच्या कोकणी माणसाच्याही सांस्कृतिक आयुष्याचा अविभाज्य भाग होते. मात्र गेल्या पाच-सात वर्षांमध्ये लालबाग-परळमध्ये टोलेजंग टॉवर उभे राहायला लागले. मराठी माणसांच्या खुरटय़ा चाळींच्या पहिल्या मजल्यावर पंप लावल्याशिवाय पाणी चढत नसताना या टॉवरमधील स्वीमिंगपूलने सुरुवातीला मराठी माणसाचे डोळे दिपून गेले तरीही यात आपला वाटा काहीच नाही, हे समजल्यावर त्याच्या डोक्यात तिडीक गेल्याचे बाळा उतेकर या परळमधील रहिवाशाने सांगितले. उच्च मध्यमवर्गीय अमराठी लोकांमुळे जीवनावश्यक वस्तुंचे भावही पूर्वीपेक्षा महाग झाले. भाज्या महागल्या आणि शाकाहारी अमराठींनी अनेक ठिकाणी मासळीबाजार उठविण्याच्या क्लृप्त्या सुरू केल्या. मात्र या कशाकडेही सेनेच्या नेतृत्वाने लक्ष न दिल्याची तक्रार आज येथील रहिवाशी करीत आहेत.
परळ येथील सिग्रेट फॅक्टरीचा एस. टी. थांबाही आयटीसीच्या पंचतारांकित सजावटीवर डाग वाटत असल्यामुळे हटविण्यात आला. कोकणातून मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांसाठी व गावाकडच्या नव्या मंडळींसाठी परळचा हा थांबा म्हणजे मोठा ‘माईलस्टोन’ होता. विठ्ठल चव्हाण यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा थांबा हलविल्यावरही शिवसेनेने हूं का चूं केले नाही.
ग्लोबलायझेशनच्या जमान्यात मुंबईतील चमक-धमक दिवसागणिक वाढत असताना मराठी माणसाचे मासिक उत्पन्न मात्र ४०००च्याच घरात राहिल्याने सामान्य मराठी माणसांची प्रत्येक गोष्टीत कुचंबणा होत होती. महागाईच्या फटक्याने कातावलेल्या मराठी माणसाला विरोधी पक्षही महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन करताना दिसत नव्हता, त्यामुळेच मराठी माणसाने शिवसेनेऐवजी मनसेचा पर्याय निवडल्याची प्रतिक्रिया प्रकाश आचरेकर या परळ येथील रहिवाशाने व्यक्त केली.
 गिरणगावातून आज शिवसेनेच्या विरोधात उघड उघड राग व्यक्त होत असतानाच ‘सामना’मधून करण्यात आलेले मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसल्याचे विश्लेषण मराठी माणसांच्या मनाला प्रचंड लागले आहे. मराठी माणूस हलाखीत जगत असताना मराठी माणसांच्या नावे गळे काढणाऱ्या आमदारांच्या दरवाजात गाडय़ा उभ्या करण्यास जागा नाही, अशी परिस्थिती असेल तर हा खंजीर पाठीत नाही तर उघड उघड पोटात खुपसला आहे, असेच मराठी विभागांमध्ये स्पष्ट बोलले जात आहे

श्रीकांत जोशी
९८२११८८०२८
 

12 October 2009

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!

(चित्रपटात बोलू न शकलेलो, असं बरंच काही..!)


महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शरदराव पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेपरिवर्तन घडवतील ही आशा सर्वानाच होती.. पण त्यांनीही सुभेदारांच्याटोळ्या उभ्या करून, त्याचं सेनापतीपद आपल्या घरातच ठेवलं! आजमहाराष्ट्रात राज्य रयतेचं नसून, निवडक चाळीस घराण्यांचंच आहे! स्पष्टचबोलायचं तर आम्हीसुद्धा कधी आमच्या पुत्राला जनतेवर लादलं नाही, किंवात्याच्या गैरकृत्यावर पांघरूण घातलं नाही.. पुढच्या सात पिढय़ांसाठीस्थावर-जंगम मालमत्ता तर कधीच जमवली नाही.. परंतु आज नेत्यापोटी जन्मणंआणि दहावी उत्तीर्ण होऊन अकरा कोटींची माया जमवणं यासारखं सत्कृत्यराहिलेलं नाही! वर सर्व बापजादे त्यात गैर काय, म्हणून विचारताहेत! लाखो,तरुण, बेरोजगार कार्यकर्ते सतरंज्या उचलून वार्धक्यात गेलेले आणि यांचेदुधाच्या दाताचे वारसदार नवे सरदार बनण्याच्या वाटेवर! जगभरातनावाजलेल्या लोकशाहीचं यापेक्षा सुंदर विडंबन कुठलं असणार!

सप्रेम जय महाराष्ट्र!


गेल्या मार्च महिन्यात, महाराष्ट्रातल्या तमाम चित्रपटगृहांतून मीतुम्हाला भेटलो, तुमच्याशी बोललो, तेव्हा देशात लोकसभा होती.. आज पुन्हा भेटावंसं, बोलावंसं वाटतंय तेव्हा नेमकीविधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे!



चित्रपटाच्या माध्यमातून बोलताना खरं तर एक मर्यादा होती सेन्सॉरची! दचकूनका, माझ्याप्रमाणेच तुम्हालाही सेन्सॉरला ‘पूर्वपरिनिरीक्षण’ असा मराठीशब्द आहे हे पटकन आठवणार नाही! आणि चित्रपटात जेवढं मराठी बोलतो, तेवढंआज बोलणारही नाही. महाराष्ट्रातील तमाम जनता इंग्रजी, हिंदी मिश्रितमराठी बोलते, तशाच भाषेत मीही बोलणार आहे.. त्यामुळे धक्का बसून भावनादुखावल्या म्हणून माझे वंशज पाईक म्हणून वर्तमानपत्र जाळणं, संपादकांनाबडवणं किंवा कार्यालयाची नासधूस करणं असलं काहीही करू नका! हात जोडूननम्र विनंती, की माझ्या वतीने तुम्ही बोलूही नका!



