कांही वर्षांपूर्वी पावसाळा सुरू होताच गोव्यातील पर्यटनाला मरगळ
यायची. पावसाला ‘ऑफ सिझन’ ठरवून स्वत:हून येतील त्या पर्यटकांवर समाधान
मानले जायचे. आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. उन्हाळ्याप्रमाणे पावसाळ्यातही
गोव्यातला पर्यटन हंगाम बहरू लागला आहे. पूर्वी ५ ते १० टक्के असणारे हॉटेल
आरक्षण आता ६० ते ७० टक्क्यांवर जाऊन पोचले आहे. गोवा सरकारने पावसाळी
पर्यटनाच्या केलेल्या मार्केटिंगची चांगली फळे सध्या पर्यटन व्यावसायिकांना
चाखायला मिळत आहेत.
ऑक्टोबरपासून मेअखेरपर्यंत गोव्याचा पर्यटन हंगाम ऐन बहरात असतो. डिसेंबरअखेर सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी देश-विदेशांतील लाखो पर्यटक गोव्याला पसंती देऊ लागले आहेत. सोनेरी वाळूचे आणि माडा-पोफळीच्या बागांची झालर असलेले गोव्यातील किनारे देश-विदेशांतील पर्यटकांना गोव्यात खेचून आणत आहेत.
किनारी पर्यटनाला जोडून पर्यटन वृद्धीस हातभार लागेल असे अनेक उपक्रम गोवा सरकारने पर्यटन खात्याच्या माध्यमातून हाती घेतले आहेत. रस्ते, विमान आणि रेल्वेने देशातील प्रमुख शहरांशी गोवा जोडले गेले असल्याने ‘विकएंड’ साजरा करण्यासाठी गोव्यात पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. कॉर्पोरेट जगतात गोवा हे ‘विकएंड डेस्टीनेशन’ म्हणून लोकप्रिय होऊ लागले आहे. गोव्यातल्या पार्टीची मजा काही औरच असते. विकएंड असो अथवा डिसेंबरअखेरचे दिवस असोत; ठिकठिकाणी पार्ट्या आयोजित करून गोव्यातील प्रत्येक क्षण ‘यादगार’ करण्याची संधी पर्यटक शोधत असतात. त्यातूनच गोवा हे ‘पार्टी डेस्टीनेशन’ बनू लागले आहे.
देश आणि विदेशांतील नवदांपत्यांना गोवा नेहमीच खुणावत असतो. गोवा हे फार पूर्वीपासून ‘हनिमून डेस्टीनेशन’ म्हणून सर्वत्र परिचित आहे. पावसाळ्यात अनेक नवदांपत्ये ‘हनिमून’ साजरा करण्यासाठी गोव्यात येत असतात. सरकारने पर्यटन खात्याच्या माध्यमातून ही संधी कॅश करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘हनिमून पॅकेज’ला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढतच आहे. गोव्यातील पर्यटनस्थळांची सैर आणि सवलतीच्या दरात जीटीडीसीच्या रेसिडेन्सीमध्ये मुक्काम करण्याची संधी पर्यटकांना या पॅकेजमधून घेता येते. हंगामापेक्षा हे दर बरेच कमी असल्याने गोव्यातील पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी येणार्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटन खात्याचे ‘हनिमून पॅकेज’ लोकप्रिय होऊ लागले आहे. जूनमध्ये जीटीडीसीच्या रेसिडेन्सीमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक बुकिंग झाले आहे. व्हाईट वॉटर राफ्टिंगचा थरार एक वेगळा अनुभव देणारा ठरत असल्याने साहसी पर्यटक त्याकडे वळू लागले असल्याचे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल यांचे मत आहे.
