Showing posts with label भटकंती. Show all posts
Showing posts with label भटकंती. Show all posts

04 July 2012

पश्चिमघाट पण युनुस्कोच्या वारसा यादीत

भारतातील 1600 किलोमीटर लांबीचा पश्चिम घाट आणि तिथल्या पर्वतरांगाचा समावेश संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला असल्याचे जाहीर केले

संयुक्त राष्ट्र- देशातील 1600 किलोमीटर लांबीचा पश्चिम घाटातील पर्वतरांगा जंगलांचा समावेश संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक वारसा स्थळांमध्ये केला असल्याचे जाहीर केले आहे.हिमालयापेक्षाही प्राचीन वने पश्चिम घाटात असल्याचे सांगत येथील जैवविविधता जोपासण्यासाठी युनेस्को विशेष लक्ष देणार आहे. युनेस्कोच्या घोषणेमुळे  भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

रशियातील सेंट पिटर्सबर्ग येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कास पठार (सातारा), कोयना अभयारण्य, चांदोली अभयारण्य (सांगली) आणि राधानगरी अभयारण्य (कोल्हापूर) ही ठिकाणे 'जागतिक वारसा' स्थळांच्या यादीत सामिल झाली आहेत.

पश्चिम घाटातील पर्वतरांगा पश्चिमेकडील राज्यांमध्ये पावसाचे विभाजन करण्याची महत्त्वाची कामगिरी बजावते. या जंगलांमधील वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, कीटक हे इन्डेमिक या प्रकारात मोडणारे आहेत, म्हणजे अशा प्रकारचे जीव जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. इतका मोठा जागतिक वारसा आपण वृक्षतोड करून, खाणी खोदून, वेगवेगळे प्रकल्प उभारून नाहीसा करण्याच्या मार्गावर आहोत. परंतु आता मात्र यापासून रोखणे शक्य होणार आहे.या ठिकाणाला जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याने त्याच्या संरक्षणाची जबाबदारीही येईल आणि त्यात युनेस्को सक्रिय असेल. युनेस्कोच्या निर्णयामुळे पश्चिम घाटावरील पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्था आणि तज्ज्ञांचे तांत्रिक तसेच आर्थिक सहकार्य लाभणार आहे.



महाराष्ट्रातील पश्चिमी घाटासोबतच जर्मनीतील मारग्रेवियल ओपेरा हाऊसचा समावेश जागतिक वारसा असलेल्या स्थळांमध्ये करण्यात आला आहे. 18 व्या शतकामध्ये  बांधण्यात आलेली ही वास्तू स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमूना आहे.पोर्तुगाल येथील एल्वस या नगरा भोवती असलेल्या तटबंदाचाही समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे.

02 October 2010

किल्ले विसापूर

किल्ले विसापूर

लोणावळा- मालवली पासून हाकेचा अंतरावर असणारा विसापूर किल्ला लोहागडच एक भाग म्हणून ओळखला जातो.

महाराष्ट्रातील ८०%  ते ९०% किल्ले १३ ते १४ शतकातील असतील तसं विसापूर बद्दल नक्की नाही, हा किल्ला अगदी  अलीकडच्या काळातील म्हणजे शिवाजी महाराजाच्या हि नंतर पेशवाईत उभारण्यात आला.

लोह्गडच्या तुलनेत हा तसा सावत्रच राहिला.... पण इतिहासात याची नोंद ज्याचा विसापूर त्याचा लोहगड अशीच राहिली.... लोह्गडच्या तुलनेत हा त्याचा पेक्षा उंच विस्तीर्ण असूनही हा नेहमी डावाचा राहिला.



गडाची तटबंदी अजूनही पाहण्यासारखी आहे, गडावर मोडकळीस आलेल्या दोन छप्पर नसलेल्या इमारती आहेत,


पाण्यासाठी गडावर दगडात कोरलेले तलाव व गुहा आहेत.



गडावर मारुतीचे दगडात कोरलेले ६ फुटी शिल्प आहे तेच या गडाचे आराध्य दैवत.

पाटण गावातून गडावर येताना गडाच्या तटबंदीला लागूनच एका गुहे जवळ मारुतीचे आणखी एक सुंदर शिल्प आहे.



आता गड हा आजूबाजूच्या गावातील गुराचे कुरण झाले आहे.

 



27 November 2008

तार्कर्ल्लीचा समुद्राकिनारा

तार्कर्ल्लीचा समुद्राकिनारा
माझी समुद्रकिनारे पाहण्याची सवय तशी जुनिचा आहे तस्सा मी गोवातील पुष्कल किनारे पाहिले असतील पन जरा वेगलेपनासाठी महाराष्ट्रातील दुल्कक्षित किनारे पहायचा ठरवून घरातून मित्राना घेउन निघालो.

नेहमीप्रमाने रात्रीच्या कोकंणकन्या एक्सप्रेसने घिविम ला पोहचलो नेहमीप्रमाने कलंगुट बागा अंजुना बिचला भेट देवून थोड रुचिपलत म्हणुन मोर्जी बिच, आश्विन बिच पाहून केरी गोवाची महाराष्ट्राकडील किनारपट्टी पहयाचा ठरवून केरीला पोहचलो,


मोर्जी बिच मी अन अमित

केरि तो शांत समुद्रकिनारा पहिला आणि खरच कहितर वेगळ पाहिल्याचा आनंद झाला.

केरी समुद्रकिनारा

तरीने तेरेखोल नदी पारकरून तेरेखोल किल्ला पहिला, तेरेखोल किल्ला आता एक हेरिटेज होटल झाला आहे


तेरेखोल किल्ला - तेरेखोल हेरिटेज होटल

आता खरी भटकांतिची मजा येत होती तेरेखोल किल्ला पाहून आम्ही शिरोडाकडे निघालो,



शिरोडा सावंतावाडी कुडाल मार्गे सायंकाली मालवणला पोहोचलो, रात्रि नाथपै वसतिगृहात राहून पहाटे तर्काल्ली कड़े निघालो,


नाथपै वसतिगृह

वाटेत रॉक गार्डन जय गणेश मन्दिर करत तर्काल्लीला पोहचलो आणि तो किनारा पाहून मंत्रमुग्ध झालो, अथंग समुद्रकिनारा मधेचा डोकेवर करुन पहनारी खडकाची टोक मधोमध उभा सिंधुदुग्र किल्ला, नित्तल स्वाच्छ पानी पाहून मन खुश झाला.....


तार्कर्ल्ली बीच - मुस्तफा

पुढली सफर सिंधुदुग्रची ......

Popular Posts