ऐन निवडणुकीच्या वेळीच मी तुमच्याशी बोलायला का आलोय? कारण निवडणुकाम्हणजे राज्याभिषेकाचीच तयारी आणि तुमच्याप्रमाणेच आम्हीही ‘राजे’ होतो,पण कारभार अष्टप्रधान मंडळाच्या सल्लामसलतीनेच चालायचा.. हल्लीच्यालोकसभा, विधानसभा म्हणजे अष्टप्रधान मंडळाचाच आधुनिक अवतार.. मला नेहमीआश्चर्य वाटतं ते याचं, की या काळाला अनुरूप अशी ‘लोकशाही’ ही अत्यंतसमर्पक पारदर्शक व लोकप्रतिनिधित्व असलेली व्यवस्था भारतासारख्यास्वतंत्र सार्वभौम देशाने स्वीकारल्यानंतरही काही लोक ‘शिवशाही’ आणू,रामराज्य आणू असं का म्हणतात? आम्ही स्वराज्याची हाक दिली तेव्हाही आम्हीलोकांनी ‘रामराज्य’ आणू वगैरे म्हटलं नव्हतं.. सगळ्यांनी मिळून‘स्वराज्य’ स्थापू असं म्हटलं. एकीकडे ‘लोकशाहीवर विश्वास नाहीम्हणणाऱ्या या लोकांना लोकशाही पद्धतीने ‘शिवशाही’ आणायचीय, आणि दुसरीकडेरामराज्य आणणारे ‘हे राम’ म्हणतायत!



आज या देशात आणि महाराष्ट्रातही लोकांच्या नावापेक्षा माझ्यासह इतरविभूतींच्या नावानेच राजकीय पक्ष निघाले आहेत! एक महात्मा गांधींच्या, एकमाझ्या, एक प्रभु रामचंद्राच्या, एक डॉ. बाबासाहेबांच्या शिवायमायावतीजी, शरद पवारजी यांचे त्यांच्या-त्यांच्या नावाचे किंवा त्यांच्यानावे चालणारे पक्ष आहेतच! आमच्याकाळी एकछत्री अंमल असूनही कारभार चोखचाले.. आता अनेक छत्रे असूनही जनता मात्र उन्हा-पावसात, थंडी- वाऱ्यातहोरपळतेय, भिजतेय, काकडतेय!



आम्ही स्थापन केलेल्या महाराष्ट्राला काही‘शे’ र्वष होऊन गेली आणिस्वतंत्र भारतभूमीत लोकशाही पद्धतीने संघराज्य स्थापित झाल्यानंतर जीमहाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यालाही आता पन्नास वर्ष उलटून गेली.. यामहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं!परकियांविरुद्ध लढताना वीरमरण येणं हे आम्हाला समजू शकतं, पण एकाचदेशातील लोक प्रादेशिक सीमेवरून एकमेकात भांडतात, लढतात, त्यावरूनत्यात्या राज्याचं सैन्य गोळीबार करतं, माणसं मरतात आणि त्यांची स्मारकंबनतात हे आमच्या समजण्यापलीकडचं आहे.. कारण नंतर तो प्रश्न सुटत नाही,कुणी सोडवतही नाही, पण हुतात्म्यांना वंदन करायला मात्र कुणीच विसरतनाही.. आजच्या भाषेत सांगायचं तर कंपाऊण्ड वॉल बांधताना एक ‘भाऊ’ कामीआला, तर त्याचा फोटो लावून नेमानं वर्षश्राद्ध घालण्यासारखं झालं हे!



खरं सांगायचं तर आम्ही महाराष्ट्र स्थापन केला. आमच्या हयातीत, तोआम्हाला जसा घडविता आला, तसा आम्ही घडवला.. पण आमच्यानंतरही आमच्याचनावानं एवढं राजकारण चालेल हे आमच्या स्वप्नातही नव्हतं.. कुणी म्हणेलआम्ही भाग्यवानच! कारण अ‍ॅलेक्झांडर नेपोलियन, चंगेजखान यांच्या नावानंजगात कुठे एखादी सेना अथवा राजकीय पक्ष अस्तित्वात असल्याचं ऐकलेलंनव्हतं.. पण आमच्या नावे मात्र आहे!



आम्ही ‘स्वराज्य’ स्थापन केलं ते बारा बलुतेदारांसह सर्व जाती-जमातींनाएकत्र करून, त्या वेळच्या ‘मराठा’ प्रांताला धरून, आणि तमाम मराठा गोळाकरून! आणि आता या एकविसाव्या शतकात काही मंडळी आम्हालाच ‘मराठा’ असंजातीचं सर्टिफिकेट लावताहेत.. आमचा भगवा ध्वज भागवत धर्माची पताका,भेदाभेद टाळून समतेचा संदेश देणारा.. पण सध्या तो दहशतीचं निशाण झालाय.आम्ही आमच्या परिस्थिताला अनुरूप गड बांधले. किल्ले बांधले. विसाव्याशतकात, एकविसाव्या शतकात आधुनिक स्थापत्य काम करायचे का आमच्यागडकिल्ल्यांच्या प्रतिकृती करून शाखा, प्रशाखा बांधायच्या? आम्ही सर्दचझालो.. अहो वारसा टिकवायचाच, तर आम्ही जे किल्ले, दुर्ग बांधले त्याचीदुर्दशा, दुरवस्था थांबवा, मुंबईसारख्या आधुनिक शहरात पानाच्या टपरीसारखेगड कसले उभारता? यांच्या मित्रपक्षाने मध्ये ‘विटा’ जमवल्या रामाच्यानावे!

आमच्याप्रमाणे मराठी माणूस हाही एक ‘विषय’ या महाराष्ट्रातच व्हावायासारखे दुर्दैव काय? मराठी माणसावर आम्ही बोललो तर त्या चित्रपटाला तोबागर्दी! आपल्या समस्यांवर, न्यूनगंड नि अहंगंडांवर खूष होऊन टाळ्या वाजवूनघरी जाणारा संपूर्ण भारतवर्षांत ‘असा’ दुसरा समाज नसेल!



आम्ही ऐकलं, त्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारा ‘गाभ्रीचा पाऊस’नामे चित्रपट, प्रेक्षक संख्येअभावी चित्रपटगृहातून उतरवता झाला! चित्रपटउतरवला म्हणून निषेधासाठी पंचवीस मराठी माणसं जमली! (जी चित्रपट बघायलाआली असती तर आंदोलनाची वेळच आली नसती!)



आता या मराठी माणसांसाठी टिळक, गोखले, आगरकरांपासून फुले, शाहू,आंबेडकरांनीही अतीव महत्त्वाचं असं सामाजिक, राजकीय कार्य केलंय.. पण यासर्वाना बाजूला ठेवून त्या शोलेतल्या ठाकूरासारखा हात कापलेला आमचाअर्धपुतळा ठेवून ज्या काही राजकीय आरोळ्या मारल्या जातात, ते ऐकलं कीत्या शोलेतल्या ठाकूराच्या मदतीला जसे कोणी जय-वीरू धावले, तसे माझ्यामदतीला येतील काय असं मनापासून वाटतं! आम्हाला साक्ष ठेवून, आमच्या नावे‘आम्ही मर्द मावळे’ आहोत अशा गर्जना देतात, तेव्हा हसावं की रडावं कळतनाही.. अहो त्यावेळचा आमचा लढा सगळा त्या मावळ प्रांतात एकवटलेला,त्यामुळे मावळातला तो मावळा असा साधा अर्थ होता.. पण यांनी तो विशेषणकरून टाकला! त्याकाळी ‘मर्द’ वगैरे ठीक होतं.. स्त्रिया पडद्यात किंवाघरात असत.. आज स्त्रियाही खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात असताना,ज्या देशाची पंतप्रधान एक स्त्री होती, तिथे सारखे आम्ही मर्द आहोत हेकुणाला सांगता? अहो आम्हाला घडवणारीही साक्षात एक स्त्रीच होती..

