15 October 2009

Diwali or Dipavali


Diwali or Dipavali a significant festival in Hinduism, Buddhism, Sikhism, and Jainism, and an official holiday in India.



Adherents of these religions celebrate Diwali as the Festival of Lights.



They light diyas—cotton string wicks inserted in small clay pots filled with oil—to signify victory of good over the evil within an individual.

12 October 2009

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय!

(चित्रपटात बोलू न शकलेलो, असं बरंच काही..!)


महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शरदराव पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेपरिवर्तन घडवतील ही आशा सर्वानाच होती.. पण त्यांनीही सुभेदारांच्याटोळ्या उभ्या करून, त्याचं सेनापतीपद आपल्या घरातच ठेवलं! आजमहाराष्ट्रात राज्य रयतेचं नसून, निवडक चाळीस घराण्यांचंच आहे! स्पष्टचबोलायचं तर आम्हीसुद्धा कधी आमच्या पुत्राला जनतेवर लादलं नाही, किंवात्याच्या गैरकृत्यावर पांघरूण घातलं नाही.. पुढच्या सात पिढय़ांसाठीस्थावर-जंगम मालमत्ता तर कधीच जमवली नाही.. परंतु आज नेत्यापोटी जन्मणंआणि दहावी उत्तीर्ण होऊन अकरा कोटींची माया जमवणं यासारखं सत्कृत्यराहिलेलं नाही! वर सर्व बापजादे त्यात गैर काय, म्हणून विचारताहेत! लाखो,तरुण, बेरोजगार कार्यकर्ते सतरंज्या उचलून वार्धक्यात गेलेले आणि यांचेदुधाच्या दाताचे वारसदार नवे सरदार बनण्याच्या वाटेवर! जगभरातनावाजलेल्या लोकशाहीचं यापेक्षा सुंदर विडंबन कुठलं असणार!

सप्रेम जय महाराष्ट्र!


गेल्या मार्च महिन्यात, महाराष्ट्रातल्या तमाम चित्रपटगृहांतून मीतुम्हाला भेटलो, तुमच्याशी बोललो, तेव्हा देशात लोकसभा होती.. आज पुन्हा भेटावंसं, बोलावंसं वाटतंय तेव्हा नेमकीविधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे!



चित्रपटाच्या माध्यमातून बोलताना खरं तर एक मर्यादा होती सेन्सॉरची! दचकूनका, माझ्याप्रमाणेच तुम्हालाही सेन्सॉरला ‘पूर्वपरिनिरीक्षण’ असा मराठीशब्द आहे हे पटकन आठवणार नाही! आणि चित्रपटात जेवढं मराठी बोलतो, तेवढंआज बोलणारही नाही. महाराष्ट्रातील तमाम जनता इंग्रजी, हिंदी मिश्रितमराठी बोलते, तशाच भाषेत मीही बोलणार आहे.. त्यामुळे धक्का बसून भावनादुखावल्या म्हणून माझे वंशज पाईक म्हणून वर्तमानपत्र जाळणं, संपादकांनाबडवणं किंवा कार्यालयाची नासधूस करणं असलं काहीही करू नका! हात जोडूननम्र विनंती, की माझ्या वतीने तुम्ही बोलूही नका!



