27 November 2006

चारोळ्या

तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!

माणुसच आज माणसाला मारायला उठलायं,
हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?
हे माणसा परतून माणसात ये,
सोडून द्वेश, हर्षात ये!

तस पाहिलं तर,
तिची माझी सच्ची मैत्री होती..
आज कित्येक वर्षानी भेटलो,
माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!

सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं...
बदलत राहिले दिवस तरीही,
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!

शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात....
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!

त्यांना कळत पण वळत नाही

नमस्कार मंडळी....

देवाने न जाणो किती प्रकारची माणसे बनविली आहेत....प्रत्येकाच रुप वेगळं, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा...
काही माणसे नेहमी आनंदी...हसतमुख असतात...तर काही याउलट... पाडगावकरंच्या या कवितेमधे वर्णन केल्यासारखी....
आता तुम्हाला कसं रहायचं आहे ते तुम्हीच ठरवा....
पण त्याआधी ही एक छोटीशी कविता वाचा....



यांच असं का होत कळत नाही,
किंवा त्यांना कळत पण वळत नाही.
कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात,
एरंडेल प्यावं तस आयुष्य पीत असतात.
एरंडेल प्यायल्यावर आणखी वेगळं काय होणार?
एकच क्षेत्र ठरलेलं दुसरीकडे कुठे जाणार?
कारण आणि परिणाम यांच नात टळत नाही!
यांच असं का होत कळत नाही,
किंवा त्यांना कळत पण वळत नाही.


---- कविवर्य मंगेश पाडगावकर

Popular Posts