'राहुल गांधींकडे आम्ही एक तरुण नेता म्हणून पाहतो. त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी वाटते. पण मुंबईवरील हल्याबाबत ते जे बोलले ते ऐकल्यावर डोक्यात गेले. त्यांचं चुकलंच.... तरुणांची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहे.
शुक्रवारी राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर तरुणांशी चर्चा केली असता मुंबई हल्ल्याबाबत त्यांनी केलेली वक्तव्ये आमच्या मनातील त्याच्या प्रतिमेला धक्का लावणारी आहेत अशी प्रतिक्रिया तरुणांमधून व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे हा राहुल गांधींचा इलेक्शन स्टंट आहे, याचे भानही तरुणांना आहे.
'राहुल इतर राजकीय नेत्यांपेक्षा किंवा नेत्यांच्या मुलांपेक्षा वेगळे वाटतात कारण त्यांचं चारित्र्य स्वच्छ आहे, त्यांना काम करण्याची इच्छा आहे असे वाटते,' इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असणारा अनुपम सांगतो. युथ आयकॉन म्हणून ते योग्य आहेत पण मुंबई हल्ल्याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यावर ते जाम डोक्यात गेले', अनुपमची संतापून सांगतो. एका खाजगी कंपनीत सेक्रेटरीची नोकरी करणाऱ्या मयुरीला राहुल गांधी बायस वाटायला लागलेत.
'देशाच्या प्रगतीबाबतचे त्यांचे भाषण ऐकले होते. पण मुंबई बद्दल बोलून त्यांनी फार मोठी चूक केली आहे. एकतर ते चुकीचे बोलले आणि दुसरं म्हणजे मराठी माणसाला त्यांनी टागेर्ट केलं. देशाची प्रगती साधायची असेल तर त्यांनी जात, धर्म मध्ये आणू नयेत', असे मयुरी म्हणते. द्वेषावर आधारित राजकारण सोडून द्या असे राहुल यांनी एका भाषणात सांगितले, तेव्हा ते डायनॅमिक वाटले होते. पण आता तेही तेच
टिपिकल राजकारण खेळू लागलेत असे मत अॅनिमेशनचा कोर्स करणाऱ्या मानसीने मांडले. 'राहुल अजूनही 'ममाज बॉय' आहेत, त्यांना काय बोलावं हे कळत नाही असे मानून त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे, तेही बायस आहे हे यातून कळलेच आहे अशी प्रतिक्रिया सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या प्रतिकने नोंदवली. 'ते मुंबईत आले, न आल्याने काही फरकच पडणार नसेल तर त्यांच्याबद्दल बोलायचं कशाला ? 'असा प्रश्न प्रतिक देसाईने उपस्थित केला. मराठी माणसांना दुखवून बिहारी लोकांची मतं
मिळविण्याचा स्टंट असेल तर मराठी माणसांचा अपमान करण्याची त्यांना गरजच नव्हती, २६/११ ची दहशत मुंबईकरांनी अनुभवली आहे. त्याचे राजकारण करून त्यांनी मोठी चूक केली आहे असे तरुणांचे म्हणणे आहे.
--
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥
Airavatesvara Temple - UNESCO World Heritage Site
11 years ago
No comments:
Post a Comment