ऐन निवडणुकीच्या वेळीच मी तुमच्याशी बोलायला का आलोय? कारण निवडणुकाम्हणजे राज्याभिषेकाचीच तयारी आणि तुमच्याप्रमाणेच आम्हीही ‘राजे’ होतो,पण कारभार अष्टप्रधान मंडळाच्या सल्लामसलतीनेच चालायचा.. हल्लीच्यालोकसभा, विधानसभा म्हणजे अष्टप्रधान मंडळाचाच आधुनिक अवतार.. मला नेहमीआश्चर्य वाटतं ते याचं, की या काळाला अनुरूप अशी ‘लोकशाही’ ही अत्यंतसमर्पक पारदर्शक व लोकप्रतिनिधित्व असलेली व्यवस्था भारतासारख्यास्वतंत्र सार्वभौम देशाने स्वीकारल्यानंतरही काही लोक ‘शिवशाही’ आणू,रामराज्य आणू असं का म्हणतात? आम्ही स्वराज्याची हाक दिली तेव्हाही आम्हीलोकांनी ‘रामराज्य’ आणू वगैरे म्हटलं नव्हतं.. सगळ्यांनी मिळून‘स्वराज्य’ स्थापू असं म्हटलं. एकीकडे ‘लोकशाहीवर विश्वास नाहीम्हणणाऱ्या या लोकांना लोकशाही पद्धतीने ‘शिवशाही’ आणायचीय, आणि दुसरीकडेरामराज्य आणणारे ‘हे राम’ म्हणतायत!



आज या देशात आणि महाराष्ट्रातही लोकांच्या नावापेक्षा माझ्यासह इतरविभूतींच्या नावानेच राजकीय पक्ष निघाले आहेत! एक महात्मा गांधींच्या, एकमाझ्या, एक प्रभु रामचंद्राच्या, एक डॉ. बाबासाहेबांच्या शिवायमायावतीजी, शरद पवारजी यांचे त्यांच्या-त्यांच्या नावाचे किंवा त्यांच्यानावे चालणारे पक्ष आहेतच! आमच्याकाळी एकछत्री अंमल असूनही कारभार चोखचाले.. आता अनेक छत्रे असूनही जनता मात्र उन्हा-पावसात, थंडी- वाऱ्यातहोरपळतेय, भिजतेय, काकडतेय!



आम्ही स्थापन केलेल्या महाराष्ट्राला काही‘शे’ र्वष होऊन गेली आणिस्वतंत्र भारतभूमीत लोकशाही पद्धतीने संघराज्य स्थापित झाल्यानंतर जीमहाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यालाही आता पन्नास वर्ष उलटून गेली.. यामहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिलं!परकियांविरुद्ध लढताना वीरमरण येणं हे आम्हाला समजू शकतं, पण एकाचदेशातील लोक प्रादेशिक सीमेवरून एकमेकात भांडतात, लढतात, त्यावरूनत्यात्या राज्याचं सैन्य गोळीबार करतं, माणसं मरतात आणि त्यांची स्मारकंबनतात हे आमच्या समजण्यापलीकडचं आहे.. कारण नंतर तो प्रश्न सुटत नाही,कुणी सोडवतही नाही, पण हुतात्म्यांना वंदन करायला मात्र कुणीच विसरतनाही.. आजच्या भाषेत सांगायचं तर कंपाऊण्ड वॉल बांधताना एक ‘भाऊ’ कामीआला, तर त्याचा फोटो लावून नेमानं वर्षश्राद्ध घालण्यासारखं झालं हे!



खरं सांगायचं तर आम्ही महाराष्ट्र स्थापन केला. आमच्या हयातीत, तोआम्हाला जसा घडविता आला, तसा आम्ही घडवला.. पण आमच्यानंतरही आमच्याचनावानं एवढं राजकारण चालेल हे आमच्या स्वप्नातही नव्हतं.. कुणी म्हणेलआम्ही भाग्यवानच! कारण अ‍ॅलेक्झांडर नेपोलियन, चंगेजखान यांच्या नावानंजगात कुठे एखादी सेना अथवा राजकीय पक्ष अस्तित्वात असल्याचं ऐकलेलंनव्हतं.. पण आमच्या नावे मात्र आहे!



