04 July 2012

पश्चिमघाट पण युनुस्कोच्या वारसा यादीत

भारतातील 1600 किलोमीटर लांबीचा पश्चिम घाट आणि तिथल्या पर्वतरांगाचा समावेश संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला असल्याचे जाहीर केले

संयुक्त राष्ट्र- देशातील 1600 किलोमीटर लांबीचा पश्चिम घाटातील पर्वतरांगा जंगलांचा समावेश संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला असल्याचे जाहीर केले आहे.हिमालयापेक्षाही प्राचीन वने पश्चिम घाटात असल्याचे सांगत येथील जैवविविधता जोपासण्यासाठी युनेस्को विशेष लक्ष देणार आहे. युनेस्कोच्या घोषणेमुळे  भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कास पठार (सातारा), कोयना अभयारण्य, चांदोली अभयारण्य (सांगली) आणि राधानगरी अभयारण्य (कोल्हापूर) ही ठिकाणे 'जागतिक वारसा' स्थळांच्या यादीत सामिल झाली आहेत.

पश्चिम घाटातील पर्वतरांगा पश्चिमेकडील राज्यांमध्ये पावसाचे विभाजन करण्याची महत्त्वाची कामगिरी बजावते. या जंगलांमधील वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, कीटक हे इन्डेमिक या प्रकारात मोडणारे आहेत, म्हणजे अशा प्रकारचे जीव जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. इतका मोठा जागतिक वारसा आपण वृक्षतोड करून, खाणी खोदून, वेगवेगळे प्रकल्प उभारून नाहीसा करण्याच्या मार्गावर आहोत. परंतु आता मात्र यापासून रोखणे शक्य होणार आहे.या ठिकाणाला जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याने त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही येईल आणि त्यात युनेस्को सक्रिय असेल. युनेस्कोच्या निर्णयामुळे पश्चिम घाटावरील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था आणि तज्ज्ञांचे तांत्रिक तसेच आर्थिक सहकार्य लाभणार आहे.



महाराष्ट्रातील पश्चिमी घाटासोबतच जर्मनीतील मारग्रेवियल ओपेरा हाऊसचा समावेश जागतिक वारसा असलेल्या स्थळांमध्ये करण्यात आला आहे. 18 व्या शतकामध्ये  बांधण्यात आलेली ही वास्तू स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमूना आहे.पोर्तुगाल येथील एल्वस या नगरा भोवती असलेल्या तटबंदाचाही समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.

No comments:

Popular Posts