राजमाची प्रकार : गिरिदुर्ग, मध्यम
डोंगररांग : लोणावळा पुणे.
.jpg)
सह्याद्रीच्या लोणावळा खंडाला पासून निघाणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर "उल्हास नदीचे खोरे" म्हणून ओळखला जातो. याच प्रदेशात मुंबई पुणे लोहमार्गावर लोणावळ्याच्या वायव्येला १५ किमी. अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. कल्याण नालासोपारा हि प्राचीन काळातील मोठ्या व्यापाराच्या बंदरातून पुण्याकडे याच मार्गाने होत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. राजमाची वरून एका बाजूस मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी, माथेरान असा परिसर नजरेस पडतो. यामुळे हा किल्ला एक लष्करी ठिकाण असावे, या किल्ल्याला दोन बालेकिल्ले आहेत हे बालेकिल्ले म्हणजे दोन स्वतंत्र किल्लेच होय.
.jpg)
Datta niwas
.jpg)
Waterfall normal view
.jpg)
Waterfall Zoom Mode