आम्ही ‘स्वराज्य’ स्थापन केलं ते बारा बलुतेदारांसह सर्व जाती-जमातींनाएकत्र करून, त्या वेळच्या ‘मराठा’ प्रांताला धरून, आणि तमाम मराठा गोळाकरून! आणि आता या एकविसाव्या शतकात काही मंडळी आम्हालाच ‘मराठा’ असंजातीचं सर्टिफिकेट लावताहेत.. आमचा भगवा ध्वज भागवत धर्माची पताका,भेदाभेद टाळून समतेचा संदेश देणारा.. पण सध्या तो दहशतीचं निशाण झालाय.आम्ही आमच्या परिस्थिताला अनुरूप गड बांधले. किल्ले बांधले. विसाव्याशतकात, एकविसाव्या शतकात आधुनिक स्थापत्य काम करायचे का आमच्यागडकिल्ल्यांच्या प्रतिकृती करून शाखा, प्रशाखा बांधायच्या? आम्ही सर्दचझालो.. अहो वारसा टिकवायचाच, तर आम्ही जे किल्ले, दुर्ग बांधले त्याचीदुर्दशा, दुरवस्था थांबवा, मुंबईसारख्या आधुनिक शहरात पानाच्या टपरीसारखेगड कसले उभारता? यांच्या मित्रपक्षाने मध्ये ‘विटा’ जमवल्या रामाच्यानावे!

आमच्याप्रमाणे मराठी माणूस हाही एक ‘विषय’ या महाराष्ट्रातच व्हावायासारखे दुर्दैव काय? मराठी माणसावर आम्ही बोललो तर त्या चित्रपटाला तोबागर्दी! आपल्या समस्यांवर, न्यूनगंड नि अहंगंडांवर खूष होऊन टाळ्या वाजवूनघरी जाणारा संपूर्ण भारतवर्षांत ‘असा’ दुसरा समाज नसेल!



आम्ही ऐकलं, त्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारा ‘गाभ्रीचा पाऊस’नामे चित्रपट, प्रेक्षक संख्येअभावी चित्रपटगृहातून उतरवता झाला! चित्रपटउतरवला म्हणून निषेधासाठी पंचवीस मराठी माणसं जमली! (जी चित्रपट बघायलाआली असती तर आंदोलनाची वेळच आली नसती!)



आता या मराठी माणसांसाठी टिळक, गोखले, आगरकरांपासून फुले, शाहू,आंबेडकरांनीही अतीव महत्त्वाचं असं सामाजिक, राजकीय कार्य केलंय.. पण यासर्वाना बाजूला ठेवून त्या शोलेतल्या ठाकूरासारखा हात कापलेला आमचाअर्धपुतळा ठेवून ज्या काही राजकीय आरोळ्या मारल्या जातात, ते ऐकलं कीत्या शोलेतल्या ठाकूराच्या मदतीला जसे कोणी जय-वीरू धावले, तसे माझ्यामदतीला येतील काय असं मनापासून वाटतं! आम्हाला साक्ष ठेवून, आमच्या नावे‘आम्ही मर्द मावळे’ आहोत अशा गर्जना देतात, तेव्हा हसावं की रडावं कळतनाही.. अहो त्यावेळचा आमचा लढा सगळा त्या मावळ प्रांतात एकवटलेला,त्यामुळे मावळातला तो मावळा असा साधा अर्थ होता.. पण यांनी तो विशेषणकरून टाकला! त्याकाळी ‘मर्द’ वगैरे ठीक होतं.. स्त्रिया पडद्यात किंवाघरात असत.. आज स्त्रियाही खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात असताना,ज्या देशाची पंतप्रधान एक स्त्री होती, तिथे सारखे आम्ही मर्द आहोत हेकुणाला सांगता? अहो आम्हाला घडवणारीही साक्षात एक स्त्रीच होती..

माँसाहेबांवरून एक आठवलं.. आमचे गुरू कोण यावरून मध्ये बराच वाद झाला..तो वाद ऐकून आम्ही हसलो! कारण ज्यांना स्वत:ला आपल्याला पाचवी इयत्तेतकोण वर्गशिक्षक होते हे आठवणार नाही, त्यांना माझ्या गुरूचा शोध लावूनकाय साधायचंय? अहो माझ्यासकट रामदास, तुकाराम, आम्ही सर्वजण त्या-त्याकाळात आम्हाला जे-जे म्हणायचं, करायचं ते-ते कर्तव्य करून ‘इतिहासजमा’झालो.. आता तुम्ही तुमचं कर्तृत्व दाखवा की! की अजूनही शिवाजी म्हणतो नितुका म्हणे हेच चालणार?



