29 November 2009

peth fort - kothaligad ( पेठ चा किल्ला - कोथळीगड )

कोथळीगड प्रकार: गिरिदुर्ग मध्यम
डोगररांग : भीमाशंकर
जिल्हा : रायगड.
कोथळीगड हा कर्जतपासून ईशान्येला साधारण २१ की.मी. अंतरावर आहे. सिद्धगड-भीमाशंकरच्या अलीकडे दाट झाडीतून आपला उत्तुंग कातळकडा दाखवत हा किल्ला इतिहासाची साक्ष देत उभा आहे. या किल्ल्च्या पायाथातील पेठ या गावामुळे या किल्ल्याला पेठचा किल्ला असेही संबोधले जाते. कोठलीगड तसा दिसायला छोटासा पण याला जो रक्तरंजित इतिहास लाभला आहे तो मोठमोठ्या किल्ल्यानाही लाभला नसेल. या विषयाची माहित मराठी व इग्रजी कागद पत्रातून नव्हे तर मुघली कागदपत्रामधून मिळते. हा किल्ला काही बलाढय दुर्गा नाही पण आपल्या बेलाग सुळक्यावरच एक संरक्षक ठाण होता. या मुळेच या किल्ल्यावर मराठाचे शस्त्रागार होते.
गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे : पायथ्याजवळच्या पेठ गावातून चहूबाजूंनी तसल्यासारखा पेठचा सुळका दिसतो. पाय वाटेने वर पोहोचल्यावर समोरचा कातळाच्या पोटात खोदलेल्या गुहा दिसतात. प्रथम देवीची गुहा, पाण्याचे टाके आणि मग डावीकडील ऐसपैस भैरोबाची गुहा. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे सपाट, समतल, भूमी व छताला आधार देणारे कोरीव नक्षीदार खांब.
गुहेजवळच एका उध्वर्मुखी भूयारात किल्ल्याच्या सुळक्यावर जाण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या कोरलेल्या आहेत. गडमाथ्यावरून भीमाशंकर कडील कलावंतीणीचा महाल, नागफणी वाघाचा डोळा,गोरखगड, सिद्धगड, कल्याणकडील हाजीमलंग, चंदेरी, प्रबळगड, इर्शालगड, माणिकगड, माथेरानचे पठार हा विस्तृत मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो.
गडावर जाण्याच्या वाटा : कर्जतहून एसटी ने कशेळे मार्गे आंबिवली या गावात येणे. हे अंतर साधारण ३० कि.मी. आहे. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास रुळलेली वाट आहे. गडाचा पायथ्याला पेठ हे गाव आहे. गावातून वाट सरळ किल्लाच्या प्रवेशद्वाराशी घेऊन जाते. आंबिवली गावातून गडाकडे जाण्यास साधारण २ तास लागतात. पेठ गावातून साधारण १ तास.

हा किल्ला नियम ३२ अन्वये प्राचीन स्मारके, पुरातत्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम १९५६ अन्वये संरक्षित करण्यात आला आहे.

Popular Posts