सोनेरी वाळूच्या किनार्यांवर फेसाळत येऊन धडकणार्या लाटा, हिरवागार शालू नेसून नटलेले डोंगरमाथे, कड्यांवरून फेसाळत कोसळताना आपल्या तुषारांनी प्रत्येकाच्या मनाला आणि शरीराला प्रफुल्लित करणारे धबधबे, गोव्यातील पर्यावरणाची श्रीमंती दाखवणारी अभयारण्ये, सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारे सण-उत्सव, तृप्तीचा ढेकर देणारे रुचकर जेवण यांचा आस्वाद घेण्यासाठी, विशेष करून पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी येणार्या देशी पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने पूर्वी ऑफ सिझन म्हणून दुर्लक्षित राहिलेल्या पावसाळ्यात आता पर्यटन हंगाम बहरू लागला आहे.
गोव्यात येणारे पर्यटक किनार्यांव्यतिरिक्त गोव्यातील इतर पर्यटनस्थळांकडे वळावेत यासाठी गोवा सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. दुर्लक्षित पर्यटनस्थळांचा विकास करून तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. हरवळेच्या धबधब्याचा विकास आणि परिसराचे सौंदर्यीकरण हा त्याचाच एक भाग आहे. हरवळे धबधबा नेहमीच पावसाळी पर्यटकांना खुणावत असतो. तिथे पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटक त्याचा आस्वाद घेतील हे जाणून पर्यटन खात्याने हरवळे धबधबा परिसराचे सौंदर्यीकरण केले आहे. नुकतेच पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्या हस्ते कामाचे उद्घाटन झाले आहे. मये तलाव परिसराचा विकास करून तिथेही पर्यटकांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे.
चोर्ला घाटातील धबधबे ओसंडून वाहू लागल्याने स्थानिक आणि देशी पर्यटक तेथील धुक्यात हरवून पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत. दूधसागर धबधब्याचा आविष्कार डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आजही हजारो पर्यटकांची पावले दूधसागर धबधब्याकडे वळत असतात. रेल्वेतून जातानाही धबधब्याचे उडणारे तुषार अंगार घेण्यासाठी प्रवासी धडपडत असतात. डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्यासह नेत्रावळी आणि म्हादई अभयारण्यातही निसर्गाचा आगळावेगळा आविष्कार पाहायला मिळतो. त्याशिवाय खासगी संस्थांनी उभारलेली स्पाइस फार्म ही संकल्पना पर्यटकांमध्ये लोकप्रिय होऊ लागली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात प्रत्येक क्षण एंजॉय करण्याची संधी सर्वच स्पाइस फार्ममध्ये पर्यटकांना मिळते.
आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला साहसी पर्यटनाचा भाग म्हादईतील व्हाइट वॉटर राफ्टिंगने पूर्ण झाला आहे. गेल्यावर्षी सुरू झालेला हा उपक्रम आवड असलेल्या पर्यटकांच्या पसंतीस पडू लागला आहे. एका वेगळ्याच थराराचा अनुभव व्हाइट वॉटर राफ्टिंगमुळे पर्यटकांना येऊ लागला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी घेण्यात आल्याने ज्यांना पोहता येत नाही अशांनासुद्धा या थराराचा अनुभव घेता येणे शक्य होत आहे. व्यावसायिकदृष्ट्या हा उपक्रम यशस्वी होताना दिसत आहे. देशी आणि विदेशी पर्यटक ऑनलाइन बुकिंग करून या साहसी पर्यटनाचा लाभ घेताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेऊन त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीतही पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले आहे. गोव्यातील पर्यटन क्षेत्राला वेगळा आयाम देण्याचे सरकारने ठरवले आहे. आता गोव्यात येणार्या पर्यटकांना गोव्याच्या पर्यटनस्थळांचा नजराणा हवाई सफर करून पाहता येणार आहे. पाण्यावर आणि हवेत चालणार्या ऍम्फिबियन विमानाच्या माध्यमातून पर्यटकांना हवाई आणि समुद्री सैर घडवून आणली जाणार आहे.