आमच्या नावे सेना आहे, आमचाच ध्वज आहे, पण भाषा मात्र आमची नाही! बाकीगर्जना, तुताऱ्या, मावळे, जयभवानी सगळंसगळं आहे.. पण कर्तृत्व काय? तरमंडईपासून, रेल्वे स्थानक, विमानतळ सगळीकडे आमचं नाव.. हे कमी म्हणूनत्या ‘वडा-पाव’लाही आमचंच नाव! अशा वेळी तीव्रतेनं जाणवतं, आपल्याहयातीनंतर आपल्या नावे कुणी काही करू नका, असं स्पष्ट लिहून ठेवायला हवंहोतं!



तरीही आम्ही शांत होतो.. महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा, संस्कृतीवर्धिष्णु होण्यासाठी ही मंडळी काही करतील असं वाटलं होतं.. पण कपाळभरगंधाचा टिळा, हातात सोन्याच्या अंगठय़ा, मनगटात कडं, गळ्यात ‘चैनी’ अशानव्या रुपात काही मराठी नेते वर्धिष्णु झाले! मराठी वाडय़ा-वस्त्या उठवूनस्थानिक नगरसेवक, आमदार बिल्डर झाले.. वडा-पाव विकणारे रस्त्यावरचराहिले, आंदोलन करणारे पोलिसांचा मार खाऊन आयुष्यभरासाठी जायबंदी झालेआणि या मराठी गादीसाठी थोरली पाती नि धाकटी पाती वेगळी झाली!



मराठी माणूस आजही लोकल आणि बसला लोंबकळत घामेजून, चेंगरून चढत्या भावातप्रवास करतोय आणि सेनापतीपुत्र आणि पुतणे विदेशी वातानुकूल गाडीतूनउडताहेत, उडन खटोल्याशिवाय तर चार पावलंही चालत नाहीत! आम्हीदऱ्या-खोऱ्यातून, काटय़ा-कुटय़ातून आमची सेना वाढवली, यांच्या सेनाधनदांडग्यांच्या नि ऐषोआरामाच्या अंबारीतून वाढताहेत.. आणि हे म्हणेशिवशाहीचे दाखले देणार, आणि यांचे मित्रपक्ष ‘राम’ म्हणत वर आधुनिककुरुक्षेत्र करणार!



हे चित्र एकीकडे, तर दुसरीकडे गांधींचे वारस आमचं स्मारक बांधायलानिघालेत! यांनी तर एकही महापुरुष सोडलेला नाही! आमच्यासह फुले- शाहू-आंबेडकर यांनी ब्रह्मा-विष्णू-महेशासारखे वापरलेत.. हिंदूंना म्हणायचंमुस्लिमांचा धोका, मुस्लिमांना म्हणायचं हिंदूचा धोका, दलितांना म्हणेसवर्णाचा धोका, व्यापाऱ्यांना म्हणे करांचा धोका आणि शेतकऱ्यांना म्हणेशेतमालाचा धोका.. प्रत्येकासमोर एक भूत उभं करायचं आणि ते उतरवण्याचामंत्र आपल्याकडेच आहे, हे दाखवायचं! गांधीचा वापर चलनी नाण्यासारखा करीतकरीत आता त्यांनी चक्क चलनावरच गांधीजींना आणलंय! स्वत: गांधींनी कधीहीपरिधान न केलेली गांधीटोपी हे लोकांना घालत निघालेत.. यांच्यासारखी निबरकातडी मुघल किंवा इंग्रजांकडे असती तर स्वराज्य आणि स्वातंत्र्य दोन्हीकधीच मिळालं नसतं!



