Showing posts with label Trekking. Show all posts
Showing posts with label Trekking. Show all posts

04 July 2012

पश्चिमघाट पण युनुस्कोच्या वारसा यादीत

भारतातील 1600 किलोमीटर लांबीचा पश्चिम घाट आणि तिथल्या पर्वतरांगाचा समावेश संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला असल्याचे जाहीर केले

संयुक्त राष्ट्र- देशातील 1600 किलोमीटर लांबीचा पश्चिम घाटातील पर्वतरांगा जंगलांचा समावेश संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला असल्याचे जाहीर केले आहे.हिमालयापेक्षाही प्राचीन वने पश्चिम घाटात असल्याचे सांगत येथील जैवविविधता जोपासण्यासाठी युनेस्को विशेष लक्ष देणार आहे. युनेस्कोच्या घोषणेमुळे  भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कास पठार (सातारा), कोयना अभयारण्य, चांदोली अभयारण्य (सांगली) आणि राधानगरी अभयारण्य (कोल्हापूर) ही ठिकाणे 'जागतिक वारसा' स्थळांच्या यादीत सामिल झाली आहेत.

पश्चिम घाटातील पर्वतरांगा पश्चिमेकडील राज्यांमध्ये पावसाचे विभाजन करण्याची महत्त्वाची कामगिरी बजावते. या जंगलांमधील वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, कीटक हे इन्डेमिक या प्रकारात मोडणारे आहेत, म्हणजे अशा प्रकारचे जीव जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. इतका मोठा जागतिक वारसा आपण वृक्षतोड करून, खाणी खोदून, वेगवेगळे प्रकल्प उभारून नाहीसा करण्याच्या मार्गावर आहोत. परंतु आता मात्र यापासून रोखणे शक्य होणार आहे.या ठिकाणाला जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याने त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही येईल आणि त्यात युनेस्को सक्रिय असेल. युनेस्कोच्या निर्णयामुळे पश्चिम घाटावरील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था आणि तज्ज्ञांचे तांत्रिक तसेच आर्थिक सहकार्य लाभणार आहे.



महाराष्ट्रातील पश्चिमी घाटासोबतच जर्मनीतील मारग्रेवियल ओपेरा हाऊसचा समावेश जागतिक वारसा असलेल्या स्थळांमध्ये करण्यात आला आहे. 18 व्या शतकामध्ये  बांधण्यात आलेली ही वास्तू स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमूना आहे.पोर्तुगाल येथील एल्वस या नगरा भोवती असलेल्या तटबंदाचाही समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.

02 October 2010

किल्ले विसापूर

किल्ले विसापूर

लोणावळा- मालवली पासून हाकेचा अंतरावर असणारा विसापूर किल्ला लोहागडच एक भाग म्हणून ओळखला जातो.

महाराष्ट्रातील ८०%  ते ९०% किल्ले १३ ते १४ शतकातील असतील तसं विसापूर बद्दल नक्की नाही, हा किल्ला अगदी  अलीकडच्या काळातील म्हणजे शिवाजी महाराजाच्या हि नंतर पेशवाईत उभारण्यात आला.

लोह्गडच्या तुलनेत हा तसा सावत्रच राहिला.... पण इतिहासात याची नोंद ज्याचा विसापूर त्याचा लोहगड अशीच राहिली.... लोह्गडच्या तुलनेत हा त्याचा पेक्षा उंच विस्तीर्ण असूनही हा नेहमी डावाचा राहिला.



गडाची तटबंदी अजूनही पाहण्यासारखी आहे, गडावर मोडकळीस आलेल्या दोन छप्पर नसलेल्या इमारती आहेत,


पाण्यासाठी गडावर दगडात कोरलेले तलाव व गुहा आहेत.



गडावर मारुतीचे दगडात कोरलेले ६ फुटी शिल्प आहे तेच या गडाचे आराध्य दैवत.

पाटण गावातून गडावर येताना गडाच्या तटबंदीला लागूनच एका गुहे जवळ मारुतीचे आणखी एक सुंदर शिल्प आहे.



आता गड हा आजूबाजूच्या गावातील गुराचे कुरण झाले आहे.

 



29 November 2009

peth fort - kothaligad ( पेठ चा किल्ला - कोथळीगड )

कोथळीगड प्रकार: गिरिदुर्ग मध्यम
डोगररांग : भीमाशंकर
जिल्हा : रायगड.
कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ की.मी. अंतरावर आहे. सिद्धगड-भीमाशंकरच्या अलीकडे दाट झाडीतून आपला उत्तुंग कातळकडा दाखवत हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या किल्ल्च्या पायाथातील पेठ या गावामुळे या किल्ल्याला पेठचा किल्ला असेही संबोधले जाते. कोठलीगड तसा दिसायला छोटासा पण याला जो रक्तरंजित इतिहास लाभला आहे तो मोठमोठ्या किल्ल्यानाही लाभला नसेल. या विषयाची माहित मराठी व इग्रजी कागद पत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रामधून मिळते. हा किल्ला काही बलाढय दुर्गा नाही पण आपल्या बेलाग सुळक्यावरच एक संरक्षक ठाण होता. या मुळेच या किल्ल्यावर मराठाचे शस्त्रागार होते.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहूबाजूंनी तसल्यासारखा पेठचा सुळका दिसतो. पाय वाटेने वर पोहोचल्यावर समोरचा कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम देवीची गुहा, पाण्याचे टाके आणि मग डावीकडील ऐसपैस भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल, भूमी व छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब.
गुहेजवळच एका उध्वर्मुखी भूयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या कोरलेल्या आहेत. गडमाथ्यावरून भीमाशंकर कडील कलावंतीणीचा महाल, नागफणी वाघाचा डोळा,गोरखगड, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शालगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो.
गडावर जाण्याच्या वाटा : कर्जतहून एसटी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात येणे. हे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाचा पायथ्याला पेठ हे गाव आहे. गावातून वाट सरळ किल्लाच्या प्रवेशद्वाराशी घेऊन जाते. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास साधारण २ तास लागतात. पेठ गावातून साधारण १ तास.

हा किल्ला नियम ३२ अन्वये प्राचीन स्मारके, पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम १९५६ अन्वये संरक्षित करण्यात आला आहे.

28 July 2009

Rajmachi Fort Trek - किल्ले राजमाची भटकंती

Rajmachi Fort Trek - किल्ले राजमाची भटकंती
राजमाची प्रकार : गिरिदुर्ग, मध्यम
डोंगररांग : लोणावळा पुणे.



सह्याद्रीच्या लोणावळा खंडाला पासून निघाणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर "उल्हास नदीचे खोरे" म्हणून ओळखला जातो.  याच प्रदेशात मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येला १५ किमी. अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याण नालासोपारा हि प्राचीन काळातील मोठ्या व्यापाराच्या बंदरातून पुण्याकडे याच मार्गाने होत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे.  राजमाची वरून एका बाजूस मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी, माथेरान असा परिसर नजरेस पडतो. यामुळे हा किल्ला एक लष्करी ठिकाण असावे, या किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत हे बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र किल्लेच होय.


Datta niwas


Waterfall normal view


Waterfall Zoom Mode


Waterfall Zoom Mode


Waterfall Zoom Mode



























12 July 2009

Popular Posts