नेहमीचाच पाऊस तसा……
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
कोरड्या झालेल्या मातीत….नाच नाच नाचला….
तेच थेंब,तेच पाणी…
पावसावरचीही तीच गाणी….
गाण्यातला सुर जरा तेवढा….
एकटा एकटा वाटला….
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
पाण्यातुन वाहणारी कागदाची होडी….
वाफाळलेला कपातील चहाची गोडी…
कप जुना तसाच… मात्र….
चहातलाच गोडवा आटला……
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
रस्त्यावरचा नकोसा चिखल सारा…..
घरा-घरात घुसणारा सोसाटयाचा वारा…
घरं अगदी तशीच उभी….
वाराच कसा दिशा भरकटला…..
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
पावसामुळेच काय ते.. प्रेम-बिम जमलं होत……
एका हाताने…. दुस-या हाताला हळुच हातात घेतलं होत……
प्रेम कधीचच संपल….
कारण हातच कायमचा सुटला…..
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
अश्रुंना तुझ्या या आवर रे आता….
दु:खातुन तु जरा सावर रे आता….
अश्रु कधीचेच आटले हो….
एक थेंब फक्त्त डोळ्यात साचला…..
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
पावसावरती कविता लिहीन म्हणालो….
ओलं चिंब अंग करीन म्हणालो…..
ओलं चिंब होण्याआधीच….
पाऊसच संपला…..
नेहमीचाच पाऊस तसा..आज वेगळा वाटला….
—-ललित
Airavatesvara Temple - UNESCO World Heritage Site
11 years ago