माँसाहेबांवरून एक आठवलं.. आमचे गुरू कोण यावरून मध्ये बराच वाद झाला..तो वाद ऐकून आम्ही हसलो! कारण ज्यांना स्वत:ला आपल्याला पाचवी इयत्तेतकोण वर्गशिक्षक होते हे आठवणार नाही, त्यांना माझ्या गुरूचा शोध लावूनकाय साधायचंय? अहो माझ्यासकट रामदास, तुकाराम, आम्ही सर्वजण त्या-त्याकाळात आम्हाला जे-जे म्हणायचं, करायचं ते-ते कर्तव्य करून ‘इतिहासजमा’झालो.. आता तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा की! की अजूनही शिवाजी म्हणतो नितुका म्हणे हेच चालणार?



आमच्या नावे सेना आहे, आमचाच ध्वज आहे, पण भाषा मात्र आमची नाही! बाकीगर्जना, तुताऱ्या, मावळे, जयभवानी सगळंसगळं आहे.. पण कर्तृत्व काय? तरमंडईपासून, रेल्वे स्थानक, विमानतळ सगळीकडे आमचं नाव.. हे कमी म्हणूनत्या ‘वडा-पाव’लाही आमचंच नाव! अशा वेळी तीव्रतेनं जाणवतं, आपल्याहयातीनंतर आपल्या नावे कुणी काही करू नका, असं स्पष्ट लिहून ठेवायला हवंहोतं!



तरीही आम्ही शांत होतो.. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा, संस्कृतीवर्धिष्णु होण्यासाठी ही मंडळी काही करतील असं वाटलं होतं.. पण कपाळभरगंधाचा टिळा, हातात सोन्याच्या अंगठय़ा, मनगटात कडं, गळ्यात ‘चैनी’ अशानव्या रुपात काही मराठी नेते वर्धिष्णु झाले! मराठी वाडय़ा-वस्त्या उठवूनस्थानिक नगरसेवक, आमदार बिल्डर झाले.. वडा-पाव विकणारे रस्त्यावरचराहिले, आंदोलन करणारे पोलिसांचा मार खाऊन आयुष्यभरासाठी जायबंदी झालेआणि या मराठी गादीसाठी थोरली पाती नि धाकटी पाती वेगळी झाली!



मराठी माणूस आजही लोकल आणि बसला लोंबकळत घामेजून, चेंगरून चढत्या भावातप्रवास करतोय आणि सेनापतीपुत्र आणि पुतणे विदेशी वातानुकूल गाडीतूनउडताहेत, उडन खटोल्याशिवाय तर चार पावलंही चालत नाहीत! आम्हीदऱ्या-खोऱ्यातून, काटय़ा-कुटय़ातून आमची सेना वाढवली, यांच्या सेनाधनदांडग्यांच्या नि ऐषोआरामाच्या अंबारीतून वाढताहेत.. आणि हे म्हणेशिवशाहीचे दाखले देणार, आणि यांचे मित्रपक्ष ‘राम’ म्हणत वर आधुनिककुरुक्षेत्र करणार!



हे चित्र एकीकडे, तर दुसरीकडे गांधींचे वारस आमचं स्मारक बांधायलानिघालेत! यांनी तर एकही महापुरुष सोडलेला नाही! आमच्यासह फुले- शाहू-आंबेडकर यांनी ब्रह्मा-विष्णू-महेशासारखे वापरलेत.. हिंदूंना म्हणायचंमुस्लिमांचा धोका, मुस्लिमांना म्हणायचं हिंदूचा धोका, दलितांना म्हणेसवर्णाचा धोका, व्यापाऱ्यांना म्हणे करांचा धोका आणि शेतकऱ्यांना म्हणेशेतमालाचा धोका.. प्रत्येकासमोर एक भूत उभं करायचं आणि ते उतरवण्याचामंत्र आपल्याकडेच आहे, हे दाखवायचं! गांधीचा वापर चलनी नाण्यासारखा करीतकरीत आता त्यांनी चक्क चलनावरच गांधीजींना आणलंय! स्वत: गांधींनी कधीहीपरिधान न केलेली गांधीटोपी हे लोकांना घालत निघालेत.. यांच्यासारखी निबरकातडी मुघल किंवा इंग्रजांकडे असती तर स्वराज्य आणि स्वातंत्र्य दोन्हीकधीच मिळालं नसतं!



आम्हाला आणखी आशा होती, ती गोरगरीब कष्टकऱ्यांच्या बाजूनं उभंराहण्याची.. आजच्या भाषेत डाव्या पक्षांकडून उभं राहण्याची.. पण‘थिअरीत’ खूप मार्क्‍स मिळविणारा विद्यार्थी ‘प्रॅक्टिकल’मध्ये नापासव्हावा, तसं त्यांचं गेली पन्नास र्र्वष चाललंय.. त्यामुळेमहाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात गिरणगाव उद्ध्वस्त झालं, औद्योगिकपट्टे उखडले गेले, कामगारवर्गच नष्ट झाला तरीही कुठेही जनक्षोभ उभाराहिला नाही.. उलट तिथं उभ्या राहिलेल्या रंगीबेरंगी मॉल निमल्टिप्लेक्समध्ये आता त्यांच्याच लढय़ाचा सहानुभूतीदार असणारा‘मध्यमवर्ग’ नवश्रीमंत होऊन चैन करताना दिसतोय.. ‘सामथ्र्य आहे चळवळींचे’हे वचन अभिमानानं मिरविणाऱ्या महाराष्ट्रात आता संघर्षांत्मक कामकरणाऱ्या संघटना संपून, ओव्हरहेड प्रोजेक्टरनं प्रॉब्लेम्स प्रोजेक्टकरून, त्यावर परदेशी फंडिंगमधून काम करणाऱ्या एनजीओज तयार झाल्यात! हा एकवेगळाच ‘फंडा’मेण्टल बदल म्हणायचा!



फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावानं संघर्ष करणारी पिढी या डाव्यांच्यामदतीनं सर्वहारा वर्गाची सत्ता प्रस्थापित करील, असं वाटलं होतं.. पण तेआपसात तू डावा, तू उजवा, तू खादीधारी, तू समरसतावादी या आटय़ापाटय़ा खेळतबसलेत! मराठी सेनेसारखे यांचेही नेते समृद्ध झालेत नि सैनिक मात्रसर्वार्थानं अस्पृश्य राहिलेत!



भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांचे समर्थक‘मला निवडून द्या’, ‘मला मंत्री करा’ अशी सत्ताधाऱ्यांजवळ भीक मागताततुम्ही सार्वभौम घटना लिहिण्यासाठी झटलात? महापुरुषांना दोनदा मरण असतंम्हणतात.. एकदा नैसर्गिक आणि दुसरं अनुयायांकडून! माझ्यासह,भारतवर्षांतले महापुरुष हे याचं ढळढळीत उदाहरण आहे!संभवामि युगे युगे, असं कृष्ण सांगून गेला, त्याप्रमाणे प्रत्येक दशकात,शतकात कोणी ना कोणी अवतार घेईल या अंधश्रद्धेतून आपण सगळे अजून बाहेरयायचे आहोत.. किंवा त्या श्रद्धेतून आम्ही निश्चिंत तरी झालो आहोत!



महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शरदराव पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेपरिवर्तन घडवतील ही आशा सर्वानाच होती.. पण त्यांनीही सुभेदारांच्याटोळ्या उभ्या करून, त्याचं सेनापतीपद आपल्या घरातच ठेवलं! आजमहाराष्ट्रात राज्य रयतेचं नसून, निवडक चाळीस घराण्यांचंच आहे!



स्पष्टच बोलायचं तर आम्हीसुद्धा कधी आमच्या पुत्राला जनतेवर लादलं नाही,किंवा त्याच्या गैरकृत्यावर पांघरूण घातलं नाही.. पुढच्या सात पिढय़ांसाठीस्थावर-जंगम मालमत्ता तर कधीच जमवली नाही.. परंतु आज नेत्यापोटी जन्मणंआणि दहावी उत्तीर्ण होऊन अकरा कोटींची माया जमवणं यासारखं सत्कृत्यराहिलेलं नाही! वर सर्व बापजादे त्यात गैर काय, म्हणून विचारताहेत! लाखो,तरुण, बेरोजगार कार्यकर्ते सतरंज्या उचलून वार्धक्यात गेलेले आणि यांचेदुधाच्या दाताचे वारसदार नवे सरदार बनण्याच्या वाटेवर! जगभरातनावाजलेल्या लोकशाहीचं यापेक्षा सुंदर विडंबन कुठलं असणार!जनहो, कार्यकर्तेहो, तुमच्या धमन्या तापत नाहीत? या अशा ऐतखाऊंच्यापालख्या उचलताना आपण स्वाभिमानच गिळतोय याची जाणीव होत नाही? त्यांनी लाखलादली सुभेदारी, मताधिकार तर आहे ना तुमच्याकडे? जात, पात, वर्ग, पक्ष नबघता रात्रीत मोड येणाऱ्या कडधान्यासारखी, रात्रीत आमदारकी मिळवूपाहणाऱ्या या सर्वच वारसदारांना, मतपेटीच्या वादळातून पाचोळ्यासारखे द्याउडवून! म्हणा, उतरा मातीत, करा काम, खा लाठय़ा-काठय़ा, घ्या थोडे खटलेओढवून, उचला सतरंज्या नि मग मागा आमदारकी! हे करण्यासाठी ‘तुमचं’ मत आहे,वापरा ते!



गेली काही वर्षे नव्हे वर्षांनुवर्षे, शतकानुशतके बघतोय.. आमच्या नावेकुणीही उठावं, आणि वाट्टेल तो धिंगाणा घालावा.. वाट्टेल त्या भाषेतलेखण्या चालवीव्यात.. इतिहासाच्या नावानं वर्तमानात दुकानदारीचालवताहेत.. अंगाची लाही लाही होते.. काही पक्षांनी दिल्ली दरबारी‘लाचार’, तर काही पक्षांनी ‘वडा-पाव खाऊन मारझोड करणारा’, ‘खंडणीउकळणारा’ अशी मराठी माणसाची प्रतिमा करून ठेवलीय..आम्हाला वाटलं होतं, अण्णा हजारे, खैरनार, अविनाश धर्माधिकारीसारखी माणसंकाही ठोस करतील, या भ्रष्ट राजकारणावर.. पण अण्णांना एकीकडे खटलेभरण्याचा उद्योग, दुसरीकडे उपोषणाचा जोडधंदा करायचं व्यसनच लागलंय जणू!



नेमेचि येतो मग पावसाळाप्रमाणे धमकी द्यायची, उपोषण करायचं आणिलिंबू-सरबत पिऊन पुढच्या मोसमाची वाट पाहायची! राजकारणी प्रकरणांची तडलावत नाहीत; पण तुम्ही उपोषण आणि लिंबू-सरबताचं सिलॅबस का करून टाकलंत?खैरनार हातोडा घेऊन बाहेर पडले, धर्माधिकारी राजीनामा घेऊन..खैरनारांच्या हातोडय़ाचा दांडा गोत्यास काळ झाला, धर्माधिकारींना राजीनामापर्व आवडू लागलं.. नोकरीचा राजीनामा देऊन भाजपत गेले, तिथून राजीनामादेऊन सेनेत.. कार्य न करता राजीनामा देण्याची ही नवी चाणक्य नीती असावी!



या निवडणुकीत बंडखोर उभे आहेत.. ‘बंडखोर’ शब्दाचा इतका भुगा कुणी केलानसेल! पूर्वी ‘व्यवस्थे’विरोधात उभे राहणारे बंडखोर असायचे.. हल्लीव्यवस्थेत वाटा नाही म्हणून बंडखोरी! अर्थात ते तरी काय करणार! आज पैठणीवाटणारे उमेदवार, उद्या पेपर किंवा दूध टाकणारे ‘लोकप्रिय’ उमेदवार,पक्षाने दिले तर बंडखोरीशिवाय दुसरं काय करणार? आम्ही लोकांचे राजेझालो.. हल्ली आधी लोकप्रिय व्हायचं, मग लोकप्रतिनिधी व्हायचं!



अस्वस्थ होतो, चीड येते.. जागोजागी उभारलेल्या आमच्या पुतळ्यात जर प्राणओतता आले असते, तर आमच्या समशेरींनी, आमच्या नावावर दुकानदारीकरणाऱ्यांना यमसदनी धाडले असते..



अमृताशी पैजा जिंकणारी मराठी, मराठी मुलुख, मराठी संस्कृती आजराजकीयदृष्टय़ा ‘निर्नायकी, त्रिशंकू अवस्थेत यावी? कोण जबाबदार याला?’



