31 December 2008

काय सांगु तिच्या बद्दल

काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात मला
दुखवता मात्र येत नाही.

काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगते
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु तिच्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करते.....
पण शब्द ही मला पुरत नाहीत...

No comments:

Popular Posts