आम्हाला आणखी आशा होती, ती गोरगरीब कष्टकऱ्यांच्या बाजूनं उभंराहण्याची.. आजच्या भाषेत डाव्या पक्षांकडून उभं राहण्याची.. पण‘थिअरीत’ खूप मार्क्‍स मिळविणारा विद्यार्थी ‘प्रॅक्टिकल’मध्ये नापासव्हावा, तसं त्यांचं गेली पन्नास र्र्वष चाललंय.. त्यामुळेमहाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात गिरणगाव उद्ध्वस्त झालं, औद्योगिकपट्टे उखडले गेले, कामगारवर्गच नष्ट झाला तरीही कुठेही जनक्षोभ उभाराहिला नाही.. उलट तिथं उभ्या राहिलेल्या रंगीबेरंगी मॉल निमल्टिप्लेक्समध्ये आता त्यांच्याच लढय़ाचा सहानुभूतीदार असणारा‘मध्यमवर्ग’ नवश्रीमंत होऊन चैन करताना दिसतोय.. ‘सामथ्र्य आहे चळवळींचे’हे वचन अभिमानानं मिरविणाऱ्या महाराष्ट्रात आता संघर्षांत्मक कामकरणाऱ्या संघटना संपून, ओव्हरहेड प्रोजेक्टरनं प्रॉब्लेम्स प्रोजेक्टकरून, त्यावर परदेशी फंडिंगमधून काम करणाऱ्या एनजीओज तयार झाल्यात! हा एकवेगळाच ‘फंडा’मेण्टल बदल म्हणायचा!



फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावानं संघर्ष करणारी पिढी या डाव्यांच्यामदतीनं सर्वहारा वर्गाची सत्ता प्रस्थापित करील, असं वाटलं होतं.. पण तेआपसात तू डावा, तू उजवा, तू खादीधारी, तू समरसतावादी या आटय़ापाटय़ा खेळतबसलेत! मराठी सेनेसारखे यांचेही नेते समृद्ध झालेत नि सैनिक मात्रसर्वार्थानं अस्पृश्य राहिलेत!



भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांचे समर्थक‘मला निवडून द्या’, ‘मला मंत्री करा’ अशी सत्ताधाऱ्यांजवळ भीक मागताततुम्ही सार्वभौम घटना लिहिण्यासाठी झटलात? महापुरुषांना दोनदा मरण असतंम्हणतात.. एकदा नैसर्गिक आणि दुसरं अनुयायांकडून! माझ्यासह,भारतवर्षांतले महापुरुष हे याचं ढळढळीत उदाहरण आहे!संभवामि युगे युगे, असं कृष्ण सांगून गेला, त्याप्रमाणे प्रत्येक दशकात,शतकात कोणी ना कोणी अवतार घेईल या अंधश्रद्धेतून आपण सगळे अजून बाहेरयायचे आहोत.. किंवा त्या श्रद्धेतून आम्ही निश्चिंत तरी झालो आहोत!



महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शरदराव पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेपरिवर्तन घडवतील ही आशा सर्वानाच होती.. पण त्यांनीही सुभेदारांच्याटोळ्या उभ्या करून, त्याचं सेनापतीपद आपल्या घरातच ठेवलं! आजमहाराष्ट्रात राज्य रयतेचं नसून, निवडक चाळीस घराण्यांचंच आहे!