जबाबदार कोण? मतदान न करणारे? घराणेशाही खपवून घेणारे कार्यकर्ते आणिजनता? पाच वर्षांत, पायाखालचा रस्ता खड्डय़ांचा होतो, महागाई वाढते, जगणंअसुरक्षित होतं; पण लोकप्रतिनिधींचे भत्ते वाढतात, त्यांचं वेतन वाढतं,त्यांचं राहणीमान सुधारतं, त्यांच्या भागीदाऱ्या वाढतात.. तीन लाखलोकांचा प्रतिनिधी बघता बघता करोडपती होतो आणि तीन लाख लोक बघत राहतात?एकही मायेचा पूत उठून विचारीत नाही त्याला, की येते कुठून हे सारे?



एक माणूस तीन लाखांची मुस्कटदाबी करतो? मग आम्ही हाडामासाची जिवंत माणसंआहोत, का किडे-मुंगे?राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं, यावर त्यांनाच बोलावून त्यांच्याशीचचर्चा करता? तुरुंगातून बाहेर येणाऱ्यांवर पुष्पवृष्टी करता? रांगोळ्याघालता? जयजयकार करता? एवढे हतबल आहोत आपण, की पुढाऱ्यांच्या पोरांशिवायया बारा-पंधरा कोटी जनतेतून नेतृत्वच निर्माण होणार नाही? का आम्हालाचसवय झालीय सगळ्यांची? त्यापेक्षा ‘मला नागव, पण माझी भूक भागव’ अशी नवीम्हण जन्माला घालू या? राजकारण वाईट, राजकारणी वाईट असं म्हणूनत्यांच्याच चिठ्ठय़ा-चपाटय़ांनी नोकऱ्या, अ‍ॅडमिशन मिळवायच्या, त्यांच्याचपैशावर गणपती आणायचे, दहिहंडय़ा फोडायच्या.. त्यांच्या दादागिरीला ‘कार्य’म्हणायचे.. त्यांच्या समृद्धीला प्रगती म्हणायचे, दूरदर्शी नेतृत्वम्हणायचे!



आमच्या काळात कुठल्याही प्रकारचा द्रोह करणाऱ्याला कडेलोटाची शिक्षाअसायची.. तुमच्या हातात मतपेटी आहे.. पक्ष, वर्ग, जात, धर्म न बघता योग्यउमेदवाराला मत द्या आणि एकदाच काय तो मुजोरांचा कडेलोट करा..



हे राज्य व्हावे ही ‘श्रीं’ची इच्छा, हे आमच्यासह इतिहासजमा झालं!



आता हे राज्य व्हावं, हे श्री, श्रीमती, राव, रंक, शेतकरी, शेतमजूर,दीन-दलित, भटके, स्त्रिया, तरुण कामगार, कष्टकरी या सर्वाची इच्छा असलीपाहिजे.. या राज्याचा एकेकाळचा राजा, मी शिवाजीराजे भोसले सांगतो,कर्तव्यापासून दूर गेलात, तर तुमचा कडेलोट तुम्ही स्वत:च केलात म्हणून समजा!-


संजय पवार लोकसत्ता - रविवार, ११ ऑक्टोबर २००९

16 January 2009

Truly Great India

An Olympic Shooter wins Gold medal (Only a game)


Govt gives him 3 Crore + Awards



Another Shooter dies, fighting with terrorists (Saving our country and our lives)

Govt pays his family 5 Lakhs


Enjoy ....... Truly Great India............!!!!

06 May 2008

मन वळवण्याची कला

पटवणे' हे व्यवस्थापन विकास प्रशिक्षणातील एक महत्त्वाचं कौशल्य आहे. मॅनेजमेंटच्या भाषेत "निगोशिएटिंग' किंवा' इन्फ्ल्युएन्सिंग' या नावानं "पटवणे' या कौशल्याला ओळखलं जातं."समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष' अनुभव घेऊन परिपक्व होण्याची, मन वळवण्याची संधी उपलब्ध करून देणं म्हणजे त्या व्यक्तीला "पटवणे'. आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या बरोबरीच्या व्यक्तीला आपल्या प्रभावानं बदलायचं, आपल्यातील चांगल्या व सकारात्मक संस्कारांनी त्या व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडीला घडवायचं आणि हुशारी व चातुर्याने त्या व्यक्तीकडून सहकार्य मळवायचं, हे या पटवणे कौशल्यात अपेक्षित असतं.

दुसऱ्या व्यक्तीकडून काम करून घेण्याचे किंवा समोरच्यावर इम्प्रेशन करण्याचे दोन सरधोपट मार्ग सगळ्यांना परिचत आहेत. एक म्हणजे दादागरी करणे व दुसरा म्हणजे "मस्का' मारणे. पण आपल्या सभोवती असणाऱ्या नानावध स्वभावाच्या व्यक्ती केवळ वरील दोन धोरणांचा वापर करून वागवता येत नाहीत. त्या व्यक्तींना आपलंसं करण्यासाठी, आत्मीयता नर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या धोरणांचा व विविध कौशल्यांचा परस्पर मेळ घालून प्रभावी वापर आपल्याला करता यायला हवा.

आपला प्रभाव पाडण्यासाठी सकारात्मक देहबोली, आपला आत्मवश्‍वास, योग्य शब्दांची योग्य वेळी पेरणी आपल्याला जमायला हवी. त्यासाठी जयंतचं उदाहरण लक्षात घेऊ. जयंतचा शैक्षणक आलेख तसा ठीकठाक, पण हाती घेतलेलं काम चिकाटीनं पूर्ण करण्याची वृत्ती व ऑफिसच्या कामासाठी फिरण्याची प्रचंड तयारी या त्याच्याकडील दोन महत्त्वाच्या जमेच्या बाजूंमुळे त्याने कामाच्या ठिकाणी फार कमी कालावधीत मोठी मजल मारलेली आहे. "त्याला हे कसं काय जमतं?' असा प्रश्‍न त्याचा सबऑर्डनेट सुजय- जो नुकताच ऑफसमध्ये जॉईन झालाय- त्याला नेहमी पडतो. सुजयने शेवटी जयंतला वचारलंच, ""कसं काय जमतं बुवा तुला हे?''

जयंतने उत्तर देण्यापूर्वी सुजयच्या नजरेला नजर दली. त्याच्या चेहऱ्यावर छानसं हसू चमकलं. तो थोडा पुढं झुकला आण सुजयच्या खांद्यावर थोपून म्हणाला, ""तुलाही जमेल दोस्ता! त्यात काय अवघड आहे?'' मग पॉज घेतला व पुढं म्हणाला, ""चल, मी तुला शिकवतो. पण फी द्यावी लागेल बरं का! आण डाऊन पेमेंटवर मी पन्नास टक्के डिस्काउंट देतो. बोल, आहेस का तयार?'' सुजय थोडा भांबावला व जयंतच्या बोलण्याचा अर्थ क्षणात लक्षात येऊन त्याच्याबरोबर हसण्यात सामील झाला व नकळत टाळी देण्यासाठी (जयंतला) हात पुढे झाला.

