06 May 2008

मन वळवण्याची कला

पटवणे' हे व्यवस्थापन विकास प्रशिक्षणातील एक महत्त्वाचं कौशल्य आहे. मॅनेजमेंटच्या भाषेत "निगोशिएटिंग' किंवा' इन्फ्ल्युएन्सिंग' या नावानं "पटवणे' या कौशल्याला ओळखलं जातं."समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष' अनुभव घेऊन परिपक्व होण्याची, मन वळवण्याची संधी उपलब्ध करून देणं म्हणजे त्या व्यक्तीला "पटवणे'. आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या बरोबरीच्या व्यक्तीला आपल्या प्रभावानं बदलायचं, आपल्यातील चांगल्या व सकारात्मक संस्कारांनी त्या व्यक्तीच्या सवयी व आवडीनिवडीला घडवायचं आणि हुशारी व चातुर्याने त्या व्यक्तीकडून सहकार्य मळवायचं, हे या पटवणे कौशल्यात अपेक्षित असतं.

दुसऱ्या व्यक्तीकडून काम करून घेण्याचे किंवा समोरच्यावर इम्प्रेशन करण्याचे दोन सरधोपट मार्ग सगळ्यांना परिचत आहेत. एक म्हणजे दादागरी करणे व दुसरा म्हणजे "मस्का' मारणे. पण आपल्या सभोवती असणाऱ्या नानावध स्वभावाच्या व्यक्ती केवळ वरील दोन धोरणांचा वापर करून वागवता येत नाहीत. त्या व्यक्तींना आपलंसं करण्यासाठी, आत्मीयता नर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या धोरणांचा व विविध कौशल्यांचा परस्पर मेळ घालून प्रभावी वापर आपल्याला करता यायला हवा.

आपला प्रभाव पाडण्यासाठी सकारात्मक देहबोली, आपला आत्मवश्‍वास, योग्य शब्दांची योग्य वेळी पेरणी आपल्याला जमायला हवी. त्यासाठी जयंतचं उदाहरण लक्षात घेऊ. जयंतचा शैक्षणक आलेख तसा ठीकठाक, पण हाती घेतलेलं काम चिकाटीनं पूर्ण करण्याची वृत्ती व ऑफिसच्या कामासाठी फिरण्याची प्रचंड तयारी या त्याच्याकडील दोन महत्त्वाच्या जमेच्या बाजूंमुळे त्याने कामाच्या ठिकाणी फार कमी कालावधीत मोठी मजल मारलेली आहे. "त्याला हे कसं काय जमतं?' असा प्रश्‍न त्याचा सबऑर्डनेट सुजय- जो नुकताच ऑफसमध्ये जॉईन झालाय- त्याला नेहमी पडतो. सुजयने शेवटी जयंतला वचारलंच, ""कसं काय जमतं बुवा तुला हे?''

जयंतने उत्तर देण्यापूर्वी सुजयच्या नजरेला नजर दली. त्याच्या चेहऱ्यावर छानसं हसू चमकलं. तो थोडा पुढं झुकला आण सुजयच्या खांद्यावर थोपून म्हणाला, ""तुलाही जमेल दोस्ता! त्यात काय अवघड आहे?'' मग पॉज घेतला व पुढं म्हणाला, ""चल, मी तुला शिकवतो. पण फी द्यावी लागेल बरं का! आण डाऊन पेमेंटवर मी पन्नास टक्के डिस्काउंट देतो. बोल, आहेस का तयार?'' सुजय थोडा भांबावला व जयंतच्या बोलण्याचा अर्थ क्षणात लक्षात येऊन त्याच्याबरोबर हसण्यात सामील झाला व नकळत टाळी देण्यासाठी (जयंतला) हात पुढे झाला.