स्पष्टच बोलायचं तर आम्हीसुद्धा कधी आमच्या पुत्राला जनतेवर लादलं नाही,किंवा त्याच्या गैरकृत्यावर पांघरूण घातलं नाही.. पुढच्या सात पिढय़ांसाठीस्थावर-जंगम मालमत्ता तर कधीच जमवली नाही.. परंतु आज नेत्यापोटी जन्मणंआणि दहावी उत्तीर्ण होऊन अकरा कोटींची माया जमवणं यासारखं सत्कृत्यराहिलेलं नाही! वर सर्व बापजादे त्यात गैर काय, म्हणून विचारताहेत! लाखो,तरुण, बेरोजगार कार्यकर्ते सतरंज्या उचलून वार्धक्यात गेलेले आणि यांचेदुधाच्या दाताचे वारसदार नवे सरदार बनण्याच्या वाटेवर! जगभरातनावाजलेल्या लोकशाहीचं यापेक्षा सुंदर विडंबन कुठलं असणार!जनहो, कार्यकर्तेहो, तुमच्या धमन्या तापत नाहीत? या अशा ऐतखाऊंच्यापालख्या उचलताना आपण स्वाभिमानच गिळतोय याची जाणीव होत नाही? त्यांनी लाखलादली सुभेदारी, मताधिकार तर आहे ना तुमच्याकडे? जात, पात, वर्ग, पक्ष नबघता रात्रीत मोड येणाऱ्या कडधान्यासारखी, रात्रीत आमदारकी मिळवूपाहणाऱ्या या सर्वच वारसदारांना, मतपेटीच्या वादळातून पाचोळ्यासारखे द्याउडवून! म्हणा, उतरा मातीत, करा काम, खा लाठय़ा-काठय़ा, घ्या थोडे खटलेओढवून, उचला सतरंज्या नि मग मागा आमदारकी! हे करण्यासाठी ‘तुमचं’ मत आहे,वापरा ते!



गेली काही वर्षे नव्हे वर्षांनुवर्षे, शतकानुशतके बघतोय.. आमच्या नावेकुणीही उठावं, आणि वाट्टेल तो धिंगाणा घालावा.. वाट्टेल त्या भाषेतलेखण्या चालवीव्यात.. इतिहासाच्या नावानं वर्तमानात दुकानदारीचालवताहेत.. अंगाची लाही लाही होते.. काही पक्षांनी दिल्ली दरबारी‘लाचार’, तर काही पक्षांनी ‘वडा-पाव खाऊन मारझोड करणारा’, ‘खंडणीउकळणारा’ अशी मराठी माणसाची प्रतिमा करून ठेवलीय..आम्हाला वाटलं होतं, अण्णा हजारे, खैरनार, अविनाश धर्माधिकारीसारखी माणसंकाही ठोस करतील, या भ्रष्ट राजकारणावर.. पण अण्णांना एकीकडे खटलेभरण्याचा उद्योग, दुसरीकडे उपोषणाचा जोडधंदा करायचं व्यसनच लागलंय जणू!



नेमेचि येतो मग पावसाळाप्रमाणे धमकी द्यायची, उपोषण करायचं आणिलिंबू-सरबत पिऊन पुढच्या मोसमाची वाट पाहायची! राजकारणी प्रकरणांची तडलावत नाहीत; पण तुम्ही उपोषण आणि लिंबू-सरबताचं सिलॅबस का करून टाकलंत?खैरनार हातोडा घेऊन बाहेर पडले, धर्माधिकारी राजीनामा घेऊन..खैरनारांच्या हातोडय़ाचा दांडा गोत्यास काळ झाला, धर्माधिकारींना राजीनामापर्व आवडू लागलं.. नोकरीचा राजीनामा देऊन भाजपत गेले, तिथून राजीनामादेऊन सेनेत.. कार्य न करता राजीनामा देण्याची ही नवी चाणक्य नीती असावी!



या निवडणुकीत बंडखोर उभे आहेत.. ‘बंडखोर’ शब्दाचा इतका भुगा कुणी केलानसेल! पूर्वी ‘व्यवस्थे’विरोधात उभे राहणारे बंडखोर असायचे.. हल्लीव्यवस्थेत वाटा नाही म्हणून बंडखोरी! अर्थात ते तरी काय करणार! आज पैठणीवाटणारे उमेदवार, उद्या पेपर किंवा दूध टाकणारे ‘लोकप्रिय’ उमेदवार,पक्षाने दिले तर बंडखोरीशिवाय दुसरं काय करणार? आम्ही लोकांचे राजेझालो.. हल्ली आधी लोकप्रिय व्हायचं, मग लोकप्रतिनिधी व्हायचं!