साहजिकच जयंतच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचा सुजयवर धनात्मक परिणाम होऊन त्याला जयंतबद्दल आपलेपणा वाटायला लागला.''खरं म्हणजे भावनिक पातळीला हात घालून, पण तर्कवचारांची कास न सोडता इतरांना पटवायला आपण शकलो तर समोरची व्यक्ती आपल्या भावना समजून घेते आहे, ही सुखद व दिलासा देणारी जाणीव नर्माण होऊन आत्मीयता व जिव्हाळा वाढतो व आपला प्रभाव समोरची व्यक्ती आनंदाने स्वीकारते. समोरच्या व्यक्तीला आपलं मत पटवायचं असेल तर समोरच्याचं संपूर्ण बोलणं लक्षपूर्वक ऐकण्याचं कौशल्य आपल्याला विकसत करणं गरजेचं आहे. तसेच आपल्या दोघांचं कशावर एकमत आहे, याचा शोध घेऊन त्यावर चर्चा करण्यामुळे सहअनुमतीचं वातावरण नर्माण होतं. त्यासाठी युक्तिवाद अत्यंत प्रभावी ठरतो. त्यासाठी आपला स्वर भांडणाचा नसावा, तसेच आपल्या परस्पर नातेसंबंधात विश्‍वासार्हता, पारदर्शीपणा व जुळवून घेण्याची तयारी असायला हवी व त्यासाठी प्रांजळ व मोकळा संवाद हवा. त्यामुळे धारदार शब्दांच्या शस्त्रानं वार करण्याऐवजी आपल्या आजूबाजूचे व आपण नःशस्त्र होण्यावर भर दिला तर "पटवणे' सहज शक्‍य होतं.अर्थात हे पटवण्याचं कौशल्य कॉपारेट मीटिंगमध्ये जास्त उपयुक्त ठरतं. कारण तर्कशुद्ध विचारांना त्या ठिकाणी प्राधान्य असतं.

समोरच्याला पटवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे "तुझे मत काय?' हा प्रश्‍न विचारणं. आपलं स्वतःचं मत लादण्यापेक्षा त्याला त्याचं मत मांडू देणं आवश्‍यक असतं. त्याच्या मताचा आदर ठेवून त्यानं मांडलेल्या मनातील महत्त्वाचे व आवडलेले विचार त्याला सांगून आपल्याला त्या संदर्भात आलेले विचार व साम्य असलेल्या विचारांची मांडणी करायची. जी काही भन्नता जाणवेल त्याचं मनमोकळेपणाने शंकानरसन करायचं. बघा, आपोआप समोरची व्यक्ती आपला प्रभाव मानू लागते.थोडक्‍यात काय, तर दुसऱ्यांना पटवण्याच्या वाटेने जाणाऱ्या या मार्गावरून चालून पाहा व आपला करिअर ग्राफ अधिक उंचवा!

27 April 2008

नेतृत्व कसं हवं?

एखादी संस्था प्रगती करते तेव्हा त्यात तिच्या नेत्याचा सिंहाचा वाटा असतो. खरं तर सर्व कर्मचाऱ्यांचाच वाटा असतो, पण या कर्मचाऱ्यांकडून हवं ते करून घेण्याचं कौशल्य नेत्याचं असतं. काय असतं नेमकं या नेत्याकडे?

चांगल्या नेतृत्वाचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असतो. पुढे काय होऊ शकेल, याचा आडाखा तो बांधू शकतो. असं नेतृत्व एखाद्या संस्थेत असलं तर त्यामुळे त्या संस्थेपुढे असणाऱ्या आव्हानांचे डोंगर तो लीलया पार करू शकतो.

यशस्वी नेता आपल्या भोवतालच्या लोकांमधलं उपजत ज्ञान आणि गुण ओळखून त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देतो. त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करून काम करण्यासाठी अधिकाधिक लोक कसे प्रवृत्त होतील आणि व्यवसायाला चालना मिळेल याकडे तो लक्ष पुरवतो. नेतृत्वगुण अधिक आदर्श होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या या काही गोष्टी-

स्वओळख
प्रथम आपल्यातलेच बरे-वाईट गुण ओळखायला शिकणं. ते गुण ओळखून त्यातल्या चांगल्या गुणांवर भर देत वाईट गुणांवर मात करावी. आपली कार्यशक्ती जोखून त्याप्रमाणे आपली प्रतिमा तयार करावी. प्रतिमा तयार झाली तरी कायम त्यातच अडकून पडू नये. त्यातही एक नेमकी दिशा पकडून त्या दृष्टीनं वाटचाल करायला हवी. इतरांना दिशादर्शन करण्याआधी स्वत:ची योग्य दिशा ठरवायला हवी.

दूरदृष्टी व ध्येयनिश्‍चिती
कामाच्या ठिकाणी नेत्याने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते. त्याचा फायदा पुढे कंपनीलाच होतो. नेत्याने आपल्यापुढे काही ध्येयं निश्‍चित केली, तर त्यातून त्याची दूरदृष्टी दिसून येते. कंपनीला ठोस यश मिळवून द्यायचं असेल तर त्यासाठी ध्येयनिश्‍चितीतही वेगवेगळे आडाखे बांधावे लागतात. त्यातले काही पल्ले जवळचे तर काही पल्ले लांबचे असतात.

परिणामकारक सुसंवाद
एक नेता म्हणून तुमच्यावर, तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येयधोरणांवर लोकांनी विश्‍वास ठेवायला हवा. नेत्याचा दृष्टिकोन प्रत्यक्षात यावा हा त्याच्या टीमचाही दृष्टिकोन असायला हवा. त्यासाठी एकमेकांवरचा विश्‍वास, लोकांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची हातोटी नेत्याजवळ असायला हवी. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांशी सातत्याने संवाद राखायला हवा.

मार्गदर्शक
नेतृत्व करणाऱ्याने स्वत: आपल्या कामाच्या बाबतीत सजग राहायला हवे. तो तसा वागला, की आपोआपच इतर सहकारीही कामाची हयगय करीत नाहीत. प्रत्येकाला त्याच्या आवाक्‍यातलं आणि क्षमतेचं काम वाटून दिलं तर काही गोंधळ न उडता ते होऊ शकतं. फक्त "आदेश' सोडून काम होतं असं नाही, तर त्या व्यक्तीला त्या कामात गोडी वाटायला हवी. त्याच्याकडून नेत्याने ते काम करवून घेतलं पाहिजे. प्रसंगी सहकाऱ्यांचं मत आणि विचारही ऐकून घेतले पाहिजेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांवर विचार केला पाहिजे.

लोकांना त्यांच्या कामात पारंगत करणं आणि त्या कार्यक्षमतेचा योग्य रीतीनं वापर करून घेणं, ही नेत्याची प्राथमिक जबाबदारी मानण्यात येते. अशा वेळी नेत्यानं मार्गदर्शक होऊन काम करून घेतलं पाहिजे.

