07 July 2006

रात

रात

बघता बघता सरली स्वप्ने, अस्वस्थांची सरली लाट
चालत जाता उरले अंतर, काट्यांनीच सजली वाट

आले कितीक गेले कितीक, अंतर आहे अजुनी तितुकेच
काजळ राती अंधारातुन, अश्रु ढाळीत भिजली रात

काळाला मग भुक लागली, माझे हसुच गेला खाऊन
जुन्या आठवा ताज्या झाल्या, नागाजैसी टाकून कात

रातच सोबत, रातच वैरी, रातच जिवंत, रातच मृत्यु
सांज बुडाली अंधारातच, कुठे हरवली रम्य पहाट.. ?

एकटाच मी घुमतो आहे, रान पालथे घालीत पायी
प्राण आतले संपत आले, रात अजुनी तशीच वहात..

संतोष

Popular Posts