27 November 2006

चारोळ्या

तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!

माणुसच आज माणसाला मारायला उठलायं,
हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?
हे माणसा परतून माणसात ये,
सोडून द्वेश, हर्षात ये!

तस पाहिलं तर,
तिची माझी सच्ची मैत्री होती..
आज कित्येक वर्षानी भेटलो,
माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!

सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं...
बदलत राहिले दिवस तरीही,
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!

शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात....
शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!

Popular Posts