बदलाचा स्वीकार
बदलत्या काळानुसार नेतृत्वगुणांत होणारे व होऊ घातलेले बदल स्वीकारायला हवेत. बदल हे अपरिहार्य असतात, हे वास्तव स्वीकारायला हवं. जॅक वेल्स यांच्या मते, बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असताना संस्थेतल्या बदलांचा वेग मंदावला असेल, तर... नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असं समजावं. स्थैर्यापेक्षा अस्थिर असतानाच एखादा उद्योग अधिक प्रगती करतो हे ध्यानी ठेवावं. म्हणूनच बदलाचं दडपण किंवा भीती न बाळगता त्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहणारा आणि सहकाऱ्यांनाही ती सकारात्मकता दाखवणारा नेता होणं गरजेचं आहे.

नेतृत्वगुण
फक्त एमबीएची पदवी घेतली म्हणजे नेतृत्व करता आलं असं नाही, पण त्याचं रीतसर शिक्षण घेतलं तर आपले गुण उंचावायला थोडी मदत होते. शिवाय नेतृत्वगुण नेमके कसे असावेत, व्यवस्थापन कसं करावं, आपलं वागणं-बोलणं कसं असावं आदी गोष्टींचं ज्ञान व्हायला हवं. अशा प्रकारे नेतृत्वगुण अंगी बाणवून कंपनीचं भलं करणाऱ्या नेतृत्वाचीच संस्थांना गरज असते.

- मोनिका दोशी

22 January 2008

सॉफ्ट स्कील्स

शैक्षणिक गुणवत्ता एवढा एकच गुण आज पुढे जाण्यासाठी पुरेसा ठरत नाही. नीट लक्षात घेतलं तर जाणवतंय, की कागदावर सिद्ध झालेली बुद्धिमत्ता आहे, कष्टांची तयारी आहे; पण विविध स्वभावाच्या व्यक्तींबरोबर एकत्रित काम करता येत नाही, आपले विचार नेमकेपणाने मांडता येत नाहीत, आपल्या व्यावसायिक व वैयक्तिक जीवनातला वेग झेपत नाहीए, आपल्याकडे असलेली जुनी कौशल्ये कालबाह्य होण्याआधी नवनवीन गोष्टी शिकून घेण्याची तयारी- ती तर अजिबातच नाही. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आपल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच माणसाबरोबर, माणसांना एकत्र करून त्यातून संवाद साधत दर्जेदार करण्याची क्षमता ज्याच्याकडे असेल त्याला करियरमधील सर्वोत्तम संधी उपलब्ध होतात. त्यामुळे या बदलत्या काळात तंत्रज्ञानाबरोबरच "माणसांशी' संवाद साधणं, जुळवून घेणंही आवश्‍यक आहे आणि त्यासाठी विकसित करायला हवीत आपल्यामधील सॉफ्ट स्कील्स.

""सॉफ्ट स्कील्स म्हणजेच आपल्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावी ठरू शकणाऱ्या असंख्य छटा, समूहात वावरतानाचे आत्मभान आणि सकारात्मक दृष्टिकोनासाठी घेतलेले विशिष्ट कष्ट.''

सॉफ्टस्कील्स आत्मसात करण्यामुळे आपला "करिअर ग्राफ' उंचावतोच; शिवाय व्यक्तिगत प्रगती होऊन आर्थिक व मानसिकदृष्ट्या संपन्न जीवन जगणे शक्‍य होते.

आपल्या प्रत्येकाला करियरमध्ये हार्ड स्कील्स व सॉफ्टस्कील्सची गरज असते. हार्डस्कील्स म्हणजेच आपली शारीरिक क्षमता व उपलब्ध व वापरात असलेले तंत्रज्ञान यांच्याशी निगडित कौशल्य. व्यावसायिक व व्यावहारिक गुणवत्ता वाढविण्यासाठी हार्ड स्कील्सबरोबरच सॉफ्ट स्कील्स वापरणे आपल्या फायद्याचे ठरते. ही सॉफ्टस्कील्स प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी निगडित विकसित करता येतात, ही महत्त्वाची सॉफ्ट स्कील्स पुढीलप्रमाणे-

सर्जनशीलता - सर्जन म्हणजेच नवनिर्मिती. आपल्या प्रत्येकामध्ये थोड्याफार प्रमाणात सर्जनशीलता असते. आपल्या रोजच्या कामासंदर्भात नावीन्य व थोडी कल्पकता आणली, तर कामाचा कंटाळा न येता कामातील गोडी टिकून राहते.

प्रेरणा - आपल्या कृतीमागचा हेतू म्हणजेच प्रेरणा ः सकारात्मक प्रेरणा ध्येयापर्यंत पोचविण्यास मदत करते. बाह्य प्रेरणेपेक्षा अंतःप्रेरणेमुळे कामात रस निर्माण होतो, कामाची गुणवत्ता व दर्जा सुधारतो. आपल्या कार्यप्रवणतेला विरोध करणारे अडथळा ठरणारे घटक अंतःप्रेरणेच्या साह्याने दूर करता येतात.

भावनिक बुद्धिमत्ता - आपल्या सर्वांना परिचित असलेली बुद्धिमत्ता ही उपजत असते; पण भावनिक बुद्धिमत्ता मात्र प्रयत्नपूर्वक विकसित करता येते. भावनिक बुद्धिमत्ता ही व्यक्तीला समाजाभिमुख बनविते. भावनांचा वापर व हाताळणी कौशल्यपूर्णरीत्या केल्यास स्वतःच्या व इतरांच्या भावना समजून घेऊन त्या नियंत्रित करणे सहज शक्‍य होते.

निर्णयप्रक्रिया - योग्य वेळी योग्य निर्णय घेणे, ही तशी अवघड गोष्ट आहे. पण आपल्या उद्दिष्टांची नेमकी जाणीव विचारांमधील सकारात्मकता, उपलब्ध पर्याय लक्षात घेऊन तर्कसंगतपणे निर्णय घेता येतो. आपण घेतलेल्या निर्णयानुसार ठाम वागण्याची सवय व होणाऱ्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता आपल्याला अधिक चांगल्या रीतीने कार्यप्रवृत्त करते.

प्रभावी देहबोली - कामाच्या ठिकाणी योग्य रीतीने संवाद साधणे आवश्‍यक असते. त्यामध्ये बोलणं आणि शारीरिक हालचाली यांची एकत्रित सांगड असते. शारीरिक हालचाली म्हणजेच आपली देहबोली. या देहबोलीतून आपल्या प्रत्येकाच्या मनातील गोष्टी नकळतपणे दृश्‍यरूपात प्रकट होत असतात. आपल्याला इतरांबरोबर सौहार्द्रता व मैत्री वाढविण्यासाठी प्रभावी देहबोली वापरणे व त्याचा अर्थ जाणून घेणे, खूप मदतीचे ठरते. आपल्या देहबोलीचा योग्य वापर करून आपण इतरांशी उत्तम संवाद साधू शकतो.

