वेगवान कार्यप्रणालीच्या माध्यमातून पासपोर्ट कार्यालयांनीही कात टाकली
असून आता चक्क आठ दिवसांतही पासपोर्ट मिळवणे शक्य झाले आहे. फक्त त्यासाठी
आवश्यक त्या कागदपत्रांची व फॉर्ममध्ये दिलेल्या अटींची काटेकोरपणे ऑनलाईन
पूर्तता पासपोर्ट काढणार्या व्यक्तीने करणे अत्यावश्यक आहे.
अन्य कोणतीही अनावश्यक कागदपत्रे जोडू नये, असे आवाहन ठाण्याचे पासपोर्ट अधिकारी टी.डी. शर्मा यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत स्पष्ट केले. पासपोर्ट कार्यालयांचा वाढता व्याप आणि पासपोर्ट काढणार्यांची वाढती संख्या लक्षात घेता काही महिन्यांपूर्वीच यासंदर्भातले काम पासपोर्ट व टाटा कन्सल्टन्सी यांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला असून त्याचे काम सुरूही झाले आहे.
कागदपत्रे योग्य असल्यास व तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी नसल्यास आठ दिवसांत पासपोर्ट उपलब्ध होत असल्याचे शर्मा यांनी सांगितले. अत्याधुनिक पद्धतीने पूर्वीच्या पासपोर्ट वितरणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आल्याने झटपट पासपोर्ट मिळणे अधिक सोपे झाले आहे. सध्या देशभरात तब्बल ७७ हून अधिक पासपोर्ट केंद्रे उपलब्ध असून त्यामुळे हे शक्य झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्ज करा ऑनलाईन
आता पूर्वीप्रमाणे पासपोर्ट कार्यालयात जाऊन फॉर्म आणण्याची आवश्यकता नाही.
तुम्हाला त्याकरिता ऑनलाईनच अर्ज करावा लागतो. सुमारे पाच पानी ऑनलाईन तपशील भरल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी तारीख मिळेल. त्यावेळी सर्व कागदपत्रे घेऊन जावी लागतात.
पोलीस ठाण्याची पद्धती मात्र जुनीच : नव्या प्रणालीमुळे पासपोर्ट मिळणे जलद झाले असले तरीही पोलीस ठाण्याची पद्धत मात्र अद्यापही जुनीच आहे. त्यात जर अत्याधुनिकपणा आला तर पासपोर्ट मिळणे अधिक जलद गतीने सुखकर होईल, असेही मत अधिकार्यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment