Showing posts with label रंग माझा वेगळा. Show all posts
Showing posts with label रंग माझा वेगळा. Show all posts

02 October 2010

किल्ले विसापूर

किल्ले विसापूर

लोणावळा- मालवली पासून हाकेचा अंतरावर असणारा विसापूर किल्ला लोहागडच एक भाग म्हणून ओळखला जातो.

महाराष्ट्रातील ८०%  ते ९०% किल्ले १३ ते १४ शतकातील असतील तसं विसापूर बद्दल नक्की नाही, हा किल्ला अगदी  अलीकडच्या काळातील म्हणजे शिवाजी महाराजाच्या हि नंतर पेशवाईत उभारण्यात आला.

लोह्गडच्या तुलनेत हा तसा सावत्रच राहिला.... पण इतिहासात याची नोंद ज्याचा विसापूर त्याचा लोहगड अशीच राहिली.... लोह्गडच्या तुलनेत हा त्याचा पेक्षा उंच विस्तीर्ण असूनही हा नेहमी डावाचा राहिला.



गडाची तटबंदी अजूनही पाहण्यासारखी आहे, गडावर मोडकळीस आलेल्या दोन छप्पर नसलेल्या इमारती आहेत,


पाण्यासाठी गडावर दगडात कोरलेले तलाव व गुहा आहेत.



गडावर मारुतीचे दगडात कोरलेले ६ फुटी शिल्प आहे तेच या गडाचे आराध्य दैवत.

पाटण गावातून गडावर येताना गडाच्या तटबंदीला लागूनच एका गुहे जवळ मारुतीचे आणखी एक सुंदर शिल्प आहे.



आता गड हा आजूबाजूच्या गावातील गुराचे कुरण झाले आहे.

 



03 November 2009

ग्राफिटी - Graffiti - part !


बाकीच्या ग्राफिटी - Graffiti  पुढील भागात ...

05 January 2009

रंग माझा वेगळा

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!

कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?

सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा ! 

26 October 2008

नेहमीचाच पाऊस तसा……

नेहमीचाच पाऊस तसा……

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
कोरड्या झालेल्या मातीत….नाच नाच नाचला….

तेच थेंब,तेच पाणी…
पावसावरचीही तीच गाणी….
गाण्यातला सुर जरा तेवढा….
एकटा एकटा वाटला….

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….

पाण्यातुन वाहणारी कागदाची होडी….
वाफाळलेला कपातील चहाची गोडी…
कप जुना तसाच… मात्र….
चहातलाच गोडवा आटला……

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….

रस्त्यावरचा नकोसा चिखल सारा…..
घरा-घरात घुसणारा सोसाटयाचा वारा…
घरं अगदी तशीच उभी….
वाराच कसा दिशा भरकटला…..

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….

पावसामुळेच काय ते.. प्रेम-बिम जमलं होत……
एका हाताने…. दुस-या हाताला हळुच हातात घेतलं होत……
प्रेम कधीचच संपल….
कारण हातच कायमचा सुटला…..
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….

अश्रुंना तुझ्या या आवर रे आता….
दु:खातुन तु जरा सावर रे आता….
अश्रु कधीचेच आटले हो….
एक थेंब फक्त्त डोळ्यात साचला…..

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….

पावसावरती कविता लिहीन म्हणालो….
ओलं चिंब अंग करीन म्हणालो…..
ओलं चिंब होण्याआधीच….
पाऊसच संपला…..

नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….

—-ललित

Popular Posts