23 March 2011

राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो


राजे...........

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी खरे कुणीच बोलणार नाही

गाईडहोण्याची संधीही मी कशाला हुकवतो?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

सुरूवात शिवनेरीपासून
? की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी
? कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका
, कुणालाच उपदेश नको,
"
आपापसात लढू नका" तेव्हाही पटले नाही, आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने काळ बघा कसा सोकावतो
?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

शिवबा घडवायचा असेल तर त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
शहाजीच्या मनामध्ये ही आस ठसली पाहिजे.
पण आजकाल हे सारे घडताना दिसत नाही
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते पण पचनी पडताना दिसत नाही.
पोकळ मराठी बाणा तर बघा स्वत:लच फ़सवतो
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ते बघा नवे देशमुख
, ते बघा नवे देशपांडे, वतनदारीसाठी टपलेले आहेत 
त्यांच्या आतली काळी माणसं खादीमध्ये लपलेले आहेत.
पराक्रमाला तोड नाही कर्तुत्वाला जोड नाही
महाराष्ट्राच्या भल्याची स्वार्थापुढे ओढ नाही
म्हणूनच तर सह्याद्री आपला माथा झुकवतो
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ज्यासाठी जान की
बाजीलावावी तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
पिसाळांचा सूर्याजी तर इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.

"
आधी लगीन कोंढाण्याचे"म्हणण्याची आज तानाजीत हिंमत नाही
बापजाद्यांच्या पराक्रमांची आज रायबाला किंमत नाही.
जो तो सोईप्रमाणे आज इतिहासाला वाकवतो.
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

आपलेच आपल्याला लुटायला लागले परक्यांची आवश्यकता नाही
परक्यांनीच लुटले पाहिजे हा काही त्यांचाच मक्ता नाही.
डोळे मिटलेल्या मांजरीचे सारे नखरे कळत आहेत
मनातल्या मनात शायिस्तेखानाची बोटे अजून वळवळ्त आहेत.
आपलाच गनिमी कावा बघा आपल्यालाच कसा चकवतो
?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघ प्रतापगड सांगतोय
, इथेच पराक्रम घडला होता.
अफ़जुल्याचा कोथळा बाहेर पायथ्याशी पडला होता.
अजूनही अफ़जुल्या तो पराक्रम सांगतो आहे.
आम्ही आमची अक्कल उगीच वेशीला टांगतो आहे.
मेलेल्यांशी वैर धरून कुणी अफ़वा इथे पिकवतो
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा ज्याचा प्रदेश
, तिथेच त्याचा किल्ला आहे.
इष्टप्रधान मंडळाचा फ़ायदेशिर सल्ला आहे.
ज्याचा त्याचा झेंडा आहे ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
सुखी माणूस तोच
, ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
डोक्यावरून पाणी चाललेय जो तो आपल्यापुरते चुकवतो
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शिवा काशिद
,मुरारबाजी, नेताजी,हिरोजी आणि मदारी आता भेटाण्याची आशा नाही.
जीवाला जीव देण्याची
, मावळ्यांना आता नशा नाही.
खूप झाल्या सेना
, खूप झाले सेनापती, सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
वाईट वाटण्याचे कारण नाही
, आजच्या राजकारणाची हीच धाटणी आहे.
निष्ठा दाखवायची खुमखुमी येता पटकन डिजिटल ब्यानर दाखवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

पुरंदरच्या तहाची परंपरा आजकाल जोरात पाळली जाते.
परस्परांचा फ़ायदा असेल तर राजकीय लढाईही टाळली जाते.
राजकीय मांडवली झाली की
, पाच वर्षापुरते तरी भागते.
राजे
,छाव्याला जामीन ठेवायला, वाघाचे काळीज लागते.
दुसर्याच्या जळत्या घरासामोर आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

राजे
,यांना शहाणे समजू नका, हे तर चक्क बावळे आहेत.
तुम्हाला केलेय देव त्यांनी
, तुमची इथे देवळे आहेत.
लाज वाटते म्हणून सांगतो
, आम्ही पदरचे रेटत नाही.
तुळजा भवानीने तलवार दिलीच कशी
? आमच्या बंडखोर मनाला पटत नाही.
खरा इतिहास राहिला बाजूला
, ओळखा कोण ह्या कंड्या पिकवतो?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शेतकर्यांची अवस्था अशी की
, जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
बारा महिने तेरा त्रिकाळ त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
राजे
,चूकुनही बघू नका त्यांची अवस्था कशी आहे?
विषासाठी पैसा नसेल तर घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
व्याजाने व्याज वाढत जाते तरीही विचारतात
, हप्ता का थकवतो ?
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

सरकार म्हणाले शिका
, पोरं इथले शिकले आहेत.
शिक्षणाची दुकाने तर वढ्या-वघळीला टाकले आहेत.
सिंहगडाखालचा पराक्रम तर खरोखरच बघण्यासारखा होता.
रेव्ह पार्टीच्या थोबाडावर उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
येतील तसे दिवस आपला महाराष्ट्र धकवतो.
राजे
, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

जसे राजकारणाचे
, तसे साहित्याचेही झाले आहे.
सहकाराला स्वाहाकाराचे बकासुरी रूप आले आहे.
आया-बहिणींच्या इज्ज्तीची समस्या तर जटील आहे.
नाक्या-नाक्यावर उभा जणू रांझ्याचा पाटील आहे. लोकशाहीचा पाईक मी
,

राजे
, चला मी तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

09 February 2011

भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे.

भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल.

माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहाल पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि खंर बघाल तर पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो. संध्याकाळी दिवेलागणीला म्हंटली जाणारी स्त्रोत्रे किंवा गणपतीच्या दिवसात होणारी सहस्त्र आवर्तने अगदी देवाच्या पूजेत किंवा लग्नात म्हंटले जाणारे मंगलमय श्लोक सगळे आपल्याला माहिती आहेत काही पाठ आहेत.

हि भाषा जिवंत ठेवणं आता आपल्या हातात आहे. कारण मागील सर्वेक्षणात संस्कृत माहिती असलेल्या लोकांची संख्या केवळ काही हजारात आहे आणि त्यामुळे तिला मृत भाषा घोषित केले जावू शकते. उलटपक्षी अरबी, फारसी माहिती असलेले लोक बरेच जास्ती आहेत कारण काही राज्यात अगदी ठरवूर ह्या भाषा पत्रकात भरल्या आहेत. मृत भाषा घोषित झाली की त्या भाषेच्या उत्कर्षासाठी कुठलाही निधी दिला जात नाही. आणि मग आपली ही पुरातन आणिपवित्र भाषा कायम स्वरूपी काळाच्या पडद्याआड जाईल.

तुमचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न ह्या भाषेला जिवंत ठेवू शकतो. आज आपल्याच भाषेवर ही वेळ येण्यास आपण सगळेच जबाबदार आहोत पण अजून वेळ गेली नाही

जेवढी जमत असेल तेवढी गम्मत म्हणून का होईना वापरा. आपल्या मित्रांना सुद्धा सांगा आणिजमेल तेवढा संस्कृतचा प्रचार करा


|| जयोस्तु हिंदू राष्ट्रंम् ||

Popular Posts