किनार्यांवर समुद्रस्नानासाठी येणार्या पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सरकारने धाराशॉ कंपनीतर्फे किनार्यांवर शौचालये आणि चेंजिंग रुम्स उभारण्याचे ठरवले आहे. गोव्यातील प्रमुख अशा सर्व किनार्यांवर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. गोव्यासारख्या जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणी परिषदा आयोजित केल्यास त्याला मिळणारा प्रतिसाद चांगला असल्याचे आढळून आल्याने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्था परिषदांच्या आयोजनासाठी गोव्याची निवड करतात. मोठ्या परिषदांच्या आयोजनाला प्रोत्साहन मिळावे व आयोजकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी लवकरच जागतिक दर्जाचे कन्व्हेंशन सेंटर उभारले जाणार आहे. त्यातून कॉर्पोरेट पर्यटनाला चालना मिळू शकेल.
पर्यटन व्यवसायासाठी लागणारे मनुष्यबळ गोव्यातच तयार व्हावे यासाठी फर्मागुडी येथे अद्ययावत हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट उभारले जाणार आहे. याशिवाय पणजी जेटी, पार्किंग प्लाझा आणि पर्यटन भवनसारखे प्रकल्प पूर्णत्वास नेऊन वर्षाचे ३६५ दिवस पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज राहण्याचे सरकारने ठरवले आहे.
गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि पर्यटन खात्याच्या राज्यस्तरीय मार्केटिंग आणि प्रोत्साहन समितीच्या बैठकीतही पर्यटकांच्या हिताचा विचार करून अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. ‘अपना मॅप’ही त्याचाच एक भाग आहे. त्याद्वारे गोव्याच्या पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी मार्ग दाखवले जाणार आहेत. नॅशनल जिऑग्रामी हे आंतरराष्ट्रीय चॅनल गोव्यातील संस्कृती, पर्यटन, पुरातत्त्व वास्तू आदींवर ३० मिनिटांचा माहितीपट तयार करणार आहे. नॅशनल जिऑग्राफीची टीम त्यासाठी ४५ तासांचे शुटिंग करणार असून त्याचे संपादन करून ३० मिनिटांचा माहितीपट बनवला जाणार आहे. हा माहितीपट जगभरात प्रसारित केला जाणार आहे. नॅशनल जिऑग्राफीची प्रेक्षक संख्या जास्त असल्याने त्याचा गोव्याच्या पर्यटनाला फायदाच होणार आहे. डिस्कव्हरी इंडिया व इतर आघाडीच्या पर्यटनविषयक मासिकांतून, नियतकालिकांमधून गोव्यातील पर्यटनस्थळांची माहिती सर्वदूर पोहोचेल यासाठी प्रयत्न सुरू असून त्याला मिळणारा प्रतिसाद अपेक्षा वाढवणारा आहे.
पर्यटन खात्याने हॅरिटेज फॅस्टीव्हल, वाइन फॅस्टीव्हल, गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टसारख्या उपक्रमांतून पर्यटकांसमोर जाण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला आहे. पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात गोवा इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्टचे आयोजन केले जाणार आहे. म्युझिक शो व इतर कार्यक्रमांवेळी गोवा, नो टू ड्रग्ज, ग्रीन गोवासारखे संदेश लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न पर्यटन खाते व महामंडळाने केला आहे.