साहजिकच जयंतच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेचा सुजयवर धनात्मक परिणाम होऊन त्याला जयंतबद्दल आपलेपणा वाटायला लागला.''खरं म्हणजे भावनिक पातळीला हात घालून, पण तर्कवचारांची कास न सोडता इतरांना पटवायला आपण शकलो तर समोरची व्यक्ती आपल्या भावना समजून घेते आहे, ही सुखद व दिलासा देणारी जाणीव नर्माण होऊन आत्मीयता व जिव्हाळा वाढतो व आपला प्रभाव समोरची व्यक्ती आनंदाने स्वीकारते. समोरच्या व्यक्तीला आपलं मत पटवायचं असेल तर समोरच्याचं संपूर्ण बोलणं लक्षपूर्वक ऐकण्याचं कौशल्य आपल्याला विकसत करणं गरजेचं आहे. तसेच आपल्या दोघांचं कशावर एकमत आहे, याचा शोध घेऊन त्यावर चर्चा करण्यामुळे सहअनुमतीचं वातावरण नर्माण होतं. त्यासाठी युक्तिवाद अत्यंत प्रभावी ठरतो. त्यासाठी आपला स्वर भांडणाचा नसावा, तसेच आपल्या परस्पर नातेसंबंधात विश्‍वासार्हता, पारदर्शीपणा व जुळवून घेण्याची तयारी असायला हवी व त्यासाठी प्रांजळ व मोकळा संवाद हवा. त्यामुळे धारदार शब्दांच्या शस्त्रानं वार करण्याऐवजी आपल्या आजूबाजूचे व आपण नःशस्त्र होण्यावर भर दिला तर "पटवणे' सहज शक्‍य होतं.अर्थात हे पटवण्याचं कौशल्य कॉपारेट मीटिंगमध्ये जास्त उपयुक्त ठरतं. कारण तर्कशुद्ध विचारांना त्या ठिकाणी प्राधान्य असतं.

समोरच्याला पटवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे "तुझे मत काय?' हा प्रश्‍न विचारणं. आपलं स्वतःचं मत लादण्यापेक्षा त्याला त्याचं मत मांडू देणं आवश्‍यक असतं. त्याच्या मताचा आदर ठेवून त्यानं मांडलेल्या मनातील महत्त्वाचे व आवडलेले विचार त्याला सांगून आपल्याला त्या संदर्भात आलेले विचार व साम्य असलेल्या विचारांची मांडणी करायची. जी काही भन्नता जाणवेल त्याचं मनमोकळेपणाने शंकानरसन करायचं. बघा, आपोआप समोरची व्यक्ती आपला प्रभाव मानू लागते.थोडक्‍यात काय, तर दुसऱ्यांना पटवण्याच्या वाटेने जाणाऱ्या या मार्गावरून चालून पाहा व आपला करिअर ग्राफ अधिक उंचवा!

27 April 2008

नेतृत्व कसं हवं?

एखादी संस्था प्रगती करते तेव्हा त्यात तिच्या नेत्याचा सिंहाचा वाटा असतो. खरं तर सर्व कर्मचाऱ्यांचाच वाटा असतो, पण या कर्मचाऱ्यांकडून हवं ते करून घेण्याचं कौशल्य नेत्याचं असतं. काय असतं नेमकं या नेत्याकडे?

चांगल्या नेतृत्वाचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक असतो. पुढे काय होऊ शकेल, याचा आडाखा तो बांधू शकतो. असं नेतृत्व एखाद्या संस्थेत असलं तर त्यामुळे त्या संस्थेपुढे असणाऱ्या आव्हानांचे डोंगर तो लीलया पार करू शकतो.

यशस्वी नेता आपल्या भोवतालच्या लोकांमधलं उपजत ज्ञान आणि गुण ओळखून त्यांच्या कार्यक्षमतेला वाव देतो. त्यांच्याशी सुसंवाद प्रस्थापित करून काम करण्यासाठी अधिकाधिक लोक कसे प्रवृत्त होतील आणि व्यवसायाला चालना मिळेल याकडे तो लक्ष पुरवतो. नेतृत्वगुण अधिक आदर्श होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या या काही गोष्टी-

स्वओळख
प्रथम आपल्यातलेच बरे-वाईट गुण ओळखायला शिकणं. ते गुण ओळखून त्यातल्या चांगल्या गुणांवर भर देत वाईट गुणांवर मात करावी. आपली कार्यशक्ती जोखून त्याप्रमाणे आपली प्रतिमा तयार करावी. प्रतिमा तयार झाली तरी कायम त्यातच अडकून पडू नये. त्यातही एक नेमकी दिशा पकडून त्या दृष्टीनं वाटचाल करायला हवी. इतरांना दिशादर्शन करण्याआधी स्वत:ची योग्य दिशा ठरवायला हवी.