समस्यापरिहार कौशल्य - बऱ्याच वेळा आपल्याला आपले ध्येय किंवा उद्दिष्ट ज्ञात असूनसुद्धा त्या ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग सापडत नाही, तेव्हा समस्या निर्माण होते. बऱ्याचदा आपण चाकोरीबद्ध वागत असतो. त्यामुळे आपल्या कार्यशैलीत व वागण्यात ताठरता येते. त्यामुळे समस्या न सुटता, गुंतागुंतीची बनते. पण विचारातील लवचिकता व विविध पर्यंयाचा वापर केला, तर समस्या सुटणे सहज शक्‍य होते.

संघभावना जोपासणे - कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांशी समजूनउमजून संवाद साधताना आपल्या सहकाऱ्यांचे काम करण्याचे "स्पिरिट' आपल्यामुळे कमी होऊ नये याची काळजी घेता यायला हवी. जर कामाच्या ठिकाणी आपल्या टीममध्ये काही दोष असतील, तर ते कमी करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. कारण जर टीममध्ये आपण काम करत असू, तर यश-अपयश सारं काही टीमच असते. आपल्याला येणाऱ्या गोष्टी आपल्या सहकाऱ्यांना शिकविण्याची तयारी आपल्याकडे हवीच; पण इतरांकडील नवीन गोष्टी आपल्याला शिकून घेता आल्या पाहिजेत. त्यामुळे संघभावना जोपासण्यासाठी आपण सतत नवीन शिकण्याची तयारी ठेवताना आपली कौशल्यं इतरांनाही कशी आत्मसात करता येतील यासाठी आवश्‍यक असणारी प्रयत्नशील वृत्ती जोपासायला हवी.

करिअरग्राफ उंचावताना ही मूलभूत सॉफ्टस्कील्स आपल्याला माहीत नसणं आणि वापरता येणं आवश्‍यक आहे. या स्कील्सच्या बरोबरीनं वाटाघाटी करण्याचं (निगोसिएशन) कौशल्य, बिझनेस एटिकेट्‌स, कामातील प्रामाणिकपणा, नेतृत्वक्षमता, सतत शिकण्याची वृत्ती, कामासंदर्भात पूर्वतयारी व नियोजनतज्ज्ञांची गरज असते. आपण प्रत्येकाने आपल्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच ही वेगवेगळी सॉफ्टस्कील्स विकसित केली तर करियरचा ग्राफ हा नेहमी उंचावत चाललेला दिसेल, हे नक्की !

27 August 2006

व्यावसायिक मनोवृत्तीचा विकास

- आपल्या मनोवृत्तीचा बारकाईने विचार करा. कोणकोणत्या दृष्टीने या मनोवृत्तीत बदल घडवायचा आहे, याचा एक आराखडा तयार करा व क्रमाक्रमाने आपल्या मनोवृत्तीत बदल करण्याचा प्रयत्न करा. असे करणे निश्‍चितच कठीण आहे; पण अशक्‍य मात्र नाही.
- आपल्या मित्रमंडळात बदल करा. असे मित्र निवडा, ज्यांच्या कुटुंबात व्यवसायाचे वातावरण आहे. फावल्या वेळात व्यवसाय कसा केला जातो, त्यातील बारकावे कोणते, यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करा. तुमच्यातील जिज्ञासा, कुतूहल, उत्साह पाहून त्यांनाही तुम्हाला प्राथमिक धडे देणे आवडेल.
- आपल्या वाचनात बदल करा. ललित साहित्य वाचण्यापेक्षा व्यावसायिकांची चरित्रे, व्यावसायिक वर्तमानपत्रे, व्यावसायिक मासिके यांच्याकडे जास्त लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला त्यात रस निर्माण होईल व व्यवसायातील बारकावे लक्षात येतील.
- आपले सर्वसामान्य शिक्षण चालूच ठेवा; पण त्याचबरोबर व्यवसायाचे वेगवेगळे अभ्यासक्रम कोणते, याचाही शोध घ्या व फावल्या वेळेत तेही पूर्ण करा. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र बनेल.
- दिवाळीच्या सुटीत, उन्हाळ्याच्या सुटीत, वीक एंडला छोटे-मोठे व्यवसाय करावयास सुरवात करा. त्यातून मिळालेल्या अतिरिक्त उत्पन्नाची चटक लागली, की ते वाढविण्याचा प्रयत्न करा. कदाचित, तेच व्यवसाय तुमच्या भविष्यातील उपजीविकेचे साधन बनतील.
- भरपूर प्रवास करा, जग बघा, जगण्याच्या नवनवीन पद्धती आत्मसात करा, ठिकठिकाणी व्यवसाय पद्धती कशा चालतात, त्यांचे चिकित्सक विश्‍लेषण करा. इतर प्रदेशांतील विविध वस्तू आपल्या गावी आणून त्यांना बाजारपेठ मिळू शकेल काय, याचा अभ्यास करा व त्यातून किती लाभ मिळू शकेल, याचा अंदाज घ्या.
- गावोगाव मोठमोठी व्यावसायिक प्रदर्शने भरतात. त्या प्रदर्शनांना अवश्‍य भेटी देत राहा. त्यातून व्यवसाय क्षेत्रात कोणकोणत्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत, याबद्दल निश्‍चितच अधिक ज्ञान मिळेल.
- मोठमोठ्या व्यावसायिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घ्या. त्यांच्याकडून यशस्वी व्यवसायाबद्दल टिप्स घेत राहा. त्यांच्याकडून व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणींबद्दल व संकटांबद्दल जाणून घ्या व त्या त्यांनी कशा टाळल्या, याबद्दल त्यांचे विचार संग्रही करा.
- व्यवसायसंवर्धनासाठी सरकारने विविध संस्था स्थापन केल्या आहेत. अशा संस्थांना भेटी, तिथे उपलब्ध असलेले लिखित साहित्य मिळवा व त्याचे सखोल वाचन करा.
- नाटकात एखादा नट एखाद्या पात्राचे काम करतो त्या वेळी तो त्या पात्राशी एकरूप होतो. तो जर पूर्णपणे एकरूप होऊ शकला तरच तो कसलेला नट बनतो. तसाच "मी व्यावसायिक बनणार', हा ध्यास मनाला लागू द्या. तो लागला तर आपल्या चालण्यात, बोलण्यात, विचारांत, कृतीत, वागणुकीत आपोआपच बदल जाणवायला लागेल व आपल्या मानसिकतेत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.

Popular Posts