प्रभावी आणि आक्रमक मार्केटिंगचा फायदा गोव्याला होऊ लागला आहे. देशी पर्यटकांना गोव्यात आकर्षित करण्यासाठी आठ रोड शो आयोजित करण्यात आले आहेत. रोड शोमधून गोव्यातील पर्यटनस्थळांबरोबर सांस्कृतिक वैभव त्या-त्या ठिकाणच्या लोकांसमोर मांडून पर्यटकांना गोव्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विदेशातही बर्लीन, फ्रँकफर्ट जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रीया, मलेशिया, थायलंड, फिनलँड, नॉर्वे, इंग्लंड, स्पेन, इटली, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये रोड शो करून विदेशी पर्यटक गोव्यात मोठ्या संख्येने यावेत यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. गोवा पर्यटन खाते व महामंडळ आंतरराष्ट्रीय पर्यटन जत्रा व मेळाव्यांमध्येही भाग घेणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ओटीडीव्हायकेएच लेजर-मॉस्को, आयएफटीएम- पॅरिस, आयटीबी एशिया- सिंगापूर, डब्ल्यूटीएम- लंडन, आयटीबी- बर्लिन व एमआयटीटी मॉस्को येथील आंतरराष्ट्रीय पर्यटन जत्रांमध्ये गोव्यातील पर्यटनस्थळांचे आक्रमक मार्केटिंग केले जाणार आहे. गोव्यातील पर्यटनाच्या येणार्या हंगामात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन खाते व महामंडळाने देशी पर्यटन जत्रा व मेळाव्यांमध्ये भाग घेण्याचे निश्चित केले आहे. त्यात टीटीएफ, आयटीएम, आयआयटीएम, हॉलिडे एक्स्पो, आयटीटीई, हिंदू ट्रॅव्हल डिस्कवर, साठे व इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये गोवा पर्यटन खाते आपले दालन उघडून मार्केटिंग करणार आहे.
गोव्यातील पर्यटनस्थळांचे प्रभावी मार्केटिंग आणि सादरीकरण करण्यासाठी मुंबईतील ऍडफॅक्टर पीआर या कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट व प्रसिद्धी माध्यमांमधून गोव्याची चांगली प्रतिमा पोचवण्याचा प्रयत्न या कंपनीतर्फे केला जातो.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्तिशः पर्यटन खात्यात लक्ष घातले आहे. पर्यटन व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उभारून रोजगारनिर्मिती करण्यावर सरकारचा भर राहणार आहे. गोवा हे जागतिक पर्यटनस्थळ असल्याने जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी नुकतीच केंद्रीय पर्यटनमंत्री चिरंजिवी यांची भेट घेऊन गोव्यातील पर्यटन क्षेत्रात हाती घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. केंद्राकडून सहकार्य मिळाल्यास आणखी सुविधा निर्माण करून आधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्याची ताकद गोव्यात असल्याचे परुळेकर यांनी केंद्रीय पर्यटनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. सरकारने पर्यटन खात्यामार्फत हाती घेतलेल्या प्रकल्पांचा भविष्यात गोव्यात फायदा होणार असून गोव्यात येणार्या प्रत्येक पर्यटकाची गोवा भेट संस्मरणीय करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे परुळेकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यादृष्टीने त्यांनी पावलेही उचलली आहेत.
पर्यटन क्षेत्रात गोव्याने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वेळोवेळी घेण्यात आली आहे. अलीकडेच लोनली प्लॅनेट ट्रॅव्हल मॅगझिनतर्फे गोवा पर्यटनला बेस्ट व्हॅल्यू डेस्टीनेशन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ट्रॅव्हल प्लस लेजर इंडिया या मॅगझिनतर्फे गोवा पर्यटनला बेस पार्टी डेस्टीनेशन, बेस्ट हनिमून डेस्टीनेशन व बेस्ट लेजर डेस्टीनेशन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पर्यटन क्षेत्रातील ही गौरवशाली कामगिरी यापुढेही कायम राहील यासाठी गोवा सरकार प्रयत्नशील आहे.
लवकरच वर्षाचे ३६५ दिवस पर्यटन हंगाम असणारे पहिले राज्य गोवा असेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. गोव्यात पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार मिळत आहे. पर्यटन व्यवसायातील उलाढालही वाढत असून येत्या काही वर्षांत पर्यटन हा निश्चितपणे गोव्याचा आर्थिक कणा बनेल यात शंका नाही.

No comments:
Post a Comment