अस्वस्थ होतो, चीड येते.. जागोजागी उभारलेल्या आमच्या पुतळ्यात जर प्राणओतता आले असते, तर आमच्या समशेरींनी, आमच्या नावावर दुकानदारीकरणाऱ्यांना यमसदनी धाडले असते..



अमृताशी पैजा जिंकणारी मराठी, मराठी मुलुख, मराठी संस्कृती आजराजकीयदृष्टय़ा ‘निर्नायकी, त्रिशंकू अवस्थेत यावी? कोण जबाबदार याला?’



जबाबदार कोण? मतदान न करणारे? घराणेशाही खपवून घेणारे कार्यकर्ते आणिजनता? पाच वर्षांत, पायाखालचा रस्ता खड्डय़ांचा होतो, महागाई वाढते, जगणंअसुरक्षित होतं; पण लोकप्रतिनिधींचे भत्ते वाढतात, त्यांचं वेतन वाढतं,त्यांचं राहणीमान सुधारतं, त्यांच्या भागीदाऱ्या वाढतात.. तीन लाखलोकांचा प्रतिनिधी बघता बघता करोडपती होतो आणि तीन लाख लोक बघत राहतात?एकही मायेचा पूत उठून विचारीत नाही त्याला, की येते कुठून हे सारे?



एक माणूस तीन लाखांची मुस्कटदाबी करतो? मग आम्ही हाडामासाची जिवंत माणसंआहोत, का किडे-मुंगे?राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं, यावर त्यांनाच बोलावून त्यांच्याशीचचर्चा करता? तुरुंगातून बाहेर येणाऱ्यांवर पुष्पवृष्टी करता? रांगोळ्याघालता? जयजयकार करता? एवढे हतबल आहोत आपण, की पुढाऱ्यांच्या पोरांशिवायया बारा-पंधरा कोटी जनतेतून नेतृत्वच निर्माण होणार नाही? का आम्हालाचसवय झालीय सगळ्यांची? त्यापेक्षा ‘मला नागव, पण माझी भूक भागव’ अशी नवीम्हण जन्माला घालू या? राजकारण वाईट, राजकारणी वाईट असं म्हणूनत्यांच्याच चिठ्ठय़ा-चपाटय़ांनी नोकऱ्या, अ‍ॅडमिशन मिळवायच्या, त्यांच्याचपैशावर गणपती आणायचे, दहिहंडय़ा फोडायच्या.. त्यांच्या दादागिरीला ‘कार्य’म्हणायचे.. त्यांच्या समृद्धीला प्रगती म्हणायचे, दूरदर्शी नेतृत्वम्हणायचे!



आमच्या काळात कुठल्याही प्रकारचा द्रोह करणाऱ्याला कडेलोटाची शिक्षाअसायची.. तुमच्या हातात मतपेटी आहे.. पक्ष, वर्ग, जात, धर्म न बघता योग्यउमेदवाराला मत द्या आणि एकदाच काय तो मुजोरांचा कडेलोट करा..



हे राज्य व्हावे ही ‘श्रीं’ची इच्छा, हे आमच्यासह इतिहासजमा झालं!



आता हे राज्य व्हावं, हे श्री, श्रीमती, राव, रंक, शेतकरी, शेतमजूर,दीन-दलित, भटके, स्त्रिया, तरुण कामगार, कष्टकरी या सर्वाची इच्छा असलीपाहिजे.. या राज्याचा एकेकाळचा राजा, मी शिवाजीराजे भोसले सांगतो,कर्तव्यापासून दूर गेलात, तर तुमचा कडेलोट तुम्ही स्वत:च केलात म्हणून समजा!-


संजय पवार लोकसत्ता - रविवार, ११ ऑक्टोबर २००९

Popular Posts