दूरदृष्टी व ध्येयनिश्‍चिती
कामाच्या ठिकाणी नेत्याने निर्माण केलेल्या खेळीमेळीच्या वातावरणातही एक प्रकारची दूरदृष्टी दडलेली असते. त्याचा फायदा पुढे कंपनीलाच होतो. नेत्याने आपल्यापुढे काही ध्येयं निश्‍चित केली, तर त्यातून त्याची दूरदृष्टी दिसून येते. कंपनीला ठोस यश मिळवून द्यायचं असेल तर त्यासाठी ध्येयनिश्‍चितीतही वेगवेगळे आडाखे बांधावे लागतात. त्यातले काही पल्ले जवळचे तर काही पल्ले लांबचे असतात.

परिणामकारक सुसंवाद
एक नेता म्हणून तुमच्यावर, तुमच्या शब्दांवर आणि अर्थातच तुमच्या ध्येयधोरणांवर लोकांनी विश्‍वास ठेवायला हवा. नेत्याचा दृष्टिकोन प्रत्यक्षात यावा हा त्याच्या टीमचाही दृष्टिकोन असायला हवा. त्यासाठी एकमेकांवरचा विश्‍वास, लोकांच्या कार्यक्षमतेचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची हातोटी नेत्याजवळ असायला हवी. त्यासाठी आपल्या सहकाऱ्यांशी सातत्याने संवाद राखायला हवा.

मार्गदर्शक
नेतृत्व करणाऱ्याने स्वत: आपल्या कामाच्या बाबतीत सजग राहायला हवे. तो तसा वागला, की आपोआपच इतर सहकारीही कामाची हयगय करीत नाहीत. प्रत्येकाला त्याच्या आवाक्‍यातलं आणि क्षमतेचं काम वाटून दिलं तर काही गोंधळ न उडता ते होऊ शकतं. फक्त "आदेश' सोडून काम होतं असं नाही, तर त्या व्यक्तीला त्या कामात गोडी वाटायला हवी. त्याच्याकडून नेत्याने ते काम करवून घेतलं पाहिजे. प्रसंगी सहकाऱ्यांचं मत आणि विचारही ऐकून घेतले पाहिजेत. त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांवर विचार केला पाहिजे.

लोकांना त्यांच्या कामात पारंगत करणं आणि त्या कार्यक्षमतेचा योग्य रीतीनं वापर करून घेणं, ही नेत्याची प्राथमिक जबाबदारी मानण्यात येते. अशा वेळी नेत्यानं मार्गदर्शक होऊन काम करून घेतलं पाहिजे.

बदलाचा स्वीकार
बदलत्या काळानुसार नेतृत्वगुणांत होणारे व होऊ घातलेले बदल स्वीकारायला हवेत. बदल हे अपरिहार्य असतात, हे वास्तव स्वीकारायला हवं. जॅक वेल्स यांच्या मते, बाहेरच्या जगात वेगाने बदल होत असताना संस्थेतल्या बदलांचा वेग मंदावला असेल, तर... नेतृत्वाची दूरदृष्टी कुठे तरी हरवली आहे असं समजावं. स्थैर्यापेक्षा अस्थिर असतानाच एखादा उद्योग अधिक प्रगती करतो हे ध्यानी ठेवावं. म्हणूनच बदलाचं दडपण किंवा भीती न बाळगता त्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहणारा आणि सहकाऱ्यांनाही ती सकारात्मकता दाखवणारा नेता होणं गरजेचं आहे.

नेतृत्वगुण
फक्त एमबीएची पदवी घेतली म्हणजे नेतृत्व करता आलं असं नाही, पण त्याचं रीतसर शिक्षण घेतलं तर आपले गुण उंचावायला थोडी मदत होते. शिवाय नेतृत्वगुण नेमके कसे असावेत, व्यवस्थापन कसं करावं, आपलं वागणं-बोलणं कसं असावं आदी गोष्टींचं ज्ञान व्हायला हवं. अशा प्रकारे नेतृत्वगुण अंगी बाणवून कंपनीचं भलं करणाऱ्या नेतृत्वाचीच संस्थांना गरज असते.

- मोनिका दोशी

Popular Posts