27 November 2006

चारोळ्या

तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!

माणुसच आज माणसाला मारायला उठलायं,
हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?
हे माणसा परतून माणसात ये,
सोडून द्वेश, हर्षात ये!

तस पाहिलं तर,
तिची माझी सच्ची मैत्री होती..
आज कित्येक वर्षानी भेटलो,
माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!

सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं...
बदलत राहिले दिवस तरीही,
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!

शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात....
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!

त्यांना कळत पण वळत नाही

नमस्कार मंडळी....

देवाने न जाणो किती प्रकारची माणसे बनविली आहेत....प्रत्येकाच रुप वेगळं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा...
काही माणसे नेहमी आनंदी...हसतमुख असतात...तर काही याउलट... पाडगावकरंच्या या कवितेमधे वर्णन केल्यासारखी....
आता तुम्हाला कसं रहायचं आहे ते तुम्हीच ठरवा....
पण त्याआधी ही एक छोटीशी कविता वाचा....



यांच असं का होत कळत नाही,
किंवा त्यांना कळत पण वळत नाही.
कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात,
एरंडेल प्यावं तस आयुष्य पीत असतात.
एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार?
एकच क्षेत्र ठरलेलं दुसरीकडे कुठे जाणार?
कारण आणि परिणाम यांच नात टळत नाही!
यांच असं का होत कळत नाही,
किंवा त्यांना कळत पण वळत नाही.


---- कविवर्य मंगेश पाडगावकर

19 October 2006

हीच लायकी आमची

उठ अफ़जला
भारतीय संसदेवर हल्ला करुनही हिरो ठरु पाहणारया अफ़जलला आणि त्याला पोसणारया वृत्तीला शतशः प्रणाम

हीच लायकी आमची
धर पुन्हा वेठीस आम्हा
हीच पायरी आमची
जा पुन्हा तुडवुन आम्हा

शिवा एकदा जन्मला होता
अफ़जल त्यानेच फ़ाडला होता
नकोस घाबरु गडया तु
आमचा तो इतिहास होता

ठेव लिहुन अनुभव तुझे
नक्की त्यांनाही भाव येईल
न जाणो उद्याचा इतिहास
हिरव्या शाईने लिहिला जाईल

शरीराने जरी मेलास तु
नको गाळुस पाय तु
देशद्रोह केलास तु
आता शहीद ठरशील तु

गल्लीबोळात भाउबंद तुझे
आमचे हात बांधलेले
नेते साले कुत्रे आमचे
तुझ्यातर्फ़े भुंकणारे

टळेल रे फ़ाशी तुझी,
मग तुला कैदेत ठेवतील
मरतील आमचे बांधव उपाशी
तुला पोटभर खायला घालतील
तुला सोडवायला तुझे लोक
विमानाचे अपहरण करतील

म्हणुनच म्हणतो...........

उठ अफ़जला, पुन्हा घाल घाव तु
धाव संसदी असाच एक बॉम्ब फ़ोड तु
रक्त थंड आमुचे पुन्हा खुशाल ढोस तु
वस्त्र मायभुमीचे, पुन्हा खुशाल फ़ेड तु

27 August 2006

व्यावसायिक मनोवृत्तीचा विकास

- आपल्या मनोवृत्तीचा बारकाईने विचार करा. कोणकोणत्या दृष्टीने या मनोवृत्तीत बदल घडवायचा आहे, याचा एक आराखडा तयार करा व क्रमाक्रमाने आपल्या मनोवृत्तीत बदल करण्याचा प्रयत्न करा. असे करणे निश्‍चितच कठीण आहे; पण अशक्‍य मात्र नाही.
- आपल्या मित्रमंडळात बदल करा. असे मित्र निवडा, ज्यांच्या कुटुंबात व्यवसायाचे वातावरण आहे. फावल्या वेळात व्यवसाय कसा केला जातो, त्यातील बारकावे कोणते, यांचा जाणीवपूर्वक अभ्यास करा. तुमच्यातील जिज्ञासा, कुतूहल, उत्साह पाहून त्यांनाही तुम्हाला प्राथमिक धडे देणे आवडेल.
- आपल्या वाचनात बदल करा. ललित साहित्य वाचण्यापेक्षा व्यावसायिकांची चरित्रे, व्यावसायिक वर्तमानपत्रे, व्यावसायिक मासिके यांच्याकडे जास्त लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला त्यात रस निर्माण होईल व व्यवसायातील बारकावे लक्षात येतील.
- आपले सर्वसामान्य शिक्षण चालूच ठेवा; पण त्याचबरोबर व्यवसायाचे वेगवेगळे अभ्यासक्रम कोणते, याचाही शोध घ्या व फावल्या वेळेत तेही पूर्ण करा. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व चतुरस्र बनेल.
- दिवाळीच्या सुटीत, उन्हाळ्याच्या सुटीत, वीक एंडला छोटे-मोठे व्यवसाय करावयास सुरवात करा. त्यातून मिळालेल्या अतिरिक्त उत्पन्नाची चटक लागली, की ते वाढविण्याचा प्रयत्न करा. कदाचित, तेच व्यवसाय तुमच्या भविष्यातील उपजीविकेचे साधन बनतील.
- भरपूर प्रवास करा, जग बघा, जगण्याच्या नवनवीन पद्धती आत्मसात करा, ठिकठिकाणी व्यवसाय पद्धती कशा चालतात, त्यांचे चिकित्सक विश्‍लेषण करा. इतर प्रदेशांतील विविध वस्तू आपल्या गावी आणून त्यांना बाजारपेठ मिळू शकेल काय, याचा अभ्यास करा व त्यातून किती लाभ मिळू शकेल, याचा अंदाज घ्या.
- गावोगाव मोठमोठी व्यावसायिक प्रदर्शने भरतात. त्या प्रदर्शनांना अवश्‍य भेटी देत राहा. त्यातून व्यवसाय क्षेत्रात कोणकोणत्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत, याबद्दल निश्‍चितच अधिक ज्ञान मिळेल.
- मोठमोठ्या व्यावसायिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घ्या. त्यांच्याकडून यशस्वी व्यवसायाबद्दल टिप्स घेत राहा. त्यांच्याकडून व्यवसायात येणाऱ्या विविध अडचणींबद्दल व संकटांबद्दल जाणून घ्या व त्या त्यांनी कशा टाळल्या, याबद्दल त्यांचे विचार संग्रही करा.
- व्यवसायसंवर्धनासाठी सरकारने विविध संस्था स्थापन केल्या आहेत. अशा संस्थांना भेटी, तिथे उपलब्ध असलेले लिखित साहित्य मिळवा व त्याचे सखोल वाचन करा.
- नाटकात एखादा नट एखाद्या पात्राचे काम करतो त्या वेळी तो त्या पात्राशी एकरूप होतो. तो जर पूर्णपणे एकरूप होऊ शकला तरच तो कसलेला नट बनतो. तसाच "मी व्यावसायिक बनणार', हा ध्यास मनाला लागू द्या. तो लागला तर आपल्या चालण्यात, बोलण्यात, विचारांत, कृतीत, वागणुकीत आपोआपच बदल जाणवायला लागेल व आपल्या मानसिकतेत परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.

07 July 2006

रात

रात

बघता बघता सरली स्वप्ने, अस्वस्थांची सरली लाट
चालत जाता उरले अंतर, काट्यांनीच सजली वाट

आले कितीक गेले कितीक, अंतर आहे अजुनी तितुकेच
काजळ राती अंधारातुन, अश्रु ढाळीत भिजली रात

काळाला मग भुक लागली, माझे हसुच गेला खाऊन
जुन्या आठवा ताज्या झाल्या, नागाजैसी टाकून कात

रातच सोबत, रातच वैरी, रातच जिवंत, रातच मृत्यु
सांज बुडाली अंधारातच, कुठे हरवली रम्य पहाट.. ?

एकटाच मी घुमतो आहे, रान पालथे घालीत पायी
प्राण आतले संपत आले, रात अजुनी तशीच वहात..

